दीर्घ आजाराने त्रस्त असलेल्या प्रौढांना त्यांचे जीवन संपवण्यासाठी परवानगी देणाऱ्या ‘दयामरण विधेयका’ला (असिस्टेड डाइंग बिल) ब्रिटिश पार्लमेंट सदस्यांनी शुक्रवारी प्राथमिक मान्यता दिली. ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये पाच तासांच्या साधक-बाधक चर्चेनंतर पार्लमेंट सदस्यांनी या विधेयकाला मंजुरी दिली. पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहांत हे विधेयक मंजूर झाल्यास दयामरणास परवानगी देणाऱ्या देशांच्या यादीत इंग्लंडचा समावेश होईल. मात्र दयामरण म्हणजे काय, इच्छामरणापेक्षा ते वेगळे कसे आहे, इंग्लंडमधील प्रस्तावित विधेयक काय आहे, यांविषयी…

दयामरण विधेयकाविषयी…

असाध्य आजारामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या प्रौढ रुग्णांना दयामरणाचा अधिकार देणाऱ्या विधेयकाला ब्रिटनच्या पार्लमेंट सदस्यांनी २९ नोव्हेंबर रोजी प्राथमिक मंजुरी दिली. मजूर पक्षाचे पार्लमेंट सदस्य किम लीडबीटर यांनी ‘असिस्टेड डाइंग बिल’ हे विधेयक ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये मांडले. या विधेयकावर दोन्ही बाजूंनी जोरदार चर्चा झाली. अखेर हे विधेयक ३३० विरुद्ध २७५ मतांनी मंजूर करण्यात आले. या विधेयकाला तत्त्वत: मंजुरी मिळाली असून आता वरिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ लॉर्ड्स) ते मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा लागू करण्यात येईल. सध्या या विधेयकावर पार्लमेंटमध्ये अधिक अभ्यास केला जाणार असून काही तरतुदी नव्याने लागू करण्याची शक्यता आहे. हा कायदा १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रौढ रुग्णांसाठी लागू करण्यात येणार आहे. प्रकृती चिंताजनक असलेल्या, ज्याचा मृत्यू डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यांच्या आत होऊ शकतो, अशा रुग्णास सन्मानाने दयामरणाचा अधिकार देण्यात येणार आहे. हा कायदा इंग्लंड आणि वेल्समध्ये लागू होणार आहे. मात्र स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमध्ये लागू होणार नसल्याचे ब्रिटिश कायदेतज्ज्ञांनी सांगितले.

Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
dharavi protestors give preference to toilets
धारावी बचाव आंदोलनकर्त्यांचा वचननामा जाहीर, शौचालयाला प्राधान्य
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे

हेही वाचा >>>Lothal death: लोथल नगरीचं संशोधकांवर एवढं गारुड का?

दयामरण म्हणजे काय? 

दयामरण ही संज्ञा एखाद्या रुग्णाला असाध्य आजारातून उद्भवणाऱ्या शारीरिक वेदना टाळण्याच्या दयाळू हेतूने दिलेल्या मृत्यूसाठी वापरली जाते. रुग्ण असाध्य आणि दीर्घ आजाराने त्रस्त असेल तरच त्याला दयामरण दिले जाऊ शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या रुग्णाचा मृत्यू वर्षभराच्या कालावधीत होऊ शकतो. पण तो असाध्य वेदनांनी त्रस्त असेल तर त्याला दयामरण दिले जाऊ शकते. दयामरणाचा कायदा अनेक देशांमध्ये लागू आहे, मात्र त्याच्या तरतुदी वेगवेगळ्या आहेत. दयामरण कोणाला द्यावे याबाबतही एकमत नाही. काही देशांत अत्यंत व्याधीग्रस्त रुग्ण शरीराचा अंत व्हावा म्हणून मृत्यूचा मार्ग मागतो त्या वेळी त्याला दयामरण देण्यात येते. मात्र एखादा असा रुग्ण मृत्यूची मागणी करू शकत नाही, ज्याच्या मेंदूची सारासार विचार करण्याची शक्ती संपलेली आहे. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला आणि कुटुंबीयाचे मत विचारात घेऊन दयामरण दिले जाते. 

इच्छामरण आणि दयामरण यांमध्ये फरक…

मरणासन्न व्यक्तीला इच्छामरण द्यावे की दयामरण हा वाद अनेक देशांमध्ये आहे. इच्छामरण व दयामरण यामध्ये मूलभूत फरक आहे. मात्र दोघांच्या व्याख्येमध्ये गोंधळ आहे. इच्छामरण मागणाऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती वैद्यकीयदृष्ट्या सजग आणि सक्षम असते. स्वतःची जीवन संपवण्याची इच्छा असल्याने येणारे मरण याला इच्छामरण म्हणतात. दयामरणाची कृती अशा व्यक्तीला संदर्भित करते, जी गंभीरपणे आजारी असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकाकडून प्राणघातक औषधे घेतात, ज्याचे ते स्वतः व्यवस्थापन करतात. इच्छामरण ही दुःखापासून मुक्त होण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे जीवन जाणूनबुजून संपवण्याची क्रिया आहे, ज्यामध्ये डॉक्टरांद्वारे प्राणघातक औषध दिले जाते, ज्यामध्ये रुग्ण गंभीर आजारी नसू शकतात. रुग्णाला असाह्य वेदना सहन कराव्या लागतात, पण या आजारातून तो बरा होऊ शकतो. पण वेदना सहन न करू शकत असल्याने ते मृत्यूची इच्छा व्यक्त करतात. काही वृद्ध वयोपरत्वे आजार सहन करू शकत नाही अशा रुग्णांना इच्छामरण दिले जाते. इच्छामरणाचेही दोन प्रकार आहेत. स्वैच्छिक इच्छामरण, जिथे रुग्ण संमती देतो. रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असेल तर डॉक्टर आणि कुटुंबियांच्या संमतीने मृत्यू दिला जाऊ शकतो. 

हेही वाचा >>>Wife vs. mistress: पत्नी की प्रेयसी? पुरुष जास्त पैसे कोणावर खर्च करतात? संशोधन काय सांगते?

विरोधकांचे मत काय?

दयामरणाविषयीचे विधेयक २०१५ मध्येच ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडण्यात आले होते. मात्र त्यास मंजुरी मिळाली नव्हती. मात्र नवे विधेयक सत्ताधारी मजूर पक्षाने ठामपणे मांडले आणि त्यावर पार्लमेंटमध्ये अत्यंत भावूक आणि जोरदार चर्चा झाली. नैतिकता, वेदना, सामाजिक परिणाम, धार्मिक श्रद्धा, गुन्हेगारी वाढण्याची शक्यता अशा विविध मुद्द्यांवर मांडणी झाली. मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या रुग्णाला या विधेयकामुळे सन्मानपूर्वक मरण पत्करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. या रुग्णांना असाध्य वेदना, दु:ख, त्रास सहन करावे लागणार नाहीत, असे आग्रही मत विधेयकाला समर्थन देणाऱ्यांनी मांडले. मात्र विधेयकाचा गैरवापर होऊ शकतो. डॉक्टरांच्या साहाय्याने रुग्णाची इच्छा नसतानाही त्याला मृत्यू दिला जाऊ शकतो. विधेयकामुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असून अनेकांचे जीव धोक्यात येऊ शकतात, असे मत विरोधकांनी मांडले. एखाद्याचे आयुष्य संपवण्यासाठी दबावही टाकला जाऊ शकतो, असेही विरोधकांनी सांगितले. मात्र हे विधेयक मांडणारे पार्लमेंट सदस्य लीडबीटर यांनी विधेयकाच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली. रुग्णाला जीवन की मृत्यू अशा पर्यायाच्या निवडीचे स्वातंत्र्या या विधेयकाद्वारे दिले जात नाही, तर त्याचा मृत्यू कशा प्रकारे यावा याचे स्वातंत्र्य त्याला देणार आहोत, असे लीडबीटर यांनी सांगितले.

दयामरणाचा कायदा कोणत्या देशांमध्ये? 

ब्रिटरमध्ये दयामरणाच्या विधेयकाला प्राथमिक मंजुरी मिळाली असली तरी काही देशांमध्ये यापूर्वीच दयामरणाला परवागनी देण्यात आली आहे. दयामरणाला कायदेशीर परवानगी देणारा पहिला देश आहे नेदरलँड्स. २००२ मध्येच या देशाने दयामरणाला परवानगी दिली. नेदरलँड्समधील कायद्यानुसार असाध्य स्थितीतील असलेल्या रुग्णाला डॉक्टर औषधांची प्राणघातक मात्रा देऊ शकतात. या राष्ट्राने तर साहाय्यक आत्महत्येलाही कायदेशीर मान्यता दिली, जिथे रुग्णांना स्वेच्छेने स्वतःचा जीव घेण्यास मदत मिळू शकते. बेल्जियम हा दुसरा देश आहे, ज्याने दयामरणाचा अवलंब केला आहे. या देशातही २००२ मध्ये या कायद्याला मंजुरी मिळाली. लक्झेंबर्ग आणि स्पेन या देशांमध्येही दयामरणास परवानगी आहे. अमेरिकेतील ११ राज्यांमध्ये वैद्यसाहाय्यित दयामरणाला परवानगी आहे. कॅनडामध्ये ऐच्छिक इच्छामरण, ज्याला मृत्यूमध्ये कायदेशीर वैद्यकीय मदत असे म्हटले जाते, त्यास परवानगी आहे. ऑस्ट्रेलियातील काही राज्ये आणि न्यूझीलंडमध्येही दयामरणाला मान्यता आहे.    

sandeep.nalawade@expressindia.com