भक्ती बिसुरे

मुदतपूर्व जन्माला येणारी बाळे हे बालमृत्यूचे जागतिक स्तरावरील एक प्रमुख कारण आहे. गेल्या १० वर्षांमध्ये १५ कोटी बाळांचा जन्म मुदतपूर्व झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांनी याबाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. गेल्या १० वर्षांमध्ये दर ४० सेकंदांनी जन्माला येणाऱ्या १० बाळांपैकी एक बाळ मुदतपूर्व जन्माला येते. मुदतपूर्व जन्माने उद्भवणाऱ्या गुंतागुंतीतून त्यांपैकी एका बाळाचा मृत्यू होत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुदतपूर्व जन्म आणि त्याचे परिणाम याबाबत माहिती देणारे हे विश्लेषण.
अहवाल काय?

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
australia Ban on social media use
सोळावं वरीस बंदीचं?…ऑस्ट्रेलियात १६ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना सोशल मीडिया वापरास बंदी! कारणे कोणती?
all 1676 polling stations in Nashik and Malegaon have CCTV and live webcast
नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी

मुदतपूर्व जन्म हे बालमृत्यूचे सद्य:स्थितीतील एक प्रमुख कारण असून, गेल्या दहा वर्षांमध्ये जगाच्या पाठीवर १५ कोटी बाळांचा जन्म मुदतपूर्व झाला आहे. दर ४० सेकंदांनी जन्माला येणाऱ्या १० बाळांपैकी एक बाळ मुदतपूर्व जन्माला येते. मुदतपूर्व जन्माने ओढवणाऱ्या गुंतागुंतींमुळे त्यांपैकी एका बाळाचा मृत्यू होतो. गर्भधारणेचे ३७ आठवडे पूर्ण होण्यापूर्वी जन्माला येणाऱ्या बाळाला मुदतपूर्व (प्रीटर्म किंवा प्रीमॅच्युअर) जन्मलेले बाळ म्हणून ओळखले जाते. २०२० या एकाच वर्षात सुमारे १.३ कोटी बाळांचा जन्म मुदतपूर्व झाला. मुदतपूर्व जन्म आणि त्यामुळे ओढवणारा मृत्यू ही एक अत्यंत चिंताजनक आणीबाणी (सायलेंट इमर्जन्सी) असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने नमूद केले आहे. मुदतपूर्व जन्माला येणाऱ्या पाचपैकी एका बाळाचा मृत्यू त्याच्या पाचव्या वाढदिवसापूर्वीच झाल्याचे या अहवालातून दिसून आले आहे.

मुदतपूर्व जन्म म्हणजे काय?

गर्भधारणेला ३७ आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच बाळाचा जन्म झाला असता त्याला मुदतपूर्व जन्म किंवा प्रीटर्म तसेच प्रीमॅच्युअर जन्म म्हटले जाते. आईच्या पोटात बाळाची वाढ पूर्ण होण्यासाठी ३७ आठवडे म्हणजेच नऊ महिने नऊ दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी पूर्ण होण्याआधीच बाळ जन्माला आले असता त्या बाळावर नवजात बाळांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) उपचार करण्याची गरज भासते. मुदतपूर्व जन्मामागे कित्येक जनुकीय, अनुवांशिक आणि इतर कारणे असू शकतात. वैद्यकीय परिभाषेत ३४ ते ३६ व्या आठवड्यात जन्माला येणारे बाळ ‘लेट प्रीटर्म’, ३२ ते ३४ व्या आठवड्यात जन्माला आलेले बाळ ‘मॉडरेटली प्रीटर्म’, २८ ते ३२ व्या आठवड्यात जन्माला येणारे बाळ ‘व्हेरी प्रीटर्म’ आणि २८ व्या आठवड्यापूर्वी जन्माला आलेले बाळ ‘एक्स्ट्रीमली प्रीटर्म’ म्हणून संबोधले जाते. बाळ जेवढ्या लवकर जन्माला आले असेल तेवढी त्याची प्रकृती चिंताजनक आणि त्याला बालकांच्या अतिदक्षता विभागातील (एनआयसीयू) उपचारांची गरज अधिक भासते. मुदतपूर्व जन्माला आलेले बाळ आकाराने लहान, वजनाने कमी असते. त्याची प्रकृती चिंताजनक, शरीराचे तापमान कमी असते, तसेच बाळाला श्वसनालाही त्रास होत असतो.

Mothers day 2023: विश्लेषण: भारताला मातृपूजेची तब्बल २६ हजार वर्षांची परंपरा!

मुदतपूर्व जन्माची कारणे?

वायुप्रदूषण हे मुदतपूर्व जन्माचे एक प्रमुख कारण असून पौगंडावस्थेत मुलींना झालेली गर्भधारणा तसेच आईच्या आरोग्याशी संबंधित निष्काळजीपणा या बाबीही मुदतपूर्व जन्म होण्यास कारणीभूत ठरतात, असे जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने म्हटले आहे. गर्भधारणा काळात आईची प्रकृती आणि मुदतपूर्व जन्म यांचाही परस्परसंबंध आहे. जुळी बाळे असल्यास मुदतपूर्व जन्माची शक्यता अधिक असते. दोन मुलांमधील कमी अंतर, गर्भधारणेसाठी घेतले जाणारे गुंतागुंतीचे उपचार, गर्भपाताची पार्श्वभूमी या गोष्टीही मुदतपूर्व जन्माला कारणीभूत ठरतात.

बाळाच्या आरोग्यावरील दूरगामी परिणाम?

मुदतपूर्व जन्माला आलेल्या बाळांना पुढे दीर्घकालीन गुंतागुंतींचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. नियमित वाढीचे आणि विकासाचे प्रश्नही या मुलांच्या बाबत आढळणारी सर्वांत सर्वसाधारण बाब आहे. सेरेब्रल पाल्सी, मेंदूच्या विकासातील अडथळे, शारीरिक हालचालींमधील अनियमितता, दिसणे-ऐकू येणे-दातांची वाढ-बोलणे यांतील अडचणी अशा अनेक तक्रारींना मुदतपूर्व जन्माला आलेल्या बाळाला भविष्यात सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या बाळांच्या वाढीकडे कटाक्षाने लक्ष ठेवणे, काही वेगळ्या गोष्टी आढळल्यास त्यांवर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य औषधोपचार सुरू करणे ही बाब महत्त्वाची आहे.

विश्लेषण : भारतीय संस्कृतीतील मातृसत्ताक कुटुंबपद्धती

प्रादेशिक संबंध काय?

बाळ कोणत्या प्रदेशात जन्माला आले, त्यावर पुढील अनेक गोष्टी अवलंबून आहेत. अल्प उत्पन्न गटातील देशांमध्ये पायाभूत वैद्यकीय सुविधांच्या अनुपलब्धतेमुळे २८ आठवड्यांपूर्वी जन्माला आलेल्या दहापैकी एका बाळाच्या जगण्याची शक्यता असते. तेच उच्च उत्पन्न गटातील देशांमध्ये मुदतपूर्व जन्माला आलेली दहापैकी नऊ बाळे किमान निरोगी आयुष्य जगतात. दक्षिण आशिया आणि सब-सहारन आफ्रिका या प्रदेशात मुदतपूर्व जन्माचे प्रमाण सर्वाधिक आहे. जागतिक स्तरावर होणाऱ्या मुदतपूर्व जन्मापैकी ६५ टक्के जन्म या प्रदेशात होतात. मुदतपूर्व जन्म रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्वच देशांनी विविध उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगते. पायाभूत सुविधांचा विस्तार, गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती कार्यक्रम यांवर प्रामुख्याने भर देण्याची गरजही या अहवालाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.

bhakti.bisure@expressindia.com