सीरियाची राजधानी दमास्कसवर ८ डिसेंबर रोजी बंडखोरांनी पूर्ण ताबा मिळवला. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद देश सोडून पळून गेले असावेत असा अंदाज आहे. त्यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचा ठावठिकाणा सुरुवातीस समजू शकला नव्हता. विरोधकांवर रासायनिक अस्त्रांचा वापर करणारे क्रूर शासक असा आरोप बशर यांच्यावर होता. त्यांच्याविषयी फारच थोड्यांना सहानुभूती वाटत असेल. 

बंडखोरांची धक्कादायक मुसंडी

२७ नोव्हेंबर रोजी सीरियाच्या वायव्येस मोर्चेबांधणी केलेल्या बंडखोरांनी दक्षिणेकडे सरकण्यास सुरुवात केली. या बंडखोरांच्या अनेक तळांवर गेल्या काही दिवसांमध्ये बशर यांच्या फौजांनी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या इराण, रशियासारख्या देशांनी हवाई हल्ले केले होते. पण सीरियाच्या लष्कराकडे बंडखोरांचा रेटा थोपवण्याची क्षमता नव्हती. प्रत्येक ठिकाणी त्यांचा पराभव होऊ लागला. २९ नोव्हेंबर रोजी बंडखोरांनी अलेप्पो या सीरियाच्या दुसऱ्या मोठ्या शहरावर ताबा मिळवला. आणखी पुढे सरकरत ५ डिसेंबर रोजी हमा आणि ७ डिसेंबर रोजी हॉम्स हे सीरियाचे तिसरे मोठे शहर बंडखोरांनी जिंकून घेतले. दमास्कस हे राजधानीचे शहर तुलनेने फारच कमी प्रतिकारासह बंडखोरांच्या ताब्यात आले.  

Hamas-Israel armistice in Gaza after 15 months of intense war
हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
nashik BJP rebels girish mahajan
बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

हेही वाचा >>>विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?

कोण आहेत बंडखोर?

बंडखोरांमध्ये प्रमुख आहे हयात तहरीर अल शाम (एचटीएस) हा गट. हे पूर्वी अल कायदाबरोबर होते. २०१७मध्ये फुटून बाहेर पडले. त्यांनीच सीरियाची प्रमुख शहरे जिंकली. पण आणखी एक गट त्यांच्या आधी दमास्कसमध्ये पोहोचला. सीरियाच्या दक्षिणेकडे बशर राजवटीविरोधात सुरू असलेल्या चकमकींमध्ये अनेक स्थानिक गट सहभागी झाले आहेत. त्यांनी दारा या प्रांतावर ताबा मिळवला. २०११मध्ये येथेच अरब स्प्रिंग अंतर्गत उठाव झाला होता. हे गट दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत होते. त्यांनी दमास्कसच्या काही उपनगरांमध्ये प्रवेश केला. याशिवाय सीरियाच्या इशान्येकडे सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (एसडीएफ) हा क्रुदिश बंडखोरांचा एक गट आहे. सीरियन फौजांविरोधात हा गटही लढत आहे.

अध्यक्ष बशर अल असद कुठे आहेत?

सीरियाच्या बहुतेक भागांमध्ये अध्यक्ष बशर अल असद यांच्याशी इमानी असलेल्या फौजांचा पराभव होऊ लागला आहे. किनारपट्टीचा काही भाग आणि राजधानी दमास्कस या मर्यादित भूप्रदेशावरूनही सीरियन फौजांना माघार घ्यावी लागत आहे. ७ डिसेंबरपर्यंत हा प्रतिकारही मोडून पडल्यागत झाला. या काळात कित्येक दिवस बशर अल असद दृष्टीसही पडलेले नव्हते. त्यांच्या कार्यालयाने ते दमास्कसमध्ये असल्याचे ८ डिसेंबरच्या सायंकाळी जाहीर केले. पण त्यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. राजीनामा देण्याची प्रक्रियाही पत्रव्यवहारातूनच पार पडली. त्यांनी कित्येक दिवसांपूर्वीच देश सोडला असावा, असा कयास आहे. बशर हे त्यांच्या कुटुंबियांसह रशियात आले आणि त्यांना राजकीय आश्रय देण्यात आल्याचे रशियाच्या माध्यमांनी, तसेच काही इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>पिझ्झा, केक आणि शीतपेयाच्या जाहिरातींवर बंदी; ‘या’ देशाने केली कारवाई, कारण काय?

इराण, रशिया आणि तुर्कीये…

सीरिया हा गेली अनेक वर्षे विविध देशांच्या दृष्टीने महत्त्वाचा देश होता. शियाबहुल प्रजा आणि अध्यक्षही असल्यामुळे इराणला हा देश आपल्या वर्चस्वाखाली असावा असे वाटत होते. यास्तवच आयसिससारख्या सुन्नी जहाल संघटनांनी या देशावर आक्रमणाचा बेत अनेकदा आखला. काही प्रदेश आपल्या ताब्याखालीही घेतला. भूमध्य समुद्रातील एकमेव नाविक तळ टार्टास येथे असल्यामुळे रशियाला सीरियाच्या सुरक्षेत आणि बशर अल असद यांनी सत्तास्थानावर टिकून राहण्यात रस होता. रशिया आणि इराणने या देशावर प्रभाव पाडण्यास सुरुवात केल्यामुळे अमेरिकाही येथे आली. इस्रायलला सतावणाऱ्या हेझबोला गटाचे तळ सीरियात आहेत. तसेच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे येथे अस्तित्व आहे. त्यामुळे अमेरिका-इस्रायल आघाडी सीरियातील काही तळांवर हल्ले करत होती. तुर्कीयेला लागून असल्यामुळे आणि त्या देशाच्या सत्तेच्या मार्गातील काटा ठरलेल्या कुर्दिश बंडखोरांनी आश्रय घेतल्यामुळे तुर्कीयेलाही सीरियावर नियंत्रण मिळवण्यात रस होता. 

पुढे काय होणार?

२०११मध्ये झालेल्या अरब स्प्रिंग्ज उठावापासून आणि त्याच दरम्यान आयसिसच्या मुसंडीनंतर सीरियाची शकले पडण्यास सुरुवात झाली. अल असद कुटुंबियांची या देशावर १९७० पासून सत्ता आहे. बशर अल असद २०००मध्ये सत्ताधीश बनले. सुरुवातीस त्यांनी स्वतःची छबी उदारमतवादी बनवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनांना त्यांनी निष्ठूरपणे चिरडले. सीरियाच्या काही भागांत त्यांनी विरोधकांचा निःपात करण्यासाठी रासायनिक अस्त्रांचा वापरही केल्याचे बोलले जाते. २०११नंतर विविध लढाया आणि आंदोलनांमध्ये आतापर्यंत ५ लाख सीरियन नागरिक मरण पावले आहेत. असद यांचा पराभव झाल्यामुळे या देशाला वालीच उरलेला नाही. पण बंडखोरांनी काही काळ एकत्रित हंगामी सरकार स्थापन करण्याचे ठरवले आहे. पण त्यांच्या मतैक्य आणि एकोपा किती काळ राहील, याविषयी शंका आहे. तसेच इराण आणि तुर्कीये हे दोन देश तेथे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी यादवीला खतपाणी देतच राहतील, अशी शक्यता आहे. 

Story img Loader