Iran President Killed in Chopper Crash इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. १५ तासांहून अधिक काळ चाललेल्या शोधमोहिमेनंतर इराणच्या सरकारी वृत्त वाहिनीने घोषित केले की, राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियन यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. दाट धुक्यांमुळे रविवारी हेलिकॉप्टरने ‘हार्ड लॅंडिंग’ केले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, रईसी इराण-अझरबैजान सीमा भागातून परतल्यानंतर तबरेझ शहराकडे जात होते.

ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले, त्या ठिकाणी दाट धुके असल्यामुळे ठिकाण शोधण्यासही शोधपथकाला वेळ लागला. या अपघातामागे षड्यंत्र असल्याचेदेखील बोलले जात आहे. मात्र, सध्या तपास सुरू असल्याचे तपास यंत्राणांनी सांगितले आहे. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनाचा इराणवर काय परिणाम होणार? देशाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल? याबद्दल जाणून घेऊ या.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Bashar al-Assad
Bashar al-Assad: सीरियाचा नेता की क्रूर राजवटीचा चेहरा? बशर अल-असद कोण आहे?
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
Cement mixer operator died, Metro 9,
मेट्रो ९ च्या कामादरम्यान सिमेंट मिक्सर ऑपरेटरचा मृत्यू, कंत्राटदार आणि सल्लागारास मोठा दंड, चौकशीसाठी समिती स्थापन

हेही वाचा : कट्टर धर्मगुरूचा इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून वादग्रस्त कार्यकाळ; नेमके कोण आहेत इब्राहिम रईसी?

इब्राहिम रईसी यांचा कार्यकाळ कसा होता?

रईसी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या जवळचे मानले जाणारे कट्टर धर्मगुरू होते. त्यांच्याकडे खोमेनी यांचे वारसदार म्हणून बघितले जायचे. इस्लामिक रिपब्लिकवर पूर्णपणे ताबा मिळवून त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि ते देशाचे १३ वे राष्ट्रपती ठरले. ६३ वर्षीय रईसी यांना उदारमतवादी हसन रूहानी यांच्या जागी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

रईसी सत्तेत असताना इराणने यापूर्वी कधीही दडपशाही पाहिली नाही. निवडणुकीच्या एका वर्षानंतर, त्यांनी महिलांवर निर्बंध लादून इराणमध्ये हिजाब आणि पवित्रता कायद्याची अंमलबजावणी कडक केली. याचदरम्यान सप्टेंबर २०२२ मध्ये, इराणी-कुर्दिश महिला महसा अमिनीला हिजाबचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आणि कोठडीत तिचा मृत्यू झाला. त्याविरोधात इराणी महिलांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली होती. त्यावेळी रईसी यांनी इराणच्या सुरक्षा सेवांना पाठिंबा दिला. त्यांनी आंदोलकांवर, विरोधकांवर कारवाई केली. महिनाभर चाललेल्या सुरक्षा कारवाईत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि २२ हजारांहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले.

रईसी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात देशाला गंभीर आर्थिक आव्हानांचाही सामना करावा लागला. रईसी यांच्या नेतृत्वाखाली इराणच्या लष्कराने एप्रिलमध्ये इस्रायलवर हल्ला केला, ज्यात इराणने इस्रायलवर ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील युद्ध परिस्थिती गंभीर झाली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनीच देशाचा कारभार चालवतात. राष्ट्राध्यक्ष रईसी देशातील दैनंदिन कामकाज बघायचे.

रईसी यांना ‘तेहरानचा मारेकरी’देखील म्हटले जायचे. ते न्यायाधीश झाल्यानंतर त्यांचा १९८८ साली ‘डेथ कमिटी’मध्ये समावेश झाला. राजकीय कैद्यांवर या कमिटीद्वारे खटला चालवण्यात यायचा. राजकीय कैद्यांमध्ये इराणमधील डाव्या विचारसरणीच्या सदस्यांचा यात समावेश होता. या कमिटीने राजकीय कैद्यांवर खटला चालवून त्यांना मृत्यूदंड दिला. हजारो स्त्री-पुरुषांना यात फाशी देण्यात आल्याचे सांगण्यात येते, त्यामुळेच रईसी यांना ‘तेहरानचा मारेकरी’ म्हटले जायचे.

रईसी यांच्या निधनाचा इराणवर काय परिणाम होणार?

रईसी यांचा मृत्यू अशा वेळी झाला आहे, जेव्हा इराणला देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. भ्रष्टाचार आणि सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. तेहरानमधील दडपशाही आणि विदेशातील चिथावणीमुळे अमेरिकेचे निर्बंधही वाढले आहेत. अमिनी या महिलेच्या मृत्यूनंतर निदर्शने आता थांबली आहेत. परंतु, कट्टर नेतृत्वाचा विरोध बऱ्याच इराणी लोकांमध्ये कायम आहे.

गाझामध्ये इस्रायलचे सातत्याने हल्ले सुरू असल्याने, पश्चिम आशियामध्ये तणाव वाढत आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या महिन्यात झालेल्या ‘टिट-फॉर-टॅट स्ट्राइक’नंतर थेट हल्ले झालेले नाहीत. परंतु, हमास आणि हिजबुल्लाह या इस्लामी संघटना इस्त्रायलच्या सैन्याशी लढा देत असल्याने प्रॉक्सी युद्ध सुरूच आहे.

इराणने स्वत:ला पश्चिमेपासून दूर केले आणि इतर मित्र राष्ट्रांसमोर मदतीचा हात पुढे केला आहे. रईसी हे अयातुल्लाच्या नेतृत्वाखालील राजवटीचे मोठे समर्थक होते. खोमेनी आता ८५ वर्षांचे आहेत आणि पुढील काही वर्षांत देश नेतृत्व बदलासाठी प्रयत्नशील असेल. परंतु, रईसी यांच्या अकाली निधनाने सर्वोच्च नेत्याने एक जुना निष्ठावंतच नाही तर संभाव्य उत्तराधिकारीदेखील गमावला आहे. इस्त्रायलबरोबर सुरू असलेले युद्ध आणि देशांतर्गत मतभेद हे नव्या नेत्यापुढील प्रमुख आव्हाने असणार आहेत.

हेही वाचा : ‘या’ देशातून सर्व हिमनद्या लुप्त, आधुनिक इतिहासात प्रथमच एवढी मोठी घटना; हे संकट जगासाठी किती गंभीर?

५० दिवसांत देशात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका

इराणच्या राज्यघटनेत अध्यक्षाचे निधन झाल्यास किंवा काही कारणास्तव पदावरून हटवण्यात आल्यास औपचारिक उत्तराधिकार प्रणाली आहे. इस्लामिक रिपब्लिकच्या घटनेच्या कलम १३१ नुसार, एखाद्या राष्ट्राध्यक्षाचा पदावर असताना मृत्यू झाल्यास, राज्याच्या सर्व बाबींमध्ये अंतिम निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च नेत्याच्या पुष्टीकरणासह प्रथम उपाध्यक्ष पदभार स्वीकारतो, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. येत्या ५० दिवसांत देशात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत.

Story img Loader