राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान घेण्यात येणार आहे. २१ जुलैला भारताला नवे राष्ट्रपती मिळतील. सध्या रामनाथ कोविंद देशाचे राष्ट्रपती आहेत. २४ जुलै २०२२ ला त्यांचा कार्यकाल पूर्ण होतो. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरीक असतात. राष्ट्रपतींच्या कार्यालयात निहित असलेल्या बहुतेक अधिकारांचा वापर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाद्वारे केला जात असला तरी राष्ट्रपती पदाचे विषेश महत्व आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देशातील विधानसभा, राज्यसभा आणि लोकसभेतील सदस्य निवड करतात. तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपतींना महिना किती पगार मिळतो? तसेच त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात?

nagpur in seven constituencies After 77 candidates withdrew 102 candidates remain
यवतमाळ जिल्ह्यात बाजोरीया, नाईक, उकंडेंसह ७७ जणांची माघार…आता मैदानात…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? बाळासाहेब थोरातांचं उत्तर, “आम्ही…”
Prashant Kishor
Prashant Kishor : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर किती फी घेतात? स्वत:च सांगितली माहिती
four candidates of Rohit patil name
Rohit Patil: तासगावमध्ये चार ‘रोहित पाटील’ रिंगणात
chavadi maharashtra assembly election
चावडी : ‘त्या’ पाच जागा
Assets soar of Maharashtra cabinet ministers
पाच वर्षांत मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ, वाचा कोणत्या मंत्र्यांची संपत्ती किती वाढली?
Gopal Krishna Gokhale, Haribhau Apte,
मतदारांना ‘किंमत’ देणारे लोकप्रतिनिधी

राष्ट्रपती पद हे देशातील सर्वोच्च पद आहे. राष्ट्रपती देशाचे पहिले नागरीक तसेच तिन्ही सेनादलाचे प्रमुख असतात. २०१७ सालापर्यंत राष्ट्रपतींना महिना १.५० लाख पगार होता. मात्र, २०१७ मध्ये त्यांच्या पगारात वाढ करण्यात आली असून आता राष्ट्रपतींना महिना ५ लाख रुपये पगार दिला जातो.

२०२० साली करोना काळात राष्ट्रपती कोविंद यांच्यासोबत इतर काही नेत्यांनी आपल्या पगारात ३० टक्के कपात करण्याची परवानगी केंद्र सरकारला दिली होती. तेव्हापासून अत्तापर्यंत राष्ट्रपतींच्या पगारातून ३० टक्के कपात करण्यात येत आहे.

तसेच राष्ट्रपतीच्या जोडीदाराला (नवरा किंवा बायको) महिना ३० हजार रुपये सचिव मदत या रुपाने दिले जातात.

पगाराव्यतरिक्त राष्ट्रपतींना अनेक भत्ते आणि सुविधाही दिल्या जातात. ज्यामध्ये राहण्यासोबत आरोग्याविषयक सुविधा तसेच प्रवास भत्त्यांचा सामवेश आहे.

नवी दिल्लीत असणारे राष्ट्रपती भवन हे त्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. हे भवन ५ एकरमध्ये बांधण्यात आले असून यात ३४० खोल्या आहेत. राष्ट्रपती भवनात जवळपास २०० कर्मचारी काम करतात.

राष्ट्रपतींच्या राहण्यासाठी, त्यांच्या पाहुण्यांसाठी तसेच राष्ट्रपतींशी संबंधित इतर गोष्टींसाठी वर्षाला २.५ मिलियन रुपये खर्च केले जातात.

राष्ट्रपती आणि त्याचा जोडीदार जगात जिथे सगळीकडे मोफत प्रवास करू शकतात. राष्ट्रपतींच्या जोडीदारालाही रेल्वे तसेच विमानात निशुल्क प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राष्ट्रपतींना सुट्टीचा आनंद घेता यावा यासाठी भारतात दोन ठिकाणी खास इमारती बनवण्यात आल्या आहेत. एक शिमलामध्ये आणि दुसरी हैदराबादमध्ये राष्ट्रपती नियालम नावाने बनवण्यात आली आहे.

राष्ट्रपतींकडे सुरक्षेने परिपूर्ण अशी मर्सिडिज बेंझ गाडी आहे. या गाडीत राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेचे चोख बंदोबस्त करण्यात आले आहेत. राष्ट्रपतींसोबत २५ गाड्यांचा ताफा असतो.

राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेसाठी ८६ सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सुरक्षारक्षकांना प्रेसीडेन्शिअल सुरक्षारक्षक म्हणतात.

कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही राष्ट्रपतींना कोणकोणत्या सुविधा मिळतात?

कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही राष्ट्रपतींना अनेक सुविधा देण्यात येतात. राष्ट्रपतींना आयुष्यभर राहण्यासाठी घर आणि वैद्यकीय सुविधा केंद्र सरकारकडून पुरवल्या जातात. तसेच कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर महिना १.५ लाख रुपये पेंन्शन दिली जाते. सोबत राहण्यासाठी बंगलाही दिला जातो. तसेच बंगल्यात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिना ६० हजार रुपये एक मोबाईल आणि लाईंडलाईन कनेक्शनही दिले जाते. याचा खर्चही केंद्र सरकार उचलते.