अद्रिजा रायचौधरी

मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ व्या शतकातील समाजसुधारक आणि भक्ती संप्रदायातील संत रविदास आणि मुघल यांच्याशी संबंधित इतिहासावर प्रकाशझोत टाकला. संत रविदासांना समर्पित करण्यात येणाऱ्या मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते या मंदिरांचा शिलान्यास पार पडला. पंतप्रधान मोदींनी मुघल साम्राज्याच्या अन्यायी शासनाविरुद्ध लढण्याचे धैर्य दाखविल्याबद्दल संत रविदास यांचा या कार्यक्रमादरम्यान गुणगौरव केला होता. असे असले तरी काही इतिहासकारांच्या मते संत रविदास मुघलांविरोधात लढले असे प्रतिपादित करणे खरेतर हास्यास्पद आहे. कारण संत रविदास ज्या भक्ती परंपरेशी संबंधित आहेत, ती परंपरा मूलतः उत्तर भारतात मुघलांच्या काळात उदयास आली आणि विकसित झाली, असा दावा केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इसवी सनाच्या सहाव्या ते नवव्या शतकाच्या दरम्यान भक्ती संप्रदायाची चळवळ प्रथम दक्षिणेत तामिळनाडुमध्ये उदयास आली असली तरी ती सुलतानशाहीच्या उत्तरार्धात आणि मुघल काळात उत्तर भारतात पसरली. इतिहासकारांनी नमूद केल्याप्रमाणे, उत्तरेकडील भक्ती चळवळीवर मुस्लिम शासकांनी प्रचलित केलेल्या संस्कृतीचा केवळ प्रभावच नाही तर, सुलतान आणि मुघल शासकांच्या राजकीय-प्रशासकीय रचनेमुळे या चळवळीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली.

अधिक वाचा : इंग्रज ताजमहाल चोरून नेणार होते? इतिहासातील पुरावे काय सांगतात?

A Geneology of Devotion: Bhakti, Tantra, Yoga and Sufism in North India (2019) या पॅटन बर्चेट यांच्या पुस्तकात त्यांनी उत्तर भारतातील भक्ती मूल्ये, संस्था, संप्रदाय एका बाजूला पर्शियन साहित्य आणि राजकीय संस्कृतीने प्रभावित झालेली आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर सुफीवादाचा परिणाम दिसून येतो, असे नमूद केले आहे. पॅटन बर्चेट हे धार्मिक इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांनी नमूद केलेल्या ऐतिहासिक संदर्भानुसार ११ व्या शतकातील गझनवी आक्रमकांसह पर्शियन कॉस्मोपॉलिटन संस्कृतीने दक्षिण आशियामध्ये प्रवेश केला होता. या संस्कृतीनुसार समाजाचे शासन एका न्यायी राजाने केले पाहिजे ज्याचे शासन मूळतः दैवी आहे आणि जो विविध धार्मिक आणि सांस्कृतिक गटांचे कल्याण आणि समृद्धी सुनिश्चित करतो. मूलतः ही व्यवस्था एका राजकीय आदर्शावर आधारित होती. १३व्या आणि १६व्या शतकांदरम्यान उत्तर आणि मध्य भारतावर राज्य करणाऱ्या दिल्ली सल्तनतने या नियमांचे पालन केले.

पॅटन बर्चेट यांनी केलेल्या युक्तिवादाप्रमाणे ‘सल्तनत शासकांच्या काळात, या प्रदेशातील प्रमुख तांत्रिक विधी परंपरांमध्ये लक्षणीय घट झाली. याच काळात इराण आणि मध्य आशियावर मंगोलांनी आक्रमण केले, त्यामुळे परिणामी पर्शियन सांस्कृतिक उच्चभ्रूंचे भारतात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. अप्रत्यक्षपणे हीच घटना सुफीवादाच्या भारतातील जन्माला कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. या नव्या स्वरूपाच्या सुफीवादाचा राजकीय संस्कृतीवर आणि लोकांच्या धार्मिक जीवनावर अधिक प्रभाव पडला. या ऐतिहासिक संदर्भातच उत्तर भारतात भक्ती चळवळ उदयास आली आणि सुफी वादाची अनेक वैशिष्ट्ये त्यांनी पटकन आत्मसात केली.

भक्ती चळवळ आणि सुफीवाद यांच्यातील समानतेवर अनेक विद्वानांनी वर्षानुवर्षे भाष्य केले आहे. उदाहरणार्थ, डायना इक यांनी नमूद केल्याप्रमाणे, ‘भक्ती आणि सूफीवाद दोन्ही भक्ती आणि प्रेमाच्या अंतर्गत जीवनावर भर देतात, कर्मकांड आणि सरावाच्या बाह्य जगावर नव्हे”. दुसरीकडे, इतिहासकार शहाबुद्दीन इराकी यांनी टिप्पणी केल्याप्रमाणे “भक्ती आणि सुफी चळवळींच्या अंतर्गत विकसित झालेल्या आध्यात्मिक विचारांच्या विविध प्रवृत्ती जाणीवपूर्वक आणि नकळतपणे एकमेकांपासून दूर झाल्या.”

अधिक वाचा : नेताजींच्या मृत्यूचे गूढ खरंच तैवानमध्ये दडलंय का?

बुर्चेट यांनी स्पष्ट केले की, ‘रविदास ज्या निर्गुण भक्तीशी संबंधित होते, त्यामुळे सुफीवाद आणि भक्ती यांच्यातील समानता अधिक स्पष्ट होते. निर्गुण संत हे बहुधा कनिष्ठ जातीतील होते आणि त्यांनी वेदांच्या धार्मिक अधिकाराला आणि त्यांच्या ब्राह्मण प्रतिपादकांना विरोध केला.

मीराबाई आणि सूरदास यांसारखे सगुण संत कृष्णासारख्या स्वरूपातील भगवंताचे भक्त होते, तर निर्गुण संत हे रूप नसलेल्या देवाची पूजा करण्यावर विश्वास ठेवत होते. “सूफीवाद आणि इस्लामचा विचार करता येथील निर्गुण परंपरांना अधिक सच्छिद्र सीमा होत्या,” असे बर्चेट यांनी नमूद केले आहे. ते पुढे म्हणाले की हे विशेषत: शीख परंपरा आणि धर्मग्रंथांमध्ये रविदास आणि कबीरांसारख्या निर्गुण संतांसह सूफी संतांचे लेखन असल्याचे आढळते.

मुघलांच्या काळात भक्ती परंपरा खऱ्या अर्थाने भरभराटीस येऊ लागली. बर्चेट यांनी केलेल्या युक्तिवादाप्रमाणे, ‘मुघल सम्राट अकबराने राजपूतांशी जी राजकीय युती केली होती त्यामुळे आधुनिक उत्तर भारतात भक्ती संप्रदाय आणि साहित्याची भरभराट होऊ शकली. आमेरचे कचवाह, जे रामानंदी भक्ती समाजाचे अनुयायी होते, त्यांनी अकबराच्या मुघल दरबारात सेवा केली. शाही धोरणे आणि शासन पद्धतींना आकार देण्यात त्यांची भूमिका मोलाची होती.

१५२६ मध्ये, उदाहरणार्थ, अकबराने वृंदावनातील गोविंददेव मंदिराच्या कार्यवाहक पुजाऱ्याला जमीन दिली. तर १५८० पर्यंत, मुघलांनी ब्रज प्रदेशातील किमान सात मंदिरांना जहागीर अनुदान दिले होते. मुघल-कचवाह संबंधाने वाढवलेल्या संरक्षणामुळेच वृंदावन हे त्या काळातील सर्वात महत्त्वाचे भक्ती धार्मिक केंद्र म्हणून उदयास आले. “मुघलांच्या पाठिंब्याशिवाय भक्ती चळवळ विकसित होणे शक्य नव्हते,” असे बर्चेट यांनी नमूद केले. त्याच वेळी, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, भक्ती चळवळीने मुघल शासकांना कार्य करण्यासाठी एक अत्यंत आवश्यक धार्मिक आधार प्रदान केला.

इतिहासकार हरबंस मुखिया यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना स्पष्ट केले की, मध्ययुगीन भारतीय समाजात भक्तीने एक अद्भुत समाधान प्रदान केले ज्यामध्ये राज्यकर्ते मुस्लिम होते आणि बहुसंख्य लोकसंख्या हिंदू होती. त्यांनी सुचवले की, भक्ती चळवळीच्या उगमाचा मुस्लिम राज्याला थोडाफार फायदा झाला.

अधिक वाचा : विश्लेषण: म्यानमारच्या कोको बेटांवरून चीनची भारतावर नजर! नेमके काय घडते आहे?

“इस्लामने एकेश्वरवादावर भर देत देव आणि त्याच्या उपासनेची पूर्णपणे भिन्न संकल्पना आणली. हे भारतीय उपखंडातील बहुसंख्य लोकसंख्येच्या श्रद्धेच्या विरुद्ध जाणारे होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. “या संदर्भात, भक्ती चळवळीने एक अद्भुत मूळ कल्पना दिली. या कल्पनेने आपल्याला एका वैश्विक ईश्वराची संकल्पना दिली, जी अल्लाह आणि ईश्वर यांना एक मानते. मुखिया यांनी नमूद केले की मुस्लिम शासकांनी भक्ती परंपरांशी जी आत्मीयता बाळगली होती, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अकबराचे ‘सुलह-ए-कुल’ किंवा ‘सार्वभौमिक शांती’. मूलतः हे कबीरांच्या तत्त्वज्ञानाचे शाब्दिक भाषांतर आहे. शिवाय, अकबराचा दरबारी इतिहासकार, अबुल फझल याने कबीरांना आपल्या लिखाणात महत्त्वाचे स्थान दिले होते. “खरं तर तो त्याच्या लिखाणात ‘अल्लाह’ किंवा ‘मोहम्मद’ असे नमूद करत नाही. त्याऐवजी तो कबीरांनी घोषित केलेल्या वैश्विक ईश्वराच्या समान धार्मिक सूत्राचा अवलंब करतो आणि त्याच्या कामांमध्ये ‘इलाही’ हा शब्द वापरण्यास प्राधान्य देतो, ज्याचा अर्थ देवत्व असा आहे,” असे मुखिया नमूद करतात.

या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर भक्ती संप्रदायातील संत रविदास यांनी समाजात भक्ती तत्त्वज्ञानाचा प्रचार केला. ऐतिहासिक संदर्भ पाहता त्यांना मुघलांच्या वर्चस्वाला तोंड देण्याची गरज नव्हती हे स्पष्ट दिसते. उलट, मुस्लिम सम्राटांच्या राजवटीने कदाचित त्यांच्या शिकवणींना समृद्ध करण्यासाठी आदर्श सामाजिक-राजकीय वातावरण प्रदान केले असेल.