वाराणसी जिल्हा न्यायालयाने ‘ज्ञानवापी’ मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाचा काळ शोधण्यासाठी कार्बन डेटिंगची मागणी करणारी याचिका स्वीकारली आहे. या याचिकेवर २९ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. कार्बन डेटिंगच्या या प्रक्रियेवर आक्षेप आहे का? हे जाणून घेण्यासाठी न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली आहे.
ज्ञानवापीमधील ‘शिवलिंगा’चा काळ शोधणार? ; कार्बन डेटिंगची मागणी करत वाराणसी न्यायालयात याचिका
कार्बन डेटिंग काय आहे?
सजीव किंवा जुन्या बांधकामाचे वय ठरवण्यासाठी कार्बन डेटिंग पद्धतीचा वापर केला जातो. सजीवांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात कार्बन असतो. डेटिंगच्या प्रक्रियेत अणुच्या १४ वस्तुमानासह कार्बन-१४ चा किरणोत्सर्ग होतो. यातून सजीवांमध्ये असलेल्या कार्बनचा क्षय होत जातो. वातावरणात कार्बन-१२ मुबलक प्रमाणात असतो.
वनस्पतींना प्रकाश संश्लेषणातून (Photosynthesis) तर प्राण्यांना मुख्यत: अन्नातून कार्बन मिळते. वातावरणातून प्राणी आणि वनस्पती कार्बन मिळवत असल्याने त्यांना कार्बन-१२ आणि कार्बन-१४ ची आवश्यक असते. जेव्हा त्यांचा मृत्यू होतो, तेव्हा वातावरणाशी असलेला त्यांचा संबंध नष्ट होतो. त्यानंतर प्राणी किंवा वनस्पती कार्बन शोषूण घेत नाहीत. त्यामुळे कार्बन-१२ स्थिर राहतो आणि त्याचा क्षय होत नाही. मात्र, यावेळी कार्बन-१४ मधून किरणोत्सर्ग सुरू राहतो.
ज्ञानवापी मशीद प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा ; पूजेचा अधिकार मागणारी हिंदू महिलांची याचिका वैध
झाडं किंवा प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शरीर किंवा फांद्यांमधील कार्बन-१२ आणि कार्बन-१४ चे गुणोत्तर एकतर स्थिर राहते किंवा त्यात बदल होतात. हा बदल मोजला जाऊ शकतो. यानुसार सजीव कधी मृत्यू पावला, याची वेळ ठरवली जाऊ शकते.
निर्जीव वस्तूंचे काय?
कार्बन डेटिंगची पद्धत अत्यंत प्रभावी असली, तरी सर्व परिस्थितींमध्ये वापरली जाऊ शकत नाही. निर्जीव वस्तूंचे वय उदाहरणार्थ, खडकाचे वय या पद्धतीनुसार क्वचितच ठरवता येते. या शिवाय ४० ते ५० हजार वर्ष जुन्या वस्तूंचे वय कार्बन डेटिंगद्वारे कळू शकत नाही. त्यामुळे निर्जीव वस्तूंचे वय मोजण्यासाठी इतर पद्धतींचा वापर केला जातो. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीत अप्रत्यक्षरित्या कार्बन डेटिंगचा वापर केला जातो.
उदाहरणार्थ, हिमनदी किंवा बर्फाच्या तुकड्यांचे वय बर्फाच्या आवरणामध्ये अडकलेल्या कार्बन डाईऑक्साईडच्या कणांचा अभ्यास केल्यानंतर ठरवले जाऊ शकते. या कणांचा अर्थात रेणूंचा बाहेरील वातावरणासोबत कोणताही संबंध नसल्याने ते स्थिर राहतात. याचप्रमाणे अप्रत्यक्षरित्या एखाद्या जुन्या खडकाचे वय देखील ठरवले जाऊ शकते. ज्ञानवापी प्रकरणात हिंदू याचिकाकर्त्यांचा या ठिकाणी मशिदीच्याआधी शिवलिंग होते, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. कार्बन डेटिंग पद्धतीमुळे सैद्धांतिकदृष्ट्या ते शक्य आहे.
विश्लेषण : वय वाढतं तसे आपण म्हातारे का होतो? आपल्या शरीरात नेमकं घडतं काय? सविस्तर जाणून घ्या
ज्ञानवापी प्रकरणात कार्बन डेटिंग किती उपयुक्त
एखादी वस्तू किंवा वास्तूचे वय जाणून घेण्यासाठी अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. असे असले तरी प्रत्येकच वस्तूचे वय ठरवता येत नाही. प्रत्येक पद्धतीची अचुकतादेखील वेगवेगळी असते. ज्ञानवापी मशीद प्रकरणात कार्बन डेटिंगची पद्धत वापरता येणार की नाही याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.