पुण्याच्या पूर्वेला उगवून मध्य भागातील व्यवसायसमृद्ध टापूत ‘लक्ष्मी’च्या पावलांनी शिरणारा लक्ष्मी रस्ता पुण्यातील व्यापारी उलाढालीचा शतकभराचा साक्षीदार आहे. नेहमी गजबजलेल्या या रस्त्यावर ११ डिसेंबरला ‘पादचारी दिना’निमित्त पादचाऱ्यांना सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विनाअडथळा मार्गक्रमण करता येईल. हा उपक्रम काय आहे आणि यातून काय साध्य होणार आहे, याविषयी…

पुण्यात ‘पादचारी दिन’ कसा साजरा होतो आहे?

वाहतूक व्यवस्थेतील सर्वांत दुर्लक्षित घटक अशी पादचाऱ्यांची ओळख आहे. पादचाऱ्यांना त्यांचे हक्क देण्याबरोबरच वाहनचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आता पादचारी दिन साजरे करण्याची वेळ आली आहे. पुणे महापालिकेनेही ही गरज ओळखून चार वर्षांपूर्वी, सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महापौर असताना ‘पादचारी दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. असा दिन साजरा करणारी पुणे महापालिका देशातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे. प्रत्येक वर्षी ११ डिसेंबरला पादचारी दिन साजरा केला जातो. यासाठी महापालिकेने लक्ष्मी रस्त्याची निवड केली आहे. गेल्या वर्षी लक्ष्मी रस्त्यावर अर्धा दिवस सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी बंदी घालून पादचाऱ्यांना कोणत्याही अडथळ्याविना, मनसोक्त वावरासाठी हा रस्ता खुला करून देण्यात आला होता. यंदा ११ डिसेंबरला सकाळी आठ ते रात्री आठ एवढा वेळ मिळणार आहे.

Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Traffic changes due to flyover work at Savitribai Phule Pune University Chowk Pune news
पुणे: विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
roads Mumbai roads mechanical sweepers mumbai,
मुंबईतील रस्ते आणखी चकचकीत, मार्चपर्यंत १५ यांत्रिकी झाडू, कचरा उचलणारी यंत्रे घनकचरा विभागाच्या ताफ्यात
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
mmrda planned various road projects to solve traffic congestion problem in thane kalyan and navi mumbai
ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील रस्ते प्रकल्पांना गती; वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत पार पडली महत्वाची बैठक
Fast paced concreting on Madh Marve road in Malad is causing traffic congection
मढ मार्वे मार्गावरील रस्ते कामात नियोजनाचा अभाव, वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासाच्या प्रवासासाठी अडीच तास प्रतीक्षा

हेही वाचा – पुणे : पीएमपी प्रवासी तरुणीशी अश्लील कृत्य, पसार झालेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

लक्ष्मी रस्ताच का?

पुण्यातील व्यापारी रस्ता अशी लक्ष्मी रस्त्याची ओळख आहे. पूर्वेकडे कॅम्पातून सुरू होणारा हा रस्ता डेक्कन जिमखाना परिसराला मध्य पुण्याशी जोडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज पुलाच्या सुरुवातीपर्यंत, म्हणजे टिळक चौकापर्यंत, एवढ्या अंतराचा आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूंना विशेषत: कापड, तयार कपडे, सोने-चांदी, किराणा-भुसार, खाद्यपदार्थ आदींची दुकाने आहेत. या रस्त्याला लागून असलेल्या गल्लीबोळांतही प्रामुख्याने याच वस्तूंची दुकाने, गोदामे आणि भाजी मंडई आहे. शहराचे व्यापारी केंद्र असल्याने संपूर्ण शहराचा येथे राबता असतो. साहजिकच दिवसभर प्रचंड वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी रस्ता एकेरी केलेला असला, तरी गर्दी, कोंडी यातून त्याची सुटका झालेली नाही. पदपथही पथारी विक्रेत्यांनी अडवलेला असतो. परिसरातील गजबजाटाचा रहिवाशांना प्रचंड त्रास होतो. अशा रस्त्यावर संपूर्ण दिवस वाहने नाहीत, ही अभिनव कल्पना आहे. खरेदीसाठी आलेल्यांना शांतपणे खरेदीचा आनंद घेता येणार आहे, विक्रेत्यांचा त्यात फायदा आहे, परिसरातील रहिवाशांना कोंडीपासून मुक्तता मिळणार आहे आणि एरवी लगबग अनुभवणाऱ्या रस्त्यावर विविध प्रकारचे उपक्रम आयोजिले जाणार आहेत.

कोणते उपक्रम?

पायी फिरताना लक्ष्मी रस्त्याचे एक वेगळे दर्शन नागरिकांना होणार आहे. अनेकदा रस्त्यावरून जाऊनही न पाहिलेल्या जुन्या वास्तू, मंदिरे आदी गोष्टी पाहता येतील. रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससह पथनाट्य, कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रस्तासुरक्षा कार्यशाळा, अपंग, अंधांसाठी विशेष कार्यक्रम, चित्र प्रदर्शन, सार्वजनिक वाहतुकीसंदर्भात प्रदर्शन, रांगोळी, विविध कला आणि संगीत कार्यक्रम, हवेच्या गुणवत्तेची चाचणी तसेच स्वच्छ संस्थेचे प्रदर्शन अशा उपक्रमांचा समावेश असणार आहे. या उपक्रमांत अधिकाधिक नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी वाहतूक पोलीस, लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटना, पथारी संघटना, वाहतूक क्षेत्रातील विविध संस्था आणि संघटनांचा या उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी कसबा पेठ, महापालिका आणि मंडई मेट्रो स्थानकापासून सायकल उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, पीएमपीकडून जादा गाड्यांची सुविधा दिली जाणार आहे. वाहतूक नियमांबाबत जनजागृती, पादचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेणे, खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्यासाठी जनजागृती, महापालिका राबवत असलेल्या उपयायोजनांची माहिती हाही ‘पादचारी दिना’मागील उद्देश आहे.

हेही वाचा – Supriya Sule : विधानसभा निकालानंतर निवडणूक आयोगाबाबत खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, म्हणाल्या…!

यापूर्वी असे प्रयोग कधी?

पुण्यापुरते बोलायचे, तर काही वर्षांपूर्वी कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावर शनिवार, रविवारी सायंकाळी ‘वॉकिंग प्लाझा’ उपक्रम राबविला जात होता. त्यातही वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवून पायी चालण्याचा आनंद मिळवणे हा उद्देश होता. आनंदी रस्ते ही संकल्पनासुद्धा अशीच आहे. बाणेर-बालेवाडी परिसरात ती राबवली गेली होती. या प्रयोगांवेळीही खेळ, नृत्य, गाणी, स्केटिंग, जेंबेवादन असे उपक्रम आयोजण्यात येत होते.

अशा उपक्रमांची गरज का?

परदेशात, विशेषत: युरोपात पायी चालण्यासाठी विशेष सुविधा करून देण्यात येतात, तसेच त्यांच्या सुरक्षिततेविषयी वाहनचालक जागरुक आहेत. आपल्याकडे पादचारी आणि त्यांचे हक्क याविषयी फारशी जागरुकता नाही, त्यामुळे त्यासाठी पादचारी दिन, वॉकिंग प्लाझासारख्या उपक्रमांची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे त्या रस्त्यावरील आर्थिक उलाढालीलाही चालना मिळते. दुकानांमध्ये ग्राहक फुरसतीने खरेदी करू शकतात. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठीही हे उपक्रम उपयुक्त ठरतात. नागरिकांना एकत्र येऊन गप्पागोष्टी करता याव्यात तसेच वेगवेगळ्या गोष्टींचा एकत्रित आनंद घेता यावा, यासाठी असे उपक्रम महिन्यातून काही दिवस आयोजित करण्याची गरज आहे.

siddharth.kelkar@expressindia.com

chaitanya.machale@expressindia.com

Story img Loader