पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल आहे. पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. वाढती वाहनसंख्या आणि अरुंद रस्ते वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. याच वाहतूक खोळंब्यांवर उपाय म्हणून पुणे जिल्हा नियोजन समितीने गेल्या आठवड्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व उर्वरित जिल्ह्यासाठी पुढील ३० वर्षांसाठी सर्वंकष वाहतूक आराखडा म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे. ही योजना तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे.

या नियोजनामध्ये पुण्यातील एकूण २० हजार ५५० चौरस मीटरच्या परिसराचा समावेश २७६ किलोमीटर लांबीच्या नव्या मेट्रो मार्गिका आणि सहा नवीन बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (BRT) कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहेत. काय आहे ही योजना? याचा पुणेकरांना कसा फायदा होणार? या योजनेत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

Metro Line 8 to Link Mumbai and Navi Mumbai Airports
मुंबई विमानतळ ते थेट नवी मुंबई विमानतळ…कशी असेल मेट्रो – ८? खासगी- सार्वजनिक उभारणीचे कोणते फायदे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hinjewadi traffic jam
‘आयटी’तील पुणेकरांची आणखी वर्षभर कोंडी, उन्नत मार्ग रखडल्याने हिंजवडीकरांना दिलासा नाहीच
daily passengers traffic jam Shilphata route five day road work
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
pune metro new routes
Pune Metro: पुण्यातील वाहतूक खोळंब्यावर १,२६,४८९ कोटींचा तोडगा; जिल्हा नियोजन समितीत CMP सादर!
Shilpata road remain closed five days February reconstruction work Nilaje railway flyover
अत्यंत वर्दळीचा शिळफाटा रस्ता फेब्रुवारीत पाच दिवस बंद रहाणार, वाचा सविस्तर…
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
Palghar Police conducts special awareness campaign on the occasion of Road Safety Week
शहरबात: रस्ते आणि सुरक्षा

पुण्यासाठीच्या सर्वंकष वाहतूक आरखड्यात काय समाविष्ट आहे?

सर्वंकष वाहतूक आराखडा (सीएमपी) एकात्मिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठीचे धोरणात्मक फ्रेमवर्क आहे. लोकसंख्या वाढ, प्रादेशिक विस्तार व रोजगाराच्या अंदाजांवर आधारित दीर्घकालीन शहरी गतिशीलतेच्या आधारावर हा आराखडा तयार करण्यात आला आहे. योजनेत अंदाजे खर्च, प्रस्तावित जमिनीचा वापर आणि शाश्वत व कार्यक्षम वाहतुकीसाठी धोरणे समाविष्ट आहेत. पुण्यासाठी ‘सीएमपी’मध्ये सर्व महानगरपालिका, वाहतूक अधिकारी, वाहतूक विभाग, भारतीय रेल्वे व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांसारख्या केंद्रीय संस्थांसह २९ प्रशासकीय भागधारकांचा समावेश आहे. पुणे मेट्रोपोलिटन रिजन (PMR), महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि इतर प्रमुख क्षेत्रांचा समावेश असलेल्या अभ्यासाचे क्षेत्र २,५५० चौरस किमी पसरलेले आहे. २०२४-२०३४, २०३५-२०४४ व २०४५-२०५४ या तीन टप्प्यांत योजना लागू केली जाईल.

सर्वंकष वाहतूक आराखडा (सीएमपी) एकात्मिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठीचे धोरणात्मक फ्रेमवर्क आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पुण्याला अशा योजनेची गरज का आहे?

‘टॉमटॉम वाहतूक निर्देशांक’नुसार पुणेकरांना केवळ १० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी ३३ मिनिटे २२ सेकंद लागतात. सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या जगातील आघाडीच्या शहरांमध्ये पुण्याने चौथा क्रमांक मिळवला आहे. या वाहतूक कोंडीसाठी वाढलेली वाहन नोंदणी, पीएमपीएमएल बसेसचा तुटवडा, जोडणीच्या कामाला होणारा विलंब, रस्त्यांचे खराब व्यवस्थापन आदी बाबी कारणीभूत आहेत. गेल्या वर्षी पुण्याच्या आरटीओने तीन लाखांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत चार टक्क्यांनी वाढली आहे. तर पिंपरी-चिंचवडच्या आरटीओने आठ टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. गेल्या चार वर्षांत पुण्यात ४० लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये २३ लाख वाहनांची नोंदणी झाली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)चा ताफा प्रति लाख लोकसंख्येमागे ६० बसेस, असा आहे. हा आकडा या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक क्षमतेपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ६,२२८ बसेसची आवश्यकता आहे; मात्र त्यापैकी २,०३० बसेस चालवल्या जातात. ही आवश्यकता २०३४ पर्यंत ८,००० बसेस, २०४४ पर्यंत १०,००० व २०५४ पर्यंत ११,६०० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात वाढणाऱ्या लोकसंख्येसह वास्तविक गरजा अंदाजापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुणे मेट्रोला आपली प्रवासी संख्या पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. २०२१ च्या दिल्ली मेट्रोच्या अहवालानुसार तिथे अंदाजित सहा लाख लोक दैनंदिन प्रवास करतात; परंतु अधिकृत डेटानुसार पुण्याच्या मेट्रोतील दैनंदिन प्रवाशांचा आकडा कसाबसा १.६ लाखांपर्यंत पोहोचला आहे.

‘टॉमटॉम वाहतूक निर्देशांक’नुसार पुणेकरांना केवळ १० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी ३३ मिनिटे २२ सेकंद लागतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वंकष वाहतूक आराखड्यात काय?

प्रस्तावित मेट्रो लाइन : मेट्रोमध्ये सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी यांना जोडणाऱ्या ३३.१ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका आहेत. बांधकामाधीन मेट्रो मार्ग ३३.५ किलोमीटर लांबीचा असून, हिंजवडीला जिल्हा न्यायालयाशी, पीसीएमसीला निगडीशी व स्वारगेटला कात्रजशी जोडेल. महा मेट्रोकडून १४८ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आणि १२८ किलोमीटरचा मेट्रो लाइट व मेट्रो निओ मार्ग तयार करण्यात येणार आहे. मेट्रो लाइट ही लहान शहरे किंवा कमी घनता असलेल्या भागांसाठी कमी क्षमतेची रेल्वे प्रणाली आहे. मेट्रो निओ ही कमी पायाभूत सुविधांच्या खर्चासह मध्यम क्षमतेची रेल्वे परिवहन प्रणाली आहे, जी मध्यम प्रवासी घनता असलेल्या भागांसाठी उपयुक्त आहे.

प्रस्तावित बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (बीआरटीएस) कॉरिडॉर : पुणे महानगरपालिका (पीएमसी), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी ११७ किलोमीटर लांबीचे चार नवीन बीआरटीएस मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यात रावेत ते राजगुरूनगर, तळेगाव दाभाडे, गवळी माथा चौक ते शेवाळेवाडी, चांदणी चौक ते हिंजवडी या चार मार्गांचा समावेश आहे. हाय-फ्रिक्वेन्सी बस कॉरिडॉरमध्ये लोणी काळभोर ते केडगाव आणि भूमकर चौक ते चिंचवड चौक असे ४६.३ किलोमीटरचे दोन मार्ग असतील.

प्रस्तावित पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेस आणि मार्ग : पीएमपीएमएल सध्या दिवसाला १२.३ लाख प्रवाशांना सेवा देते. सध्याच्या पीएमपीएमएल ताफ्यात ४७३ ई-बससह २,०३० बसेसचा समावेश आहे. सीएमपीअंतर्गत, पीएमपीएमएल ६४१.९० किलोमीटरचे १८ नवीन बसमार्ग बांधणार आहे. त्यापैकी १४०.१६ किलोमीटरचे मार्ग पुढील १० वर्षांत विकसित केले जातील. त्याव्यतिरिक्त पीएमपीएमएलने ११ नवीन टर्मिनल विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच, १४ नवीन बसआगारे विकसित केली जातील; ज्यामध्ये १०० बसेससाठी किमान दोन हेक्टर जमीन असेल आणि भविष्यातील टर्मिनल विस्तारासाठी पाच हेक्टर जागा असेल.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) : एमएसआरटीसी १० पैकी सात इंटरसिटी बस टर्मिनल्सचा पुनर्विकास करील आणि चार नवीन टर्मिनल बांधेल. हे चार टर्मिनल मांगडेवाडी, कदम वस्ती, लोणी कंद व मोशी येथे असतील.

रेल्वे आणि विमानतळ कनेक्टिव्हिटी : सीएमपी अंतर्गत मध्य रेल्वेने पुणे, शिवाजीनगर, चिंचवड व तळेगावसाठी स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट स्कीम (SATIS) लागू करण्याची योजना आखली आहे. या योजनेत तळेगाव दौंडशी जोडले जाणार असून, दोन टप्प्यांत रेल्वेमार्ग बायपास केला जाणार आहे. नवीन पुरंदर ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पासाठी जेजुरी आणि राजेवाडी ही दोन रेल्वेस्थानके प्रस्तावित असून, राजेवाडीला विमानतळाशी जोडणारी स्पर लाईन आहे.

नॉन-मोटाराइज्ड ट्रान्स्पोर्ट (एनएमटी) सुधारणेसाठी सीएमपी : योजनेचा हा भाग प्रामुख्याने पादचारी, पदपथ व सायकल ट्रॅक यांच्या पायाभूत सुविधा लक्षात घेऊन महामंडळांद्वारे विकास कामांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. दोन्ही बाजूंच्या पदपथांचे जाळे पीएमसी क्षेत्रांमध्ये ३४१ किलोमीटर आणि पीसीएमसीमध्ये २६६ किलोमीटरपर्यंत असेल. ‘पीएमसी’मध्ये २२९.८ किलोमीटर लांबीचा आणि पीसीएमसीमध्ये १७० किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक प्रस्तावित आहे. परंतु, सध्याच्या ट्रॅकची लांबी केवळ ६२ किलोमीटर आहे.

मोबिलिटी मॅनेजमेंट मेझर : गतिशीलतेचे व्यवस्थापन करण्यासाठी, १४ ट्रक टर्मिनल, प्रत्येकी २५ एकर क्षेत्रफळ असलेले सात लॉजिस्टिक पार्क, २६ मल्टीमॉडल इंटिग्रेशन हब, १४ ऑफ-स्ट्रीट पार्किंग स्थाने व २२ ठिकाणी ऑन-स्ट्रीट पार्किंग प्रस्तावित आहे. ऑन-स्ट्रीट पार्किंग हे स्मार्ट पार्किंग व्यवस्थापन तंत्रज्ञानासह पे अॅण्ड पार्क यंत्रणेवर आधारित असेल. क्षेत्रनिहाय पार्किंग भाडे निश्चित करण्यासाठी पार्किंग धोरण २०१६ चे पालन केले जाईल.

Story img Loader