दरवर्षी उत्साहात साजरा केला जाणारा माघी मेळा (जत्रा) हा पंजाबमधील एक महत्त्वाचा उत्सव आहे. श्री मुक्तसर साहीब शहरात या मेळ्याचे आयोजन करण्यात येते. १७०५ साली खिद्राना येथे मुघलांविरोधात लढताना ४० शिख योद्धे शहीद झाले होते. त्यांच्याच स्मरनार्थ हा माघी मेळा दरवर्षी आयोजित केला जातो. मुघल आणि शिख योद्ध्यांमध्ये झालेल्या या युद्धानंतर खिद्राना या शहराचे नाव मुक्तसर पडले. हा मेळा यावर्षी १४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर माघी मेळ्याचा इतिहास, या मेळ्याचे राजकीय महत्त्व या सर्व गोष्टी जाणून घेऊया.
विश्लेषण : सौदी अरेबियात नागरिकत्वाच्या नियमांत बदल, जाणून घ्या नवे नियम?
माघी मेळ्याचा इतिहास काय आहे?
माघी मेळा श्री मुक्तसर साहीब शहरात जानेवारी किंवा नानकशाही दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यात आयोजित केला जातो. शिख धर्मियांमध्ये या उत्सवाला खूप महत्त्व आहे. १७ व्या शतकात मुघलांविरोधातील लढाईमध्ये ४० शिख योद्ध्ये शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा मेळा आयोजित केला जातो. उपलब्ध माहितीनुसार १७०४ मध्ये मुघलांनी आनंदपूर साहीबला वेढा दिला होता. याच कारणामुळे ४० शिख योद्ध्यांनी तेथून पळ काढला होता. अमृतसरकडे येत असताना ते एका गावात थांबले. येथे त्यांना माही भागो नावाची महिला भेटली. या महिलेने या योद्ध्यांना प्रेरित केले आणि आनंदपूर साहीबला परत जाण्यास सांगितले. त्यानंतर महिलेसह हे ४० योद्धे आनंदरपूरच्या दिशेने निघाले. पुढे मुघलांविरोधात लढण्यासाठी त्यांनी गुरु गोविंद सिंग यांची साथ दिली. गुरु गोविंद सिंग आणि या योद्ध्यांची खिंद्राना येथे भेट झाली होती. येथे मुघलांविरोधात लढाई करताना या योद्ध्यांनी बलिदान दिले.
हेही वाचा >>> विश्लेषण : सौदी अरेबियात नागरिकत्वाच्या नियमांत बदल, जाणून घ्या नवे नियम?
हा मेळा माघीच्या दिवशी आयोजित केला जातो. यासाठी पंजाब तसेच जगभरातील शिख बांधव येथे येतात. येथे असलेल्या गुरुद्वारा दरबार साहीबचे दर्शन घेऊन सरोवरात स्नान केले जाते.
माघी मेळ्याचे राजकीय महत्त्व काय आहे?
माघी मेळ्याला पंजाबमध्ये मोठे राजकीय महत्त्व आहे. या मेळ्यासाठी पंजबामधील शिख बांधव दोन दिवसांधीच जमा होतात. संध्याकाळी येथे कवी दरबार आयोजित केला जातो. याच कवी दरबारात राजकीय व्यक्ती भाषण करतात. १९५० सालापासून येथे अशा राजकीय सभा आयोजित केल्या जातात. पुढे प्रत्यक्ष मेळ्याच्या दिवशीही राजकीय सभा आयोजित करण्याच्या प्रमाणात वाढ झाली.
हेही वाचा >>> विश्लेषण : मुस्लीम मुली वयात आल्यानंतर आवडत्या व्यक्तीशी विवाह करू शकतात का?
मागील अनेक वर्षांपासून माघी मेळ्यानिमित्त राजकीय सभा, परिषदा आयोजित केल्या जातात. हा मेळा आता राजकीय आखाडा होऊ लागला आहे. हा मेळा पंजाबमधील राजकारणाची दिशा ठरवणारा ठरत आहे. मात्र मेळ्यामध्ये राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप वाढत असल्यामुळे अकाली तख्तने या उत्सवात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप कमी करावा, असे आवाहन केले. त्यानंतर आता येथे माघी मेळ्यानिमित्त राजकीय सभा, परिषदा आयोजित करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.