खलिस्तान समर्थक तसेच ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून तो फरारही होता. अमृतपाल सिंग हा १९८४ साली अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील कारवाईत मारल्या गेलेल्या जर्नेलसिंग भिंद्रनवालेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, फक्त इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या अमृतपाल सिंगची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? त्याच्यावर पंजाब पोलिसांनी का आणि कशा पद्धतीने कारवाई केली? मागील काही दिवसांपासून तो पंजाबमध्ये नेमके काय करीत होता? हे जाणून घेऊ या.

दीप सिद्धूच्या ‘क्लबहाऊस’मध्ये अमृतपाल सिंग श्रोता म्हणून सामील व्हायचा

अमृतपाल सिंग दुबईमध्ये वडिलोपार्जित असलेला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचा. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या अभिनेता दीप सिद्धू याच्या सोशल मीडिया ॲप ‘क्लबहाऊस’मध्ये अमृतपाल सिंग एक श्रोता म्हणून सामील व्हायचा. पुढे दीप सिद्धूने स्थापन केलेल्या ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचे प्रमुखपद आल्यानंतर अमृतपालचा पंजाबमध्ये उदय झाला. अगोदर फक्त एक श्रोता म्हणून तो दीप सिद्धूच्या संपर्कात आला होता. पुढे मात्र अवघ्या १८ महिन्यांत तो एक खलिस्तान समर्थक बनला. ‘खालसा वाहीर’च्या माध्यमातून पंजाबमध्ये त्याचे असंख्य अनुयायी बनले. पुढे प्रसिद्धी मिळाल्यानंतर आणि अनुयायी तयार झाल्यानंतर त्याने स्वत:चे सैन्य निर्माण केले. यासह त्याने काही व्यसनमुक्ती केंद्रांचीही स्थापना केली. पंजाबमध्ये ओळख निर्माण झाल्यानंतर त्याने अनेक राजकीय नेत्यांना धमक्या दिलेल्या आहेत. तसे त्याच्यावर आरोपही आहेत. सहकाऱ्याच्या सुटकेसाठी त्याने थेट पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. याच कारणामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर तो फरार झाला होता. मागील साधारण ३६ दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. आता मात्र त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी आसामच्या तुरुंगात करण्यात आली आहे.

ravi rana supporter maha kumbh tour
भाविकांना महाकुंभला नेले अन् पळ काढला; रवी राणांच्या कार्यकर्त्याचा प्रताप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune mns Office bearers and activists became Active during elections time
पुण्यात ‘मनसे’ला मराठी माणसाची पुन्हा आठवण
Gulbadan Begum's Hajj Pilgrimage
Mughal History: गुलबदन बेगमची हजयात्रा: श्रद्धेचा व स्वातंत्र्याचा शोध, ही यात्रा का ठरली इस्लामिक साम्राज्याची ओळख?
Asiatic lions arrive at Sanjay Gandhi National Park
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंहाचे आगमन
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
landslide in left main canal of Tilari Dam
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड; त्यामुळे रस्ता, शेती, बागायतीमध्ये पाणी
Mumbai Marathon, kumbh Mela ,
‘चलो कुंभ चले’; मुंबई मॅरेथॉनमध्येही कुंभमेळ्याचे वेड

हेही वाचा >> केशवानंद भारती खटल्याचे अर्धशतक पूर्ण; ‘संविधानाचे रक्षक’ केशवानंद भारती कोण होते, संसदेचा घटनेतील हस्तक्षेप कसा रोखला?

खलिस्तानविषयी बोलतो म्हणून दीप सिद्धूने केले होते ब्लॉक

‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचे प्रमुखपद स्वत:कडे आल्यानंतर अमृतपाल सिंगच्या उदयाला सुरुवात झाली. दीप सिद्धूने २९ सप्टेंबर २०२१ रोजी चंदिगड येथे सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी या संघटनेची स्थापना केली होती. कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवल्यामुळे अभिनेता असलेल्या दीप सिद्धूचे पंजाबमध्ये लाखो चाहते निर्माण झाले होते. सिद्धूने संघटनेच्या कामासाठी क्लब हाऊस नावाची एक ऑनलाइन ऑडिओ रूम सुरू केली होती. याच ऑडिओ रूममध्ये अमृतपाल सिंग श्रोता म्हणून सहभागी व्हायचा. कालांतराने त्याला बोलण्याची संधी दिली जाऊ लागली. मात्र आपल्या भाषणात तो वारंवार खलिस्तानच्या मुद्द्यावर बोलायचा. याच कारणामुळे दीप सिद्धूने त्याला या ऑडिओ रूमवर ब्लॉक केले होते. नंतर दीप सिद्धूच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच फेब्रुवारी २०२२ पर्यंत अमृतपाल सिंग या ऑडिओ रूमवर ब्लॉकच होता.

भिंद्रनवालेचे अनुकरण करण्यासाठी घेतले प्रशिक्षण

अमृतपालने दुबईमधील आपला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सोडून परत भारतात येण्याचे ठरवले. अंगात पांढरा कुर्ता तसेच निळी पगडी घालूनच अमृतपालने भारतात पाऊल ठेवले. भारतात परतेपर्यंत अमृतपाल सिंगला मानणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी वाढली होती. लोक सोशल मीडियावर त्याची तुलना ‘दुसरा भ्रिंदनवाले’ अशी करू लागले. या संपूर्ण काळात पंजाबमधील गुप्तचर संस्था अमृतपाल सिंगवर तसेच त्याच्या शिकवणीमुळे घडाणाऱ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून होते. गुप्तचर संघटनेतील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जास्तीत जास्त लोक सोबत यावेत यासाठी तो भिंद्रनवालेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत होता. भिंद्रनवाले जसा बोलतो, ते बोलण्याचा तो प्रयत्न करायचा. अमृतपाल भिंद्रनवालेसारखे कपडे परिधान करायचा. यासाठी त्याने भिंद्रनवालेचे अनेक व्हिडीओ पाहिले होते. भिंद्रनवालेचे अनुकरण करण्यासाठी अमृतपालने जॉर्जिया येथे जाऊन प्रशिक्षणही घेतल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा >> सुदान संघर्षातून तीन हजार भारतीय नागरिकांची अजूनही सुटका नाही; सध्याच्या परिस्थितीची माहिती जाणून घ्या!

तरुणांचा हिरो होईल म्हणून त्याच्यावर कारवाई करण्याचे टाळले!

पंजाबमध्ये अमृतपाल सिंगचा उदय होत असताना तेथील गुप्तचर संघटना त्याच्यावर लक्ष ठेवून होत्या. भविष्यात अमृतपाल सिंगमुळे पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे म्हटले जात असताना पंजाब सरकारकडून मात्र त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्याच्याकडे लक्ष दिल्यामुळे किंवा त्याच्यावर कारवाई केल्यामुळे तो मोठा होईल. परिणामी तो पंजाबमधील तरुणांसाठी हिरो होईल. त्यामुळे त्याला अनुल्लेखाने मारणे, हाच सर्वोत्तम पर्याय आहे, असे सरकारचे मत होते.

पोलिसांकडून १८ मार्च रोजी कारवाई करण्यास सुरुवात

नोव्हेंबर २०२२ मध्ये अमृतपाल सिंगने अकाल तख्त येथून खालसा वाहीरची (एका प्रकारची पदयात्रा) सुरुवात केली. मुक्तसर येथे या पदयात्रेची सांगता झाली. मला शीख धर्माच्या शिकवणीचा प्रसार करायचा आहे, असे त्याने या वेळी सांगितले होते. त्याने दुसरी यात्रादेखील सुरू केली होती. या यात्रेची सांगता दमदमा साहिब येथे करण्याचे नियोजन त्याने केले होते. अमृतपालचे वाढते साम्राज्य लक्षात घेऊन पंजाब पोलिसांनी १८ मार्च रोजी त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र साधारण तीन आठवड्यानंतर अमृतपाल सिंग तसेच त्याच्या अनुयायांनी आपल्या साथीदाराला सोडवण्यासाठी शस्त्रांसह अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला. या घटनेनंतर अमृतपालविरोधातील कारवाईला वेग देण्यात आला.

हेही वाचा >> विश्लेषण : जागतिक व्याघ्रसंवर्धनासाठी भारताचा पुढाकार… काय आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स?

ख्रिश्चन धर्मावर केली टीका

अमृतपाल सिंगच्या काही जुन्या व्हिडीओंमध्ये ख्रिश्चन धर्माविरोधात बोलताना दिसत आहे. तसेच ज्या शीखबांधवांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे, त्यांच्या ‘घरवापसी’बद्दलही तो या व्हिडीओंमध्ये बोलताना दिसत आहे. याच कारणामुळे पंजाबमधील ख्रिश्चनबांधवांनी जालंधरमध्ये त्याच्याविरोधात मोठे आंदोलन केले होते. सुरुवातीला अमृतपाल सिंग आपल्या भाषणांत तरुणांना शीख धर्मीय तत्त्वज्ञानाचे पालन करावे, व्यसनापासून मुक्त राहावे असे आवाहन करायचा. मात्र पुढे तो आपल्या भाषणांत सातत्याने शीख धर्मीयांसाठी वेगळ्या देशाच्या मागणीवर बोलत होता. याच मुद्द्यांवर बोलताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत जे घडले, तेच भाजपाच्या नेत्यासोबतही घडणार आहे, असेही अमृतपाल सिंग २१ फेब्रुवारी रोजी म्हणाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे त्याचा रोख होता.

अजनाला पोलीस ठाण्यावर केला होता हल्ला

अमृतपाल सिंगची प्रक्षोभक विधाने तसेच त्याच्या अनुयायांची संख्या वाढत असल्यामुळे त्याच्यावर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र पंजाब तसेच केंद्र सरकारने या विषयावर गप्प राहणे पसंत केले होते. मात्र २३ फेब्रुवारी रोजी अमृतपाल सिंग तसेच त्याच्या अनुयायांनी अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केल्यानंतर सरकारला खडबडून जाग आली. अमृतपाल सिंगने पवित्र ग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’ सोबत घेत पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. याच कारणामुळे पोलिसांनी त्या वेळी त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. मात्र ‘गुरु ग्रंथ साहिब’चा सुरक्षाकवच म्हणून वापर केल्यानंतर अकाल तख्त तसेच अनेक शीख धर्मगुरूंनी अमृतपालवर सडकून टीका केली.

हेही वाचा >> विश्लेषण: एक किलोचा दर एक रुपया! पंजाबमध्ये ढोबळी मिरची मातीमोल का?

पत्नी किरणदीप कौरला विमानतळावर रोखले!

अमृतपाल सिंगच्या खालसा वाहीरच्या दुसऱ्या टप्प्याची १९ मार्च रोजी सुरुवात होणार होती. मात्र त्याच्या एका दिवसाअगोदरच पंजाब पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. या वेळी तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला होता. पळून जाताना त्याने अनेक वाहने बदलली तसेच वेशांतरही केले. त्यानंतर साधारण ३६ दिवसांनंतर त्याला रोडे येथून अटक करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर भारतातून बर्मिंगहॅमला जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र तिलाही अमृतसर येथील विमानतळावर रोखण्यात आले होते.

वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय

पोलिसांना चकवा देण्यासाठी अमृतपाल सिंगने अनेक वेळा वेशांतर केले. तसे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अमृतपाल इयत्ता १२ वी पर्यंत शिकलेला आहे. कपूरथळा येथे पदविकेचे शिक्षण घेत असताना त्याने मध्येच शिक्षण सोडले. तो मूळचा अमृतसरमधील जुल्लूपूर येथील खेरा गावातील रहिवासी आहे. त्याचे वडील तरसेमसिंग आणि काका हरजितसिंग यांचा ‘संधू कार्गो ट्रान्सपोर्ट’ नावाने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. अमृतपालसिंगने १० फेब्रुवारी रोजी मूळची ब्रिटनची रहिवासी असलेल्या किरणदीप कौरशी लग्न केले आहे. मात्र अमृतपाल सिंगने आपल्या लग्नाचे फोटो सार्वजनिक केलेले नाहीत. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केल्यानंतरच किरणदीप कौरचे फोटो माध्यम तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले.

Story img Loader