‘सायन्स ॲडव्हान्स’मध्ये २९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, १९८६च्या युक्रेनच्या उत्तरेकडील चेर्नोबिल अणुभट्टीमध्ये झालेल्या अपघातातून होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे कुत्र्यांच्या जनुकीय संरचनेत मूलभूत बदल झाला असावा. यातून एक नवीनच उपप्रजाती निर्माण झाल्याची शक्यता आहे.

चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात काय घडले?

चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या चौथ्या क्रमांकाच्या युनिटमध्ये २६ एप्रिल १९८६ रोजी मध्यरात्री स्फोट झाला. अणुभट्टी फुटून किरणोत्साराचे ढग आसमंतात पसरले. कामगार आणि आपातकालीन पथकातील कर्मचारी असे ३० जण किरणोत्साराची बाधा झाल्याने आठवडाभरात दगावले. प्रिपिएट हे शहर आणि आसपासचा परिसर मिळून सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. अतिशय विदारक चित्र त्याठिकाणी निर्माण झाले होते. या अणुभट्टीवर आच्छादन टाकण्याचे काम दहा हजार कामगार सलग चार वर्षे करत होते. त्यामुळे किरणोत्सार नियंत्रणात आणणे शक्य झाले. ब्रिटनमधील पर्यावरण आणि जलशास्त्र केंद्राचे प्राध्यापक निक बेरेस्फोर्ड यांनीही तिथल्या धोक्याची पातळी नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले होते.

Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Indian Navy Day 2024
Indian Navy Day 2024: छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का मानले जाते?
Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर
mahayuti vidhan sabha result
कलंकितांवरून कोंडी; शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे भाजपने ठरविण्यावर आक्षेप; राष्ट्रवादीसमोरही पेच
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?

हेही वाचा >>> कोल्ड्रिंकसह तंबाखू, सिगारेट महागणार? काय आहे कारण?

चेर्नोबिलमध्ये पुन्हा किरणोत्सर्गाचा धोका?

चेर्नोबिल अणुभट्टीच्या परिसरात आण्विक कचरा प्रतिबंधक सुविधा आहेत. १९८६ च्या स्फोटात नुकसान झालेल्या अणुभट्टीला झाकणारे आणि सुरक्षा करणारे घुमट या ठिकाणी आहेत. या इमारती किरणोत्सर्ग करणारे साहित्य बंदिस्त राहावे या दृष्टीने तयार करण्यात आल्या आहेत. युद्धसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्या तयार केलेल्या नाहीत, असेही तज्ज्ञ सांगतात. याठिकाणी काही नुकसान झाल्यास किरणोत्सारी साहित्य हटवण्याची मोहीम ३० वर्षे मागे जाऊ शकते. तसेच स्थानिक परिसरात किरणोत्सर्ग पसरण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

शास्त्रज्ञांनी विचार का करावा?

किरणोत्सर्गामुळे उत्परिवर्तन होण्याचा प्रकार नवीन नाही. शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे सीईझेडमध्ये (चेर्नोबिल एक्स्क्लूजन झोन) राहणाऱ्या काही प्राण्यांचे विश्लेषण करत आहेत. यात जीवाणू, उंदीर आणि पक्षी यांचाही समावेश आहे. २०१६ मध्ये झालेल्या अभ्यासात असे आढळून आले की पूर्वेकडील ‘वृक्ष बेडूक’ जे सहसा हिरव्या रंगाचे असतात, ते सीईझेडमध्ये काळ्या रंगाचे बनले. बेडकांच्या मेलेनिनमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्परिवर्तन (म्युटेशन) घडून आले. या परिसराच्या आसपासच्या जंगलात राहणाऱ्या लांडग्यांच्या जनुकांमध्येही बदल घडून आले, असे आढळून आले. त्यामुळे चेर्नोबिलच्या जंगली कुत्र्यांमध्ये असेच काही घडू शकते का, असा विचार शास्त्रज्ञांनी केला. किरणोत्सर्गामुळे त्यांच्या जनुकसंचामध्ये (जिनोम) कसा बदल होतो हे समजून घेण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना आणि नॅशनल ह्युमन जिनोम रिसर्च इन्स्टिट्युटच्या शास्त्रज्ञांनी सीईझेडमध्ये किंवा त्यांच्या आसपास आढळलेल्या ३०२ जंगली कुत्र्यांच्या डीएनएची तपासणी करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >>> विश्लेषण : जो बायडेन यांनी मुलाला ‘माफी’ का दिली? राष्ट्राध्यक्षांना असलेल्या अधिकाराचा गैरवापर झाला का?

जंगली कुत्र्यांच्या अभ्यासाचे कारण काय?

चेर्नोबिल अणुभट्टी प्रकल्पातील स्फोटानंतर हा परिसर मानवविरहित झाला. मात्र, या परिसरात सर्व प्रकारच्या प्राण्यांची संख्या वाढली. यात जंगली कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यातील अनेक जंगली कुत्रे हे पाळीव प्राण्यांचे वंशज आहे. याठिकाणी स्फोट झाला तेव्हा हा परिसर मानवविरहित करण्यात आला. मात्र, काही लोकांनी त्यांचे पाळीव कुत्रे त्याच ठिकाणी सोडले होते. जगातील सर्वात मोठ्या आण्विक आपत्तीला चार दर्शके पूर्ण होत असतानाच आता जीवशास्त्रज्ञ सीईझेडच्या (चेर्नोबिल एक्सक्लूजन झोन) आत असलेल्या प्राण्यांचे जवळून निरीक्षण करत आहेत. या परिसरातील किरणोत्सर्गाच्या संपर्कात राहूनही ते इतकी दशके कसे जगू शकतात याचा ते अभ्यास करत आहेत.

स्फोटानंतर काय घडले?

चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातील स्फोटानंतर आजूबाजूच्या रहिवाश्यांनी घाईघाईने त्या परिसरातून पळ काढला. मात्र, यावेळी त्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्यांना त्याच ठिकाणी सोडले. किरणोत्सर्गाने त्या प्रदेशातील वन्यजीव संख्या बरीचशी कमी झाली, पण काही टिकून राहिली आणि त्यांनी त्यांचे प्रजनन सुरूच ठेवले. चेर्नोबिल डॉग रिसर्च इनिशिएटिव्हने २०१७ आणि २०१९ दरम्यान ३००हून अधिक कुत्र्यांच्या रक्ताचे नमुने चेर्नोबिल डॉग रिसर्च इनिशिएटिव्हने वेगवेगळ्या ठिकाणी संकलित केले. अणुभट्टीसाठी नवीन सुरक्षित बंदिस्त सुविधेसाठी बांधकाम सुरू झाले, त्याचवेळी स्वयंसेवकांनी कुत्र्यांवर उपचार करणे आणि त्यांना निर्जंतूक करणे सुरू केले. पण ते यशस्वी ठरले नाही.

संशोधकांना काय आढळले?

चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प आणि जवळपास दोन मैल दूर असलेल्या प्रिपयतमध्ये राहणाऱ्या कुत्र्यांमध्ये फरक शोधणे हे संशोधकांचे उद्दिष्ट होते. संशोधकांनी प्रकल्प क्षेत्रातील कुत्रे आणि इतर प्राण्यांमध्ये पाहिलेले अनेक परिणाम भूतकाळात दुसऱ्या महायुद्धात जपानमधील अणुबॉम्बमध्ये वाचलेल्यांमध्ये आढळून आले. त्यांच्यात मोतीबिंदूचे प्रमाण वाढले आहे. किरणोत्सर्जाच्या तीव्र संपर्कात आल्याची चिन्हे त्यांच्या डोळ्यात दिसतात. शास्त्रज्ञ ट्युमर, लहान मेंदूचा आकार आणि इतर बदलही त्यांच्याच शोधत आहेत.

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader