राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात टीका केली. शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. या टीकेवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नक्की पाहा >> Photos: सुप्रिया सुळेंनी करुन दिली २१०० कोटींच्या प्रकरणाची आठवण तर अजित पवार म्हटले, “राज ठाकरे पलटी मारणारा…”
असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि कन्या सुप्रिया सुळेंबरोबरच राज्यातील कॅबिनेट मंत्री असणाऱ्या छगन भुजबळांनी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) पाठवण्यात आलेल्या नोटीशीचा मुद्दा उपस्थित करत टीका केलीय. “लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक आणि आश्चर्य वाटतं,” असा टोला सुप्रिया यांनी लगावलाय. राज यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा त्यांना ईडीने पाठवलेल्या नोटीशीचं कोहिनूर प्रकरण चर्चेत आलं आहे. मात्र २१०० कोटींचं हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात…
नक्की वाचा >> “असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही…”; मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेचं दिलीप वळसे-पाटलांना थेट आव्हान
सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) राज ठाकरे यांना २०१९ साली चौकशीची नोटीस आलेली. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र मनसे अशा नोटीशींना भिक घालतं नाही अशी पहिली प्रतिक्रिया मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी दिली होती. विधानसभा निवडणुकींच्या अगदी तोंडावर कोहिनूर मिल प्रकरणाला पुन्हा तोंड फुटल्याने राज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
नक्की वाचा >> “पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही…”; नारायण राणेंनी केली राज ठाकरेंची पाठराखण
>
सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईतील ‘कोहिनूर सीटीएनएल’ कंपनीला दिलेल्या ८६० कोटी रूपयांचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात २०१९ च्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून तपास सुरू केला. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशीच्या मालकीची ‘कोहिनूर सीटीएनएल’ दादरमधील ‘सेना भवन’ समोरील ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होती.
नक्की वाचा >> “शरद पवारांना जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे…”; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया
>
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेश जोशी यांनी दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली. त्यासाठी आयएलएफएसकडून ८६० कोटी रूपयांचे कर्ज घेतलं. मात्र यात आयएलएफएसचे मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली. त्यांनतर त्यांनी कंपनीतील आपले शेअर्स विकले. आयएलएफएसकडून शेअर विकण्यात आल्यानंतर लगेच २००८ मध्ये राज ठाकरे यांनी यातील आपले सर्व शेअर्स विकले. पण त्यानंतरही राज ठाकरे यांचा संबंधित कंपनीत सक्रिय सहभाग असल्याचं सांगत ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली.
नक्की वाचा >> “भाजपाविरोधात बोलता बोलता कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला”; राज ठाकरेंवर खोचक टीका
>
मात्र ९०० कोटींचे कर्ज न फेडता आल्याने उन्मेष जोशींच्या हातून दादरमधील हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट निसटला. दोन हजार १०० कोटींचा हा प्रोजेक्ट रिअल इस्टेटमधील एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. कर्ज न फेडल्याने जोशी यांना हा प्रोजेक्ट गमवावा लागला. प्रभादेवीमधील आर्किटेक्ट कंपनी ‘संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्स’ला हा प्रोजेक्ट मिळाला असून त्यांनी यावर काम सुरु केलं आहे. दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम बंद पडले होते. बँकांकडून घेतलेलं ९०० कोटींचं कर्ज फेडण्यात कोहिनूर ग्रूप अपयशी ठरला होता. यामुळे संबंधित बँकांनी जून २०१७ मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे धाव घेतली होती. ट्रिब्यूनलने प्रोजेक्ट संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्सला देण्याची शिफारस स्वीकारल्याने उन्मेश जोशी यांना हा प्रोजेक्ट सोडावा लागला. २६ जानेवारी २०१९ पासून या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु झाले असून पुढील १५ ते १८ महिन्यांत काम पूर्ण करण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं होतं.
नक्की वाचा >> नितीन गडकरी राज ठाकरेंची ‘शिवतिर्थ’वर भेट; दोन तासांच्या चर्चेनंतर गडकरी म्हणाले, “राज ठाकरे आणि त्यांच्या…”
राज यांची चौकशी का?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी कोहिनूरमधून अचानक काढता पाय का घेतला या संदर्भात ईडीने चौकशी केली होती. आयएल अॅण्ड एफएस ग्रुपने या प्रकल्पामध्ये २२५ कोटींची थेट गुंतवणूक केली होती. मात्र कंपनीने २००८ साली आपल्या मालकीचे सर्व शेअर्सचा हक्क अवघ्या ९० कोटींच्या किंमतीवर सोडला. त्यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी त्याच वर्षी आपल्या मालकीचे शेअर्स विकून कंपनीमधील आपला सहभाग संपुष्टात आणला. याचसंदर्भात चौकशी झाल्याचं सांगण्यात आलं.
काय आहे कोहिनूर स्क्वेअर?
>
दादरसारख्या मोक्याच्या ठिकाणी ५२ आणि ३५ मजल्यांचे हे दोन ट्विन टॉवर आहेत.
>
ऊर्जाबचत आणि पर्यावरणस्नेही इमारत म्हणून सुवर्णपत प्राप्त
>
मुख्य इमारतीतील पहिल्या पाच मजल्यांवर अत्याधुनिक शॉपिंग मॉल्स, उर्वरित ४७ मजले सिंगापूर ब्रॅण्डचे ‘आयू मुंबई’ हे पंचतारांकित हॉटेल तसेच व्यापारी सदनिका.
>
जुळ्या इमारतीतील पहिले १५ मजले दोन्ही टॉवर्सच्या पार्किंगसाठी; तब्बल दोन हजार गाड्यांची व्यवस्था. उर्वरित २० मजल्यांवर आलिशान सदनिका.
>
या संपूर्ण प्रकल्पाची किंमत २१०० कोटी इतकी आहे.