दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सर्व सहा दोषींची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये एस नलिनी, आरपी रविचंद्रन, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायास, जयकुमार या दोषींचा समावेश आहे. याआधी राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी एजी पेरारिवालन याची १८ मे रोजी सुटका करण्यात होती. तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे LTTE संघटनेने आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींची हत्या केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठी बातमी! राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व दोषींची सुटका करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

१९९८ मध्ये टाडा न्यायालयाने ४१ पैकी २६ आरोपींना शिक्षा सुनावली होती. त्यापैकी १२ आरोपींचा स्फोटात मृत्यू झाला होता. मे १९९९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यातील १९ आरोपींची सुटका केली होती. तर नलिनी, संथन, मुरुगन आणि पेरारिवालन या दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. पायास, रविचंद्रन आणि जयकुमार यांच्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्यात आले होते.

आरोपी क्रमांक १ नलिनी

राजीव गांधींच्या हत्येनंतर महिनाभरात नलिनी आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली होती. हल्ल्यात सामील सुभा आणि धनू या दोन श्रीलंकन महिलांना घरात आश्रय दिल्याची कबुली नलिनीने ताडा न्यायालयात दिली होती. या दोघींची योजना माहिती असतानादेखील नलिनीने या महिलांना मदत केली होती. धनूने स्वत:ला उडवून दिल्यानंतर नलिनी, सुभा आणि ‘एलटीटीई’चा म्होरक्या सिवारासन यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता, अशी माहिती आरोपपत्रात नमुद आहे. १९९९ मध्ये नलिनीला ठोठावलेल्या फाशीला खंडपीठातील न्यायमूर्ती के. टी. थॉमस यांनी विरोध दर्शवला होता. धनू राजीव गांधींची हत्या करणार आहे, हे नलिनीला श्रीपेरंबुदूर मध्येच माहिती पडले होते. या हत्येच्या कटाच्या विळख्यात अडकल्याने ती यातून माघार घेऊ शकली नाही, असे थॉमस यांचे म्हणणे होते.

आरोपी क्रमांक २ संथन

१९९१ मध्ये सिवारासन सोबत संथन तामिळनाडूला आला होता. तो ‘एलटीटीई’च्या गुप्तचर विभागाचा सदस्य होता. १९९० मध्ये संथनने सिवारासनच्या सांगण्यावरुन ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी’ मध्ये प्रवेश मिळवला. राजीव गांधींच्या हत्येच्या कटात संथन सिवारासन सोबत सामील होता. “तुरुंगवासादरम्यान संथन कुणाशीही बोलत नव्हता. तो अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा माणुस असून दिवसभर मंदिरात बसून असायचा” अशी माहिती पेरारिवालनने दिली आहे.

सोनियांची शिक्षामाफीची भूमिका काँग्रेस पक्षाला अमान्य; राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या मुक्ततेला आव्हान देणार

आरोपी क्रमांक ३ मुरुगन

श्रीलंकन नागरिक असलेला मुरुगन ‘एलटीटीई’चा कार्यकर्ता होता. १९९१ मध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात तो सामील होता. त्याला एलटीटीईने भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांचे स्केचेस काढण्यासाठी पाठवले होते. आई-वडिलांसोबत झालेल्या समस्येदरम्यान मुरुगनच्या प्रेमात पडल्याची कबुली नलिनीने तिच्या आत्मचरित्रात दिली आहे. राजीव गांधींच्या हत्येनंतर हे दोघे अनेक दिवस फरार होते.

आरोपी क्रमांक ९ रॉबर्ट पायास

श्रीलंकेचा नागरिक असलेला पायास त्याच्या गर्भवती पत्नीसोबत २० सप्टेंबर १९९० मध्ये भारतात आला होता. या दाम्पत्याच्या ४५ दिवसांच्या बाळाचा ‘इंडियन पीस कीपिंग फोर्स’च्या (आयपीकेएफ) कारवाईत मृत्यू झाला होता. पायासला १९ जून १९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. ‘एलटीटीई’शी घनिष्ट संबंध असल्याची कबुली त्याने टाडा न्यायालयात दिली होती. राजीव गांधींच्या हत्येनंतर पायासची पत्नी, बहिण आणि नवजात बाळ सैदापेट तुरुंगात बंदिस्त होते. या तिघांची काही दिवसांनंतर सुटका करण्यात आली होती. सध्या पायासचा मुलगा नेदरलँडमध्ये राहात असून त्याची पत्नी श्रीलंकेत वास्तव्यास आहे.

विश्लेषण: सतत मूड स्विंग, निद्रानाश याचं कारण ठरणारा ‘बायपोलर डिसऑर्डर’ आजार नेमका आहे तरी काय?

आरोपी क्रमांक १० जयकुमार

पायासचा मेव्हणा असलेल्या जयकुमारला ‘एलटीटीई’ने १९९० मध्ये भारतात पाठवलं होतं. हत्येचा कट रचणाऱ्या लोकांसाठी घराची व्यवस्था करण्याची जबाबदारी जयकुमारवर सोपवण्यात आली होती. १९९९ मध्ये तुरुंगातून मुक्तता करण्यात आलेल्या दोषींमध्ये जयकुमारच्या भारतीय पत्नीचा समावेश होता. त्याची पत्नी सध्या चेन्नईमध्ये मुलासोबत राहत आहे.

पाकिस्तानमध्ये आता कर्जावर कोणतंही व्याज नाही; ‘व्याजमुक्त बँकिंग’ची घोषणा; नेमका काय आहे हा प्रकार?

आरोपी क्रमांक १६ रविचंद्रन

‘एलटीटीई’च्या भारत आणि श्रीलंकेतील प्रशिक्षण शिबिरात रविचंद्रन सहभागी होता. त्याने ‘एलटीटीई’ नेते किट्टू आणि बॅबी सुब्रमण्यमची भेट घेतली होती. हत्येतील अन्य दोषी सिवारासनला मदत करण्यासाठी त्याला पाठवण्यात आले होते. हत्येनंतर सिवारासन आणि इतरांना आश्रय देण्याचे आणि त्यांना मदत करण्याचे कामही त्याच्यावर सोपवण्यात आले होते.