एका महिलेने आत्मघातकी बॉम्ब वापरून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली. या हत्येच्या कटामागील मुख्य आरोपींमधील नलिनी श्रीहरन यांच्या Rajiv Assassination: Hidden truths and the meeting between Nalini and Priyanka या पुस्तकात काही नव्या गोष्टी उजेडात आल्या आहेत. राजीव गांधी हत्येप्रकरणी ३१ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर नलिनी श्रीहरन यांची सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली आहे. त्या कोण आहेत आणि या प्रकरणात त्यांची भूमिका काय होती? त्यांनी त्यांच्या पुस्तकात या खटल्याबद्दल काय म्हटले आहे? प्रियंका गांधी त्यांना भेटायला आल्यावर काय घडले, याचा सविस्तर लेखाजोखा यात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतातील सर्वात जास्त काळ शिक्षा भोगत असलेली महिला कैदी, नलिनी श्रीहरन, १९९१च्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहा दोषींपैकी एक होती, ज्यांच्या सुटकेचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ११ नोव्हेंबर २०२२ रोजी दिला होता. श्रीपेरुंबदुर येथे ती एकमेव आरोपी जिवंत होती. २१ मे १९९१ रोजी एलटीटीईच्या मानवी बॉम्बने राजीव गांधी यांची हत्या घडवून आणली. १२ नोव्हेंबर२०२२ रोजी ३१ वर्षांनंतर ती तुरुंगातून बाहेर पडली तेव्हा नलिनी कोण आहे आणि देशातील सर्वात वादग्रस्त प्रकरणात तिने कोणती भूमिका बजावली यावर एक नजर टाकणे समयोचित ठरावे आहे.

कोण आहेत नलिनी श्रीहरन?

इथिराज कॉलेजमधून इंग्रजी भाषा आणि साहित्याची पदवी घेतलेल्या नलिनी श्रीहरन चेन्नईतील एका खासगी कंपनीत काम करत होत्या. त्यांची आई पद्मावती ही व्यवसायाने परिचारिका होती आणि त्यांचे वडील पी शंकर नारायणन हे पोलीस निरीक्षक होते. या जोडप्याला झालेल्या तीन मुलांपैकी त्या सर्वात मोठ्या होत्या, पी शंकर नारायणन यांचा मृत्यू २०१६ साली झाला. नलिनी यांच्या पालकांमधील वैवाहिक समस्यांमुळे, त्यांचे बालपण बहुतांश दु:खात गेले. त्या किशोरवयात असतानाच त्यांच्या वडिलांनी वेगळे राहण्यासाठी घर सोडले.

या खटल्यातील इतर दोषींप्रमाणे, नलिनी किंवा तिच्या कुटुंबाचा कोणताही राजकीय संबंध नव्हता. काही मित्रांसोबतचा तिचा भाऊ बाग्यनाथन याच्या मैत्रीनेच श्रीहरन उर्फ ​​मुरुगनला तिच्या घरी आणले. मुरुगन हा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा (LTTE) सदस्य होता. नंतर तिने त्याच्याशी लग्न केले.

अधिक वाचा : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी काश्मीरमध्ये नेमके काय घडत होते?

राजीव गांधी हत्या प्रकरणात तिची भूमिका काय?

२१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी निवडणूक सभेत सहभागी होण्यासाठी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर येथे होते त्यावेळेस LTTE महिला आत्मघातकी बॉम्बरने त्यांची हत्या घडवून आणली. आत्मघातकी बॉम्बर म्हणून ओळखल्या जाणार्‍या धनूने रॅलीदरम्यान गांधींच्या जवळ जाऊन सलवार कमीजच्या आतमध्ये असलेल्या बॉम्बचा स्फोट करण्याआधी त्यांच्या पायाला हात लावल्याप्रमाणे वाकून नमस्कार केला. या स्फोटात गांधींव्यतिरिक्त जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते.

ताब्यात घेतल्यानंतर नलिनी यांनी टाडा न्यायालयात दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले की, हल्ला करणाऱ्या सुभा आणि धनू या दोन श्रीलंकन ​​महिला त्यांच्याच घरी थांबल्या होत्या. किंबहुना हत्येच्या दिवशी त्या दोन महिलांनी परिधान केलेले कपडे विकत घेण्यासाठी त्यांनीच मदत केली होती. हल्लेखोरांची योजना नलिनीला ठावूक होती अशा पोलिसांचा आरोप होता. नलिनी यांनी हत्येच्या दिवशी शिवरासन, सुभा, धनू आणि छायाचित्रकार एस हरिबाबू यांच्यासोबत बसने श्रीपेरुंबदूरला प्रवास केला होता. धनूने स्वत:ला उडवल्यानंतर नलिनी, सुभा आणि एलटीटीईचा मास्टरमाइंड शिवरासन पळून गेल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले. हरिबाबू हे देखील एलटीटीईचे सहानुभूतीदार होते आणि हत्येचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी त्यांना नियुक्त केले होते. हरिबाबूंच्या कॅमेऱ्यामुळेच नलिनीचा सहभाग उघड झाला होता.

हत्येनंतर अनेक दिवस लपून राहिलेल्या नलिनी आणि मुरुगन यांना १५ जून १९९१ रोजी चेन्नई सैदापेट बसस्थानकावरून अटक करण्यात आली. या कटातील नलिनीची भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये वादादीत विषय होता, तरीही राजीवच्या मारेकऱ्यांशी असलेल्या तिच्या जवळच्या संबंधांमुळे तिला या खटल्याच्या केंद्रस्थानी ठेवले गेले. अटक झाली त्यावेळी ती गरोदर होती.

तथापि, तिच्या आत्मचरित्रात्मक Rajiv Assassination: Hidden truths and the meeting between Nalini and Priyanka (इंग्रजी अनुवाद: पत्रकार एकलायवन) या पुस्तकात त्या नमूद करतात “आम्ही रस्त्यावर चालत होतो आणि मी एक मोठा स्फोट ऐकला. फटाके फोडून नेत्यांचे स्वागत करणे सामान्य होते, परंतु यामुळे परिसर उद्ध्वस्त होत होता. मी मागे वळून पाहिले आणि आकाश आणि जमीन यांच्यामध्ये आग आणि धुराचा गोळा दिसला. जागा गोंधळाने भरून गेली होती. लोक हतबलपणे धावत होते. मला खात्री आहे की चेंगराचेंगरीत बरेच लोक जखमी झाले असतील. काय घडले याबद्दल मी अजूनही अनभिज्ञ होते. थोड्या वेळाने शुबा थांबली. मी भीतीने थरथर कापत होते आणि माझा घसा सुकलेला होता. काय झाले ते मला अजूनही माहीत नाही, परंतु मला खात्री होती की काहीतरी चूक झाली आहे. लोक अजूनही घाबरून पळत होते.”

तिच्यावर काय आरोप होते?

टाडा न्यायालयाने १९९८ मध्ये नलिनी आणि श्रीहरन यांच्यासह २६ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मुख्य सूत्रधारांपैकी एकही जिवंत पकडला गेला नव्हता, नलिनीची आई पद्मावती आणि भाऊ बाग्यनाथन यांचा त्यात समावेश होता, ज्यांना १९९८ मध्ये टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. १९९९ साली सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मुक्तता केली परंतु न्यायालयाने नलिनी, मुरुगन आणि इतर पाच जणांच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली.

गुन्हेगारी कट (IPC चे कलम १२०बी) आणि खून अंतर्गत दोषी ठरवण्यात आले असले तरीही, नलिनीने तिच्या पुस्तकात लिहिले आहे की, तिला या हत्येच्या कटाबद्दल माहिती नव्हती. “मी त्याला सांगितले की मी गर्भवती आहे. तो इतका खूश होता की त्याने मला उचलून तो नाचूच लागला. हे सारे बॉम्बस्फोटाच्या आधी घडले होते.”

त्या नंतर आम्ही बाळाच्या नावांवरही चर्चा करत होतो. जर आम्हाला हे आधी ठावूक असते की एका मोठ्या नेत्याच्या हत्येच्या कटात आपण सामील आहोत, तर आम्ही बाळाबद्दल आनंद साजरा केला असता का? परिस्थिती खरंच तशी असती तर त्या पार्श्वभूमीवर भविष्याचा विचार करणे कुणालाही शक्य असते का? २१ मे रोजी मला सार्वजनिक सभेला एकटी पाठवल्यानंतर माझे पती शांतपणे झोपी गेले असते का?”.“कोणत्याही स्त्रीला जर माहीत असेल की तिच्या पहिल्या गर्भधारणेसाठी ते धोकादायक असू शकते तर अशा ठिकाणी ती का जाईल? तेव्हा मी पहिल्या तिमाहीत होते. मला माहीत होते की थोडासा धक्का देखील – किंवा लांबचा प्रवास – माझ्या गर्भधारणेसाठी धोकादायक ठरू शकतो. माझ्या आईला दाई म्हणून २५ वर्षांचा अनुभव आहे. माझी गर्भधारणा धोक्यात आणण्यासाठी मी काहीही केले नसते,” असे पुस्तकात त्या नमूद करतात.

त्यांच्यावर एक मोठा आरोप होता की त्यांच्या पतीने त्यांचे ब्रेनवॉश केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना त्या पुस्तकात म्हणतात, “आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून आमच्यात कोणतीही गोपनीयता नव्हती. आम्ही गोपनीयतेत भेटलो त्या दिवसांमधील आमचे संभाषण कबुलीजबाब म्हणून दिले गेले. ७ मे ते २१ मे च्या दुपारपर्यंत आम्ही एकदाही भेटलो नाही.

“१८ मे रोजी फक्त एकदाच, आम्ही माझ्या गरोदरपणाबद्दल आनंदाची देवाणघेवाण केली. या काळात त्याने माझे ब्रेनवॉश कसे केले असेल? अशा गोष्टीचा कोणताही पुरावा नाही. मला वाटते की आम्ही निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी हे पुरेसे आहे,” असे त्या पुस्तकात सांगतात.

अधिक वाचा : गांधीजी, गुजरात विद्यापीठ आणि ग्रामशिल्पी ! २१ व्या शतकातील ग्रामविकासाची नवी गुंफण

१९९९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली तेव्हा त्यांनी दोषींच्या शिक्षेच्या प्रमाणात स्वतंत्र निकाल दिला. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठातील बहुमताने नलिनीला फाशीच्या शिक्षेची पुष्टी केली, तर न्यायमूर्ती के टी थॉमस यांनी विरोध दर्शविला.

उपलब्ध पुराव्यांचा हवाला देवून, न्यायमूर्ती केटी थॉमस यांनी निरीक्षण नोंदवले की, नलिनी “एक अनभिज्ञ सहभागी” होती, जिला “केवळ श्रीपेरुंबुदुर येथे समजले की धनू ही राजीव गांधींना मारणार आहे”. दुसरं असं की ती माघार घेऊ शकली नसती कारण “तिला कटाच्या जाळ्यात अडकवले गेले होते”, आणि “शिवरसन आणि संथन यांनी त्यांच्या पाठीशी उभे न राहणाऱ्यांना संपवले होते,” असे न्यायमूर्ती थॉमस यांनी लिहिले आहे. असे असले तरी तामिळनाडू उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने नलिनी यांना हत्येच्या कटात स्वेच्छेने सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवले होते. २००० साली, सोनिया गांधी (राजीव गांधी यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा) यांच्या हस्तक्षेपामुळे नलिनीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. २०१४ मध्ये, सुप्रीम कोर्टाने इतर तिघांच्या फाशीची शिक्षा ही जन्मठेपेत बदलली आणि २०१८ मध्ये, तामिळनाडू सरकारने दोषींना सोडण्याची शिफारस राज्यपालांना केली.

तुरुंगात आयुष्य

जवळपास तीन दशके तुरुंगात घालवल्यानंतर, नलिनी त्यांच्या पुस्तकात कथित छळाबद्दल लिहितात, ज्यामध्ये तिला कोठडीत असताना छळवणूक आणि अनेक आठवडे एका खोलीत साखळदंडाने बांधून ठेवण्यात आले होते. गरोदर स्त्री म्हणून पोलिसांच्या हातून झालेल्या अत्याचाराबद्दलही त्या लिहितात. एका स्त्री रोग स्त्रीरोगतज्ज्ञाला पोलिसांनी गर्भपात करण्यासाठी सांगितले होते, पण तिने नकार दिला होता. त्यामुळे आजही मी त्या स्त्रीरोगतज्ज्ञांची माझ्या प्रार्थनेत दररोज आठवण काढते असे त्या नमूद करतात.

“माझी मुलगी दोन वर्षे तुरुंगात माझ्यासोबत होती आणि मी ठरवले की तिचे नशीब माझ्यासारखे होऊ नये. आणि म्हणूनच मी तिला माझ्या मित्राच्या आईसोबत पाठवले. तुरुंगात एका अधिकार्‍याने माझ्या मुलीच्या जन्मापूर्वीच शरीरविक्रय व्यवसयात ढकलून देईन, अशी धमकी दिली होती.माझ्या मुलीने काय चूक केली? मी तिला माझ्यासोबत तुरुंगात कसे राहू देऊ शकेन?”, असे ही त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे.

तुरुंगात असताना त्यांनी एमसीए पदवी, ब्युटीशियन प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केला आणि त्या एक मान्यताप्राप्त टेलर आणि योग प्रशिक्षक आहे.

गेल्या २९ वर्षात, नलिनी फक्त दोनदा तुरुंगातून बाहेर पडल्या- पहिल्यांदा २०१६ साली, १२ तासांसाठी, वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी आणि दुसऱ्यांदा जुलै २०१९ साली, जेव्हा त्यांना त्यांच्या मुलीच्या हरिताच्या लग्नाची व्यवस्था करायची होती, त्या साठी त्यांना ५१ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता.

२७ नोव्हेंबर २०१९ रोजी, नलिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अमरेश्वर प्रताप साही आणि तामिळनाडूच्या गृह सचिव कार्यालयाला पत्र लिहून दयेची मागणी केली. त्यांची सुटका झाल्यानंतर त्या म्हणाल्या, “माझ्या अटकेच्या पहिल्या दिवसापासून मी माझ्या सुटकेसाठी प्रयत्न करत होते. मला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला, मी माझे जीवन संपवण्याचा विचारही केला होता… पण प्रत्येक वेळी मी नवीन पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला.”

राजीव गांधी यांची कन्या प्रियांका गांधी यांनी २००८ मध्ये नलिनी यांना भेटण्यासाठी वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात भेट दिली होती. त्याबद्दल बोलताना नलिनी म्हणाल्या की हे अविश्वसनीय होते. “माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी मला तिला स्पर्श करावा लागला… ती देवदूतासारखी होती… मला भीती वाटत होती… तिला तिच्या वडिलांच्या हत्येबद्दल मला विचारायचे होते. ती रडली. मला जे काही माहीत होते ते मी तिला सांगितले. ती परत आल्यानंतर मी घाबरले. मी तिला (दिल्लीला) सुरक्षित परतण्यासाठी प्रार्थना केली आणि उपवासही केला,” असे नलिनी लिहितात.

नलिनी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना, एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, तिने वड्रा यांना या प्रकरणाबद्दल जे काही माहीत होते ते सांगितले. प्रियांका वड्रा मजबूत दिसल्या किंवा “भावनिकपणे रडल्या” असे विचारले असता नलिनी म्हणाल्या : “होय, त्या खूप भावनिक होत्या.”

भविष्यातील योजना

नलिनी म्हणाल्या की, त्यांची पहिली प्राथमिकता म्हणजे त्यांचे पती मुरुगन यांची त्रिची येथील विशेष निर्वासित तुरुंगातील शिबिरातून औपचारिक सुटका करणे आणि त्यांना यूकेमध्ये राहणाऱ्या ग्रीन कार्डधारक त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा मिळवून देणे. नलिनीला त्यांच्या मुलीला भेटून तिथेच राहायचे आहे. “ते माझे पहिले प्राधान्य आहे. माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे… मला ते तुकडे- तुकडे गोळा करावे लागतील. आम्ही तात्काळ पासपोर्ट आणि कागदपत्रांसाठी श्रीलंकेच्या उच्चायुक्तांकडे संपर्क साधू जेणेकरून आमची मुलगी आम्हाला यूकेला घेवून जाऊ शकेल,”

नलिनी म्हणाल्या, आमच्या अटकेनंतर खटला पूर्ण व्हायला सात वर्षे लागली. २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने तीन दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली, त्याचा संदर्भ देत त्या सांगतात, तो त्यांच्या “न्यायासाठीच्या लढ्याचा” आणि सुटकेचा “महत्त्वपूर्ण अध्याय” होता. नलिनी सांगतात, प्रत्येक टप्प्यावर कायदेशीर प्रक्रिया नेहमीच न संपणारी असते. “आमच्या अटकेनंतर खटला पूर्ण व्हायला सात वर्षे लागली. २०१४ च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर, आमच्या सुटकेसाठी आणखी आठ वर्षे लागली… आम्हाला फाशीची शिक्षा सुनावण्याआधीही, आमच्या सर्वांना फाशीच्या कैद्यांसारखे वागवले गेले आणि एकांतात ठेवले गेले. मी गरोदर असताना मला चालण्याची परवानगी मिळवण्यासाठी डॉक्टरांनी हस्तक्षेप केला होता, म्हणून मला ती मिळाली. अशाप्रकारे खूप वाईट व वेदनादायी दिवसांना सामोरे जावे लागले. मात्र या काळात माणसातील मानवतेचाही प्रत्यय आला!