Rajnath Singh on 1965 War: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे अलीकडेच म्हणाले की, १९६५ साली झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धानंतर भारत सरकारने सैनिकांनी मिळवलेल्या धोरणात्मक यशाचा चर्चेच्या व्यासपीठावर योग्य वापर केला असता तर, सीमा ओलांडून होणारी घुसखोरीची समस्या सोडवता आली असती. १४ जानेवारीला जम्मूच्या अखनूर येथे आयोजित केलेल्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “१९६५ साली भारतीय सैन्याने हाजी पीर येथे तिरंगा फडकवण्यात यश मिळवले होते आणि त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर ते स्थळ परत दिले गेले नसते, तर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे मार्ग बंद करता आले असते.” मात्र, त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “ही कोणत्याही प्रकारची टीका नाही; जे काही घडले, त्यामागे काहीतरी विचार नक्कीच असणार आणि यावर मी येथे चर्चा करू इच्छित नाही.” १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्ध का झाले? त्यानंतर काय घडले आणि घुसखोरी रोखण्यासाठी हाजी पीरचे महत्त्व काय आहे? याचा घेतलेला हा आढावा.

जम्मू आणि काश्मीरमधील घुसखोरीची समस्या

भारत आणि पाकिस्तानदरम्यान ७४० किमी लांब नियंत्रणरेषा (LoC) आहे. ही नियंत्रणरेषा जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांतून जाते. जम्मू-काश्मीरमधील ५४० किमी लांब नियंत्रणरेषेवर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांची घुसखोरी, शस्त्र, दारूगोळा आणि अंमली पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी काटेरी तारांचे कुंपण उभारले आहे. याबरोबरच भारतीय सैन्याच्या २४x७ सतर्कतेनंतरही, काहीवेळा दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा तसेच शस्त्र आणि अमली पदार्थांची तस्करी करण्याचा मार्ग शोधतात. नियंत्रणरेषेवरील खडतर पर्वतीय भागातील नाले आणि दाट जंगल ही नैसर्गिक संरक्षण यंत्रणा म्हणून काम करतात. संरक्षण तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, या घुसखोरीला पाकव्याप्त काश्मीरच्या बाजूला असलेल्या हाजी पीर खिंडीद्वारे मदत होते. पिर पंजाल पर्वतरांगेच्या पश्चिम टोकावरील ८६६१ फूट उंचीवरील हाजी पीर खिंड पाकिस्तानच्या ताब्यात असल्याने शेजारील देशाला महत्त्वपूर्ण भौगोलिक सामरिक फायदा मिळतो.

Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mumbai police Saif Ali Khan attacker thane CCTV cameras
सीसीटीव्ही कॅमेरे, जी-पे चा वापर नि मोबाइल क्रमांक…अभिनेता सैफ अली खानच्या हल्लेखोरापर्यंत मुंबई पोलीस ठाण्यात कसे पोहोचले?
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Saif ali Khan Attacker attack
Saif Ali Khan : एका पराठ्यामुळे सापडला सैफचा हल्लेखोर; पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? वाचा घटनाक्रम!
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!
Bangladesh Army violence against Hindu
Video: बांगलादेशी सैन्याचे हिंदूंवर अत्याचार; चितगावमध्ये ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

ऑपरेशन जिब्राल्टर

१९६५ साली ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानी सैनिकांनी स्थानिक नागरिकांच्या वेशात काश्मीरमध्ये घुसखोरी केली. त्यांच्यासाठी हाजी पीर खिंड हा त्यांचा एक प्रमुख मार्ग होता. योजना अशी होती की, काश्मीरमधील मुस्लीमबहुल लोकसंख्येला भारत सरकारविरुद्ध बंड पुकारण्यासाठी उद्युक्त करायचे. पाकिस्तानला वाटले की, स्थानिक लोकसंख्येच्या या बंडामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्नासंबंधी त्यांना फायदा होईल. त्यांच्या लष्करी योजनेनुसार, काही तुकड्या काश्मीर खोऱ्याभोवतीच्या महत्त्वाच्या उंच ठिकाणी तळ ठोकतील, तर इतर तुकड्या स्थानिक लोकांमध्ये मिसळून भारतीय लष्कराच्या पुलांना, महामार्गांना, दळणवळणाच्या आणि रसद पुरवण्याच्या सुविधांना उद्ध्वस्त करतील. यामुळे भारतीय सरकारविरुद्ध स्थानिक उठाव झाल्याचे चित्र निर्माण होईल. परंतु, ही मोहीम सुरुवातीपासूनच अयशस्वी ठरली. कारण स्थानिक काश्मिरी लोकांनी बंड पुकारले नाही आणि त्याऐवजी पाकिस्तानी घुसखोरांच्या उपस्थितीची माहिती लष्कर आणि पोलिसांना दिली. परिणामी, अधिक सैनिकांना काश्मीर खोऱ्यात पाठवण्यात आले. त्यामुळे बहुतेक घुसखोरांना पकडण्यात आले किंवा ठार मारले गेले.

१९६५ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धानंतर सरकारने अनेक स्थानिक लोकांचा मदतीसाठी सन्मान केला.

तंगमार्ग येथील दरकासी गावातील तरुण मोहम्मद दीन हा गुरांना घेऊन तोषा मैदान येथे गेला होता. त्याला तिथे पाकिस्तानी घुसखोर भेटले. त्या घुसखोरांनी त्याला त्यांच्यासाठी काही वस्तू खरेदी करण्यास सांगितल्या. या वस्तूंमध्ये फेऱणचा (काश्मीरचा स्थानिक पोशाख) देखील समावेश होता. परंतु, मोहम्मद दीन याने ही माहिती भारतीय लष्कराला दिली. युद्धानंतर, मोहम्मद दीन यांना त्यांच्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. मात्र, १९९० साली दहशतवादी मोहिमांच्या सुरुवातीच्या काळात दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. सीमावर्ती दलन गावातील सरपंच गुलाम दिन यांनी भारतीय सैन्याला पाकिस्तानी सैन्याच्या नजरेत न पडता हाजी पीरपर्यंत पोहोचण्यास मदत केली. त्यांना शांततेच्या काळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले.

१९६५ भारत-पाकिस्तान युद्ध

भारतीय सैन्याने १५ ऑगस्टला नियंत्रणरेषा ओलांडली आणि कारगिल सेक्टरमधील तीन महत्त्वाच्या डोंगर काबीज केले. हे डोंगर श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर नजर ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. २८ ऑगस्टपर्यंत भारतीय सैन्याने संपूर्ण हाजी पीर बुल्ज आणि हाजी पीर खिंड जिंकली. जी पाकव्याप्त काश्मीरच्या सुमारे ८ किमी आत होती. हाजी पीर खिंड जिंकणे हे भारताचे एक मोठे सामरिक यश होते. कारण, यामुळे केवळ पाकिस्तानच्या रसद यंत्रणेला धक्का बसला नाही तर घुसखोरीचे मार्ग बंद झाले आणि पूंछ-उरी मार्ग भारताच्या नियंत्रणाखाली आला. त्यामुळे या दोन सीमावर्ती शहरांमधील अंतर २८२ किमीवरून ५६ किमीपर्यंत कमी झाले. ऑपरेशन जिब्राल्टरच्या अपयशानंतर पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन ग्रँड स्लॅम सुरू केले. १ सप्टेंबर १९६५ च्या पहाटे पाकिस्तानी लष्कराने अखनूरवर मोठ्या सैन्यदलाच्या मदतीने हल्ला केला. त्यांची योजना अखनूरमधील चिनाब नदीवरील एकमेव पूल ताब्यात घेण्याची होती. ज्यामुळे पिर पंजालच्या दक्षिणेस तैनात भारतीय सैन्याला रसद पुरवठा रोखता आली असती. अखनूर ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानी सैन्य जम्मूकडे जाण्याची आणि काश्मीरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर नियंत्रण मिळवण्याची योजना आखत होते. सुरुवातीच्या आक्रमणात त्यांनी चंब (चुम्ब) ताब्यात घेतले. अमेरिकेच्या मदतीमुळे पाकिस्तानी सैन्याकडे उत्कृष्ट तोफखाना, बख्तरबंद वाहने आणि पायदळ होते. मात्र, अखनूरवर हल्ला सुरू ठेवताना, भारतीय लष्कराने युद्ध पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या आत नेले. त्यांनी पाकिस्तानमध्ये नवीन मोर्चा उघडला आणि सियालकोटपर्यंत पुढे गेले आणि लाहोरजवळ पोहोचले. यामुळे पाकिस्तानला काश्मीरमधून आपले सैन्य लाहोरच्या संरक्षणासाठी वळवावे लागले.

ताश्कंद करार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १७ दिवसांचे युद्ध २० सप्टेंबर १९६५ रोजी शस्त्रसंधीनंतर थांबले. यानंतर १० जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद करार झाला. ज्यामध्ये दोन्ही देशांनी ऑगस्टपूर्वीच्या स्थितीकडे परत जाण्यास सहमती दर्शवली. त्या वेळी भारताने सियालकोट, लाहोर आणि काश्मीर क्षेत्रातील सुपीक भूमीसह, हाजी पीर खिंडसारख्या सामरिक महत्त्वाच्या भागांचा समावेश असलेल्या १,९२० चौरस किमी पाकिस्तानी प्रदेशावर कब्जा केला होता. पाकिस्तानने भारताच्या ५५० चौरस किमी प्रदेशावर ताबा मिळवला होता. जो मुख्यतः सिंध प्रांतालगतच्या वाळवंटात आणि अखनूरमधील चंब भागात होता. १९६५ चे युद्ध पाकिस्तानसाठी सामरिक आणि राजकीय पराभव करणारे ठरले. काश्मीरमध्ये बंड पुकारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि लाहोरच्या संरक्षणासाठी सैन्य वळवण्यास भाग पाडले गेले. ताश्कंद करारादरम्यान भारताने हाजी पीरसह जिंकलेले भाग पाकिस्तानला परत केले. हाजी पीर परत केल्यामुळे पाकिस्तानला जम्मूमधील नियंत्रणरेषेवर पुन्हा सामरिक लाभ मिळाला. पाकिस्तानने चंब रिकामे केले परंतु १९७१ च्या युद्धात भारताने तो प्रदेश पुन्हा गमावला. तो सध्या पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा (PoK) भाग आहे.

Story img Loader