Rajpath Name History in Marathi : ब्रिटिशकालीन वसाहतवादाची सर्व चिन्ह हद्दपार करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात व्यक्त केला. त्यानंतर नौदलाच्या झेंड्यावर असणारे ब्रिटिश क्रॉस देखील हटवण्यात येऊन तिथे छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन बदल करण्यात आले. मात्र, आता राजधानी दिल्लीतील राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ करण्याची तयारी केंद्र सराकरनं सुरू केली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. राजपथाचं नुकतंच नुतनीकरण करण्यात आलं असून त्याअनुषंगाने त्याचं नाव देखील लवकरच बदलण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीचा राजपथ हे भारतीयांसाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आकर्षणाचं आणि अभिमानाचं ठिकाण राहिलं आहे. त्यामुळे राजपथाचं नाव बदलण्याचा केंद्र सरकारचा विचार हा चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नेमका राजपथाचा इतिहास काय आहे? किंग जॉर्ज पाचवे यांच्या नावावरून या रस्त्याचं नाव सुरुवातीला किंग्जवे ठेवण्यात आलं होतं. तिथून आजच्या राजपथापर्यंत (आणि कर्तव्यपथ नाव बदलल्यास तिथपर्यंत!) या रस्त्याचा प्रवास नेमका कसा राहिला? जाणून घेऊयात..

PM Modi Inaugurates Grand ISKCON Temple in Navi mumbai
देशाच्या केंद्रस्थानी अध्यात्म!‘इस्कॉन’ मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Mumbai Ravi Raja opposed for Municipal administration decided to tax commercial slums
व्यावसायिक स्वरुपाच्या झोपड्यांना मालमत्ता कर लावण्यास विरोध, माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचे आयुक्तांना पत्र
वाढवण-इगतपुरी द्रुतगती महामार्गाचे संरेखन निश्चित
pm Narendra modi loksatta news
PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
z morch tunnel
सामरिक महत्त्व असलेल्या ‘झेड मोढ’ बोगद्याचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; याचे वैशिष्ट्य आणि फायदे काय?
Conditional possession to eligible tenants on comprehensive list decision of MHADA Vice Chairman
बृहतसूचीवरील पात्र भाडेकरुंना सशर्त ताबा, म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय

राजपथाचं किंग जॉर्जशी असलेलं नातं!

दिल्लीच्या राजपथाला स्वातंत्र्यपूर्व काळात ‘किंग्जवे’ असं नाव होतं. १९११मध्ये किंग्ज जॉर्ज पाचवे भारताच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी अनेक चर्चा आणि फिरस्तीनंतर ब्रिटिशांची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवली. यावेळी दिल्लीची ब्रिटिश राजवटीच्या राजधानीला साजेशी उभारणी करण्याचं काम त्यांनी एडविन ल्युटेन्स नावाच्या मुख्य अभियंत्याकडे सोपवलं. यामध्ये सर्वात आकर्षक गोष्ट कुठली ठरली तर तरी रायसिना हिल्सवर बांधण्यात आलेलं व्हाईसरॉय हाऊस अर्थात आत्ताचं राष्ट्रपती भवन!

व्हाईसरॉय हाऊसपासून विजय चौक, इंडिया गेट आणि तिथून थेट पुराना किलापर्यंत एक प्रशस्त रुंद आणि दुतर्फा झाडे असणारा रस्ता बांधण्यात आला. या रस्त्याला किंग्ज जॉर्ज पाचवे यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने ‘किंग्जवे’ असं नाव देण्यात आलं. व्हाईसरॉय हाऊसमधून थेट पुराना किलापर्यंत नजर जावी अशा पद्धतीने या रस्त्याची रचना करण्यात आली. या रस्त्याच्या बाजूला व्हाईसरॉय हाऊसच्या दिशेने डावीकडे जामा मशिद तर उजवीकडे सफदरजंग कबर आणि समोर इंडिया गेटमधून थेट पुराना किला असं विस्तीर्ण दृश्य दिसत होतं.

विश्लेषण : लडाखमध्ये साकारले जात आहे देशातले पहिले ‘आकाश निरीक्षणासाठी राखीव क्षेत्र’ (Dark Sky Reserve)

क्वीन्सवे

प्रशस्त असा किंग्जवे बांधल्यानंतर त्याला छेदून जाणाऱ्या रस्त्याला ‘क्वीन्सवे’ असं नाव देण्यात आलं. याच क्वीन्सवेचं स्वातंत्र्यानंतर जनपथ असं नामकरण करण्यात आलं.

दिल्लीतील इतर रस्त्यांची नावे

एडविन ल्युटेन्स यांनी नव्या दिल्लीची राजधानीसाठी रचना केली, तेव्हा इथल्या रस्त्यांना देखील वेगळी नावं देण्यात आली होती. किंग्जवे आणि क्वीन्सवेसोबत ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या नावावरून रस्त्यांची नावे ठरवण्यात आली होती. त्यात प्रिन्स एडवर्ड रोड (आत्ताचा विजय चौक), क्वीन व्हिक्टोरिया रोड (आत्ताचा डॉ. राजेंद्र प्रसाद रोड) आणि किंग जॉर्ज अव्हेन्यू (आत्ताचा राजाजी मार्ग) अशा काही उदाहरणांचा दाखला देता येईल. या रस्त्यांची नावे देखील किंग्जवेप्रमाणेच स्वातंत्र्यानंतर बदलण्यात आली. मात्र, यासोबतच भारतातील मुघल आणि हिंदू शासकांच्या नावावरून देखील रस्त्यांची नावे देण्यात आली. त्यामध्ये फिरोज शाह रोड, पृथ्वीराज रोड, लोदी रोड, औरंगजेब रोड अशा रस्त्यांचा समावेश आहे.

पॅरिसमधील चॅम्प्स एलिसीस किंवा वॉशिंग्टन डीसीमधील नॅशनल मॉलच्या धर्तीवर दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाची रचना करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात या रस्त्याच्या आसपासच्या लॉन्सवर अनेक ब्रिटिश आणि उच्चवर्गीय भारतीय कुटुंब खुर्च्या-टेबलं ठेवून तिथल्या रम्य वातावरणाचा आस्वाद घेताना दिसत असत. कालांतराने त्यामध्ये बदल होत गेले.

विश्लेषण : ‘आम्हाला शिकवू द्या’ ही चळवळ काय आहे? शिक्षक का बनले अगतिक?

स्वातंत्रपूर्व काळात ब्रिटिश राजवटीची भव्यता दाखवण्यासाठी रचना करण्यात आलेल्या या किंग्जवेवर स्वातंत्र्यानंतर भारतीय सामर्थ्याचं जगाला दर्शन घडवणारं पथसंचलन दरवर्षी स्वातंत्र्यदिनी होऊ लागलं. दिल्लीतील इतर अनेक चौक आणि रस्त्यांच्या नावांप्रमाणेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर किंग्जवेचं नाव बदलून राजपथ ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासून राजपथ हे आख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेणारं ठिकाण ठरलं. त्यामुळेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील अनेक आंदोलकांनी आपली भूमिका मांडण्यासाठी राजपथाचा आधार घेतला. आता मात्र, राजपथ हे भारत सरकारनेच दिलेलं नाव बदलून या ऐतिहासिक रस्त्याचा प्रवास ‘कर्तव्यपथ’ या नव्या नावाच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीतील नामफलकाप्रमाणेच या रस्त्याच्या इतिहासात देखील हे नाव नव्याने समाविष्ट करावं लागले, हे निश्चित!

Story img Loader