What is meaning of Ghodebajar or Horse Trading: राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असून १० जून २०२२ रोजी राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election 2022) मतदान होणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांच्या तोंडून एकमेकांवर टीका करताना एक शब्द आवर्जून असतो आणि तो म्हणजे, ‘घोडेबाजार!’ अगदी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घोडेबाजाराबद्दल व्यक्त केलेली शक्यता असू त्यात किंवा आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधताना, “भाजपाचे सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फसले असल्यामुळे सध्या घोडेबाजार करायच्या मनस्थितीत दिसते. तोच प्रयत्न राज्यसभा निवडणुकीत चालला आहे,” वापरलेलं हे वाक्य असून द्यात. घोडेबाजार हा शब्द निवडणुका आणि त्यांच्या आजूबाजूला किंवा एखादं सरकार पडल्यानंतर कायमच ऐकायला मिळतो. मात्र या घोडेबाजारचा अर्थ काय?

नक्की वाचा >> विश्लेषण: विशेष पेन अन् एक चूक झाली तरी मत बाद…; नेमक्या कशापद्धतीने आमदार राज्यसभा निवडणुकीत करतात मतदान?

घोडेबाजारचा राजकारणाशी काय संबंध आहे असा तुम्ही कधी विचार केलाय का? यंदाच्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सात उमेदवार असल्याने चुरस अधिक वाढली असून मागील २४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यसभेसाठी मतदान पार पडणार आहे. यापूर्वी २४ वर्ष नेहमीच बिनविरोध पद्धतीने ही निवडणूक पार पडली आहे. त्यामुळेच यंदा महाविकास आघाडी किंवा भाजपाची मते फुटणार का, अपक्ष किंवा छोट्या पक्षांचे आमदार पाठिंबा दिलेल्या पक्षांबरोबर ठाम राहणार का, असे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित झाले असून घोडेबाजाराबद्दल फार बोललं जातंय. याच घोडेबाजारचा आणि त्याच्या उत्पत्तीपासून अर्थापर्यंतचा घेतलेला हा आढावा…

Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Sameer Vidwans on Democracy
“समुहाने निवडून दिलेली राजेशाही…”, निवडणुकीनंतर मराठी दिग्दर्शकाची सूचक पोस्ट; म्हणाला, “लोकशाहीच्या नावाखाली…”
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन

शब्दाची उत्पत्ती कशी झाली?
अरबी घोडे हे आजही अतिशय उच्च प्रतीचे मानले जातात. पाश्चिमात्य देशांमध्ये पूर्वी या घोड्यांना फार मागणी होती. या घोड्यांचा मोठ्याप्रमाणात तिथे व्यापार चालायचा. व्यापारी लोक जहाजांनी घोडे घेऊन जायचे आणि तिथे घोड्यांचा लिलाव करायचे. जितक्या चांगल्या प्रतीचा घोडा तितका जास्त पैसा असं हे गणित होतं. या व्यापारामधून व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळायचा. याच व्यापारामधून आणि लिलावामधून हॉर्स ट्रेडिंग हा शब्द जन्माला आला.

केम्ब्रिज शब्दकोषामधील अर्थ काय?
केम्ब्रिज शब्दकोषामध्ये हॉर्स ट्रेडिंगचा अर्थ एकादा असा सौदा ज्यामध्ये दोन्ही पक्ष आपल्या नफ्याबद्दल विचार करत असतात असा आहे. राजकारणामध्ये जेव्हा एखादा विरोधी पक्ष एखाद्या समोरच्या पक्षातील आमदाराला कोणतंही प्रलोभन देऊन आपल्या बाजूने भूमिका घेण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करतो त्याला हॉर्ड ट्रेडिंग म्हटलं जातं. हा फायदा आर्थिक असण्याबरोबरच पद आणि इतर गोष्टींचाही असू शकतो.

व्यापारी करु लागले चालाखी
१८२० च्या आसपास या घोड्यांच्या व्यापारामधून सरसकट पैसे कमवण्याऐवजी लपवाछपवी करुन व्यापारी पैसे कमवू लागले. म्हणजे आधीप्रमाणे सर्व घोडे एकत्र लिलावात उतरवण्याऐवजी काही चांगल्या प्रतीचे घोडे ते राखून ठेवत आणि इतर घोडे विकून झाल्यावर अधिकच्या किंमतीला जास्तीत जास्त नफ्यावर या उरलेल्या घोड्यांचा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, मर्यादित (लिमिटेड एडीशन) अशाप्रकारे लिलाव करायचे. तेव्हापासूनच हा शब्द जास्त प्रमाणात वापरला जाऊ लागला. म्हणजे घेणाऱ्याला चांगल्या प्रतीचा घोडा मिळतो आणि विकणाऱ्याला अधिक पैसे मिळतात. यामधून दोघांचाही फायदा होता. मात्र या व्यवहारामध्ये पैशांचा अखेरचा सौदा होईपर्यत फार मोठ्याप्रमाणात किंमतीबद्दल घासाघीश (बार्गेनिंग) केली जायची. त्यामुळेच घोडेबाजाराकडे दोघांच्या दृष्टीने फायद्याचा सौदा या अर्थानेही पाहिलं जातं असलं तरी त्याकडे सौदेबाजी या अर्थानेही पाहिलं जातं.

भारतामध्ये हा शब्द कधीपासून प्रचलित झाला?
१९९० च्या आसपास आपल्या देशात युती आणि आघाडीची सरकारं स्थापन होऊ लागली. केवळ देश पातळीवर नाही राज्य पातळीवरही हेच चित्र दिसू लागलं. जेव्हा दोन किंवा अधिक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात तेव्हा आमदारांची जुळवाजुळव ही फार मोठी डोकेदुखी राजकीय पक्षांसमोर असते. त्यामुळेच आमदारांनी आपल्या बाजूने यावे यासाठी आर्थिक प्रलोभने दाखवली जातात. अनेकदा आमदार आर्थिक लाभासाठी पक्षही बदलल्याची उदाहरणं पुर्वी पहायला मिळायची. त्याचवेळेस हा व्यवहार घोडेबाजाराप्रमाणे दोघांचाही फायदा समजला जायचा. पक्षाच्या बाजूने आमदार उभा राहणार असल्याने पक्षाचं पाठबळ वाढलं तर दुसरीकडे आमदाराच्या दृष्टीने कोणत्या कोणत्या माध्यमातून आपल्याला पक्षाकडून फायदा झाला असं मानलं जायचं. याच कारणामुळे अशापद्धतीच्या देवाण घेवाणीच्या राजकारणाला घोडेबाजार हा शब्द प्रचलित झाला.

आयाराम गयाराममधील गया हे नाव एका आमदाराचं आहे
हिंदीमध्ये अशाप्रकारे दल बदलणाऱ्या लोकप्रतिनिधींना दलबदलू किंवा आयाराम गयाराम असे शब्द आहेत. यामधील गयाराम शब्दाचाही रंजक इतिहास आहे. हरियाणाचे माजी आमदार गया लाल यांच्या नावावरुन हा शब्द प्रचलित झाल्याचं सांगितलं जातं. १९६७ मध्ये गया लाल यांनी एका दिवसात एक दोन नाही तर तब्बल तीन पक्ष बदलले होते. तेव्हापासूनच हिंदीमध्ये अशाप्रकारे पक्ष सोडून जातो त्याला आयाराम गयाराम असं म्हटलं जातं.

हॉटेलमध्ये एकत्र का ठेवलं जातं?
एखाद्या महत्वाच्या निवडणुकीमध्ये किंवा अगदी अटीतटीची निवडणूक असल्यास मोठ्या पक्षांना संख्याबळ कमी पडत असेल तर समोरच्या पक्षातील लोकप्रतिनिधींना पैसा, पद किंवा आश्वासन यापैकी एकाचा आधार घेत प्रलोभनं दाखवली जातात. त्या माध्यमातून त्या आमदाराचा फायदा होतो आणि पाठिंबा मिळाल्याने पक्षाचा फायदा होता. अगदी पूर्वीच्याकाळी घोडेबाजारात व्हायचा तसा. जर दोघांनी सहमती दर्शवली तर आमदार ऐनवेळी संबंधित पक्षाला साजेशी भूमिका घेतो. दाक्षिणात्य राज्यांमध्ये अनेकदा सरकार पडल्यावर किंवा पाडण्यासाठी आमदारांची पळवापळवी केली जाते. मध्यंतरी राजस्थानमध्ये अशाप्रकारे आमदारांची पळवापळवी झालेली. त्यावेळी असा घोडेबाजार रोखण्यासाठी सर्व आमदारांना फाइव्हस्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं. अशाप्रकारे आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवणल्याचंही आता अनेकदा पहायला मिळतं.

अशा निवडणुकांच्या काळामध्ये आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यामागील मुख्य कारण म्हणजे घोडेबाजार टाळणं. या कालावधीमध्ये सामान्यपणे आमदारांना बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यापासून मज्जाव केला जातो. काही नियम आणि अटी त्यांना अशाप्रकारे एकत्र राहून पाळाव्या लागतात. निवडणूक झाल्यानंतर आमदारांना पुन्हा पुर्वीप्रमाणे लोकांना भेटण्याची वगैरे संमती असते.

Story img Loader