Ramabai Bhimrao Ambedkar birth anniversary घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘पाकिस्तान ऑर द पार्टीशन ऑफ इंडिया’ हे पुस्तक पत्नी रमाबाई यांना समर्पित केले आहे; या पुस्तकाच्या समर्पण पत्रिकेत बाबासाहेब रमाबाईं विषयीच्या आपल्या भावना प्रकट करतात. समर्पणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात;
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
“ इन्स्क्राइब्ड टू द मेमरी ऑफ रामू
“अॅज अ टोकन ऑफ माय अप्रेसिएशन ऑफ हर गुडनेस ऑफ हर्ट, हर नोबिलिटी ऑफ माईंड अँड हर प्युरिटी ऑफ कॅरेक्टर अँड ऑल्सो फॉर द कुल फोर्टीट्यूड अँड रेडीनेस टू सफर अलॉन्ग विथ मी विच शी शोड इन दोज फ्रेंडलेस डेज ऑफ वॉन्ट अँड वरिज विच फेल टू अवर लॉट”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या समर्पणात त्यांना रमाबाईंबद्दल वाटणारा अत्यंत आदर प्रकट केला आहे, त्यांच्या जीवनात त्यांची असणारी महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे. त्यांना रमाबाईंचा चांगुलपणा आठवत आहे, त्यांची दुःख सहन करण्याची तयारी आणि शांत धीरोदात्त स्वभाव यांचा संदर्भ ते देत आहेत. कठीण प्रसंगात त्यांच्याकडे एकही मित्र नव्हता, ते दोघेच एकमेकांचे मित्र होते. या समर्पणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दर्शवलेली रमाई प्रति कृतज्ञता व्यक्त होत आहे.
रमाईंचा जन्म आणि बालपण
रमाबाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी वडील भिकू धुत्रे (वलंगकर) आणि आई रुक्मिणी धुत्रे यांच्या पोटी द्वितीय कन्येच्या रूपात झाला. त्यांचे वडील मजूर होते, दाभोळ बंदरातून माशांच्या टोपल्या बाजारात नेऊन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत. रमाबाई त्यांच्या तीन भावंडांसह गोराबाई, मीराबाई आणि शंकर दाभोळजवळील वणंद गावात राहत होत्या. त्यांनी बालपणातच आई गमावली आणि त्यानंतर काही वर्षातच वडिलांचे छत्र ही हरपले. डॉ. आंबेडकर प्रेमाने आपल्या पत्नीला रमाबाईंना रामू म्हणून संबोधत असत, तर त्या त्यांना साहेब म्हणत होत्या. त्यांनी २७ वर्षे खंबीरपणे बाबासाहेबांना साथ दिली. डॉ. आंबेडकर १४ आणि रमाबाई ९ वर्षांच्या असताना १९०६ मध्ये त्यांचा विवाह झाला, रमाबाईंचे लग्नापूर्वीचे नाव रामीबाई होते. लग्नानंतर नाव रमाबाई असे ठेवण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांना “रमाई” म्हणून संबोधतात.
गाठ लग्नाची; साथ आयुष्यभराची
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९०६ मध्ये रमाबाईंशी विवाह केला. ते त्यावेळी एल्फिन्स्टन हायस्कूलचे विद्यार्थी होते. बॉम्बेच्या (आता मुंबई) भायखळा बाजार (मछली बाजार) येथे हा विवाहसोहळा पार पडला. वराचे कुटुंब बाजाराच्या एका कोपऱ्यात आणि वधूचे दुसऱ्या कोपऱ्यात जमले. ज्या मंचावर विधी पार पडत होते, त्या मंचाजवळील नाल्यातून दूषित पाणी वाहत होते. या लग्न सोहळ्याचे वर्णन धनंजय कीर यांनी आपल्या पुस्तकात केले आहे. डॉ. आंबेडकर आणि रमाबाई यांचा विवाह १९०६ साली झालेला असला तरी, १९१७ साली ज्या वेळी बाबासाहेब लंडनहून मुंबईला परत आले, त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली. सुमारे अडीच वर्षे मुंबईत रमाबाईंबरोबर राहिल्यानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण पूर्ण करण्यासाठी १९२० मध्ये लंडनला रवाना झाले. आंबेडकरांच्या लंडनला जाण्याने रमाबाईंना नवीन संकटाना सामोरे जावे लागले. साऱ्या कुटुंबाचा भार त्यांच्यावर पडला.
उपासमारीची कथा सांगणारे ते पत्र
आंबेडकर दाम्पत्याला आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले. बाबासाहेब दुसऱ्यांदा १९२० मध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले, त्यावेळी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी रमाबाईंवर पडली. जाण्यापूर्वी काही रोख रक्कम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रमाबाईंना दिली होती, परंतु ती लवकरच संपुष्टात आली. त्यावेळी मोठ्या कष्टाने ८-१० आणेच घरी येते होते. या तुटपुंज्या पैशातच त्यांनी घरातील सदस्यांची पोटे भरण्याचा प्रयत्न केला. तो काळ त्यांच्यासाठी कठीण होता. या कठीण काळात अनेकदा त्यांना उपाशी पोटी झोपावे लागत होते. रमाबाई भारतात कुटुंबासाठी दिवसातून दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी धडपडत असताना, डॉ. आंबेडकरही दूर लंडनमध्ये काही चांगल्या परिस्थितीत नव्हते. रमाबाईंनी त्यांना पत्र लिहून कुटुंबाच्या दयनीय आर्थिक स्थितीचे वर्णन केले. या पत्राच्या उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात डॉ. आंबेडकर लिहितात;
लंडन, २५ नोव्हेंबर १९२१
प्रिय रामू,
नमस्ते
तुझे पत्र मिळाले. गंगाधर [डॉ. आंबेडकरांचा मोठा मुलगा] आजारी आहे हे समजल्यावर मला दुःख झाले. स्वतःवर विश्वास ठेव. काळजीने काहीही होणार नाही. तुझा अभ्यास चालू आहे हे जाणून मला आनंद झाला. मी काही पैशांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. मी देखील येथे उपासमारीच्या मार्गावर आहे. माझ्याकडे तुम्हाला पाठवण्यासारखे काही नाही पण मी काहीतरी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. जर यास वेळ लागला किंवा तुमच्याकडे काहीच उरले नसेल, तर घर चालवण्यासाठी तुझे दागिने विकून टाक. मी तुझ्यासाठी नवीन दागिने घेईन. यशवंत आणि मुकुंद यांचा अभ्यास कसा चालला आहे? त्यावर तू काहीही लिहिलेले नाही. माझी तब्येत ठीक आहे. काळजी करू नको. मी माझा अभ्यास करत आहे. सखू आणि मंजुळाबद्दल मला काहीच माहिती नाही. पैसे मिळाल्यावर मंजुळा आणि लक्ष्मीसाठी प्रत्येकी एक साडी घे. शंकर कसा आहे? गजरा कशी आहे?
सर्वांसाठी शुभेच्छा
भीमराव
रमाबाई आणि डॉ. आंबेडकर यांनी समाजाच्या हितासाठी भोगलेल्या त्रासाचा उल्लेख ‘बहिष्कृत भारत’च्या संपादकीयात आढळतो. डॉ. आंबेडकरांनी लिहिले की, रमाबाईंनी ते परदेशात शिक्षण घेत असताना त्यांच्या आयुष्यातील दीर्घकाळ घर चालवण्याची जबाबदारी घेतली. ते परत आल्यानंतरही ते समाजकार्यात इतके मग्न झाले की त्यांना दिवसातून अर्धा तास रमाबाईंसाठी क्वचितच मिळत असे. त्यानंतरही रमाबाईंना कुटुंब एकट्यानेच सांभाळावे लागले. फरक एवढाच होता की तेव्हा बाबासाहेब त्यांना घर चालवण्यासाठी पैसे पुरवू शकत होते.
क्रूर आघात
रमाबाई आणि डॉ आंबेडकर यांना एकापाठोपाठ एक क्रूर आघात सहन करावे लागले, जेव्हा त्यांनी त्यांची तीन मुले आणि एक मुलगी गमावली. त्यांचा मुलगा गंगाधर डॉ. आंबेडकर अमेरिकेत शिकत असताना निवर्तला. पुढे यशवंत, रमेश, इंदू आणि राजरत्न यांचा जन्म झाला. नंतरच्या तिघांचेही निधन झाले. त्यांच्या चार मुलांचा मृत्यू झाल्यामुळे रमाबाई आणि आंबेडकर यांचे मन दु:खी झाले. त्यांच्या दुःखाला सीमा उरली नव्हती. डॉ. आंबेडकरांनी त्यांचे मित्र दत्तोबा पवार यांना लिहिलेल्या पत्रात हृदयद्रावक शब्दात त्यांची वेदना सांगितली: “आम्ही [रमाबाई आणि आंबेडकर] आमच्या शेवटच्या मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून लवकर बाहेर पडू शकणार नाही. या हातांनी तीन मुलगे आणि एका मुलीला स्मशानभूमीत पोहोचवले आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांची आठवण काढतो तेव्हा माझे हृदय भरून येते. आम्ही त्यांच्या भविष्याबद्दल जे विचार केले होते ते उध्वस्त झाले आहेत. वेदनेचे ढग आपल्या आयुष्यावर घिरट्या घालत असतात. मुलांच्या मृत्यूने आमचे जीवन मीठाशिवाय अन्नासारखे झाले आहे.
अधिक वाचा: Sharad Pawar त्यामुळेच कर्करोगही हादरवू शकला नाही- असं शरद पवार का म्हणतात?
शेवटचा क्षण, रमाचा निरोप
डॉ. आंबेडकर भारतात परतल्यानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली. पण रमाबाईंची प्रकृती ढासळू लागली. डॉ. आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, “रमाबाई आजारी होत्या. बाबासाहेब एकदा रमाबाईंना हवा बदलासाठी धारवाडला घेऊन गेले. परंतु त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही… त्यांच्या प्रकृतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी बाबासाहेबांनी सर्वतोपरी प्रयत्न केले”. कोणत्याच औषधांचा गुण आला नाही, दिवसेंदिवस रमाबाईंची तब्येत सतत खालावत गेली. त्या खूपच अशक्त झाल्या, मृत्यूपूर्वी सहा महिने त्या अंथरुणावरच होत्या. शेवटी २७ मे १९३५ रोजी रामूने साहेबांचा निरोप घेतला.
त्यांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री बाबासाहेब घरी परतले होते. त्यांच्या मृत्यूसमयी ते त्यांच्या बाजूलाच बसून होते. रमाबाईंचे अंत्यसंस्कार करून परतल्यानंतर बाबासाहेबानी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. रमाबाईंच्या मृत्यूनंतर आठवडाभर बाबासाहेब लहान मुलासारखे रडले, असे धनंजय कीर नमूद करतात. रमाबाईंनी बाबासाहेबांना दिलेली अतुलनीय साथ, त्याग यामुळे त्यांचा उल्लेख अभिमानाने ‘रमाई’ असा केला जातो!