घराघरात मधुमेह, उच्च रक्तदाब, ताप, सर्दी यांसारखे आजार सुरूच असतात, त्यामुळे तात्पुरता आराम मिळावा म्हणून लोक घरात गोळ्या, कॅप्सुल ठेवतातच. तापासाठी दिल्या जाणारी पॅरासिटामॉल तर आपण सहज मेडिकलमधून आणून घेतो. परंतु, आपल्या नेहमीच्या वापरातील ५० हून अधिक औषधं गुणवत्ता चाचणीत नापास झाल्याचा एक यादी समोर आला आहे आणि या यादीत पॅरासिटामॉलसह मधुमेहासाठी दिले जाणारे औषध मेटफॉर्मिन आणि अॅसिडिटीसाठी दिल्या जाणार्या पॅन्टोप्राझोल यांसारख्या औषधांचाही समावेश आहे. नेमकी अहवालात काय माहिती समोर आली आहे? चाचण्यांमध्ये औषधे का नापास होतात? या चाचण्या का केल्या जातात? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनची यादी
सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) दर महिन्याला तपासणीदरम्यान गुणवत्ता चाचणीत नापास झालेल्या औषधांची यादी जारी करते. केंद्र आणि राज्य नियामक वेळोवेळी बाजारातून विविध औषधांचे नमुने गोळा करतात आणि त्यांची चाचणी घेतात. चाचणी करण्यात आलेली औषधे ज्या पॅरामीटर्समध्ये कमी पडली आहेत, अशा अयशस्वी झालेल्या औषधांची यादी दर महिन्याला प्रसिद्ध केली जाते.
हेही वाचा : परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्स काय आहेत? भारताने विकसित केलेले हे संगणक का आहेत खास?
औषधांची यादी का प्रसिद्ध केली जाते?
सामान्य जनता, सरकारी आरोग्य विभाग, उद्योग आणि राज्य औषध नियामकांना बाजारात उपलब्ध असलेल्या आणि गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरलेल्या औषधांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला याद्या प्रसिद्ध केल्या जातात. औषधांचे नमुने तपासले जातात आणि त्याचे परिणाम सार्वजनिक केले जातात. हा औषध उत्पादक कंपन्यांना हे सांगण्याचादेखील एक मार्ग आहे की, त्यांची उत्पादने सतत निरीक्षणाखाली आहेत.
गुणवत्ता चाचणीत औषधे का नापास होतात?
गुणवत्तेच्या तपासणीत नापास होणारी औषधे तीन श्रेणींमध्ये जातात, त्या श्रेणी खालीलप्रमाणे:
बनावट औषधे : ही मुळात बनावट औषधे असतात. लोकप्रिय ब्रॅंडचे नाव देऊन अशा औषधांद्वारे लोकांची दिशाभूल केली जाते. या बनावट औषधांमध्ये सक्रिय घटक असूही शकतात किंवा नसूही शकतात. मूळ औषधं तयार करणार्या कंपनीद्वारे ही बनावट औषधे उत्पादित केली जात नाहीत. उदाहरणार्थ, टेल्मिसार्टन (उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी वापरलेले) आणि पॅन्टोप्राझोलनवर ग्लेनमार्क आणि सन फार्मा या कंपन्यांचे ब्रँडिंग करण्यात आले आहेत. परंतु, नमुन्यांमध्ये या औषधी त्यांनी तयार केले नसल्याचे आढळून आले.
खराब गुणवत्ता : खराब गुणवत्ता असलेल्या औषधांमध्ये खालच्या दर्जाचे घटक असू शकतात किंवा हे औषध व्यवस्थितरीत्या विरघळू शकत नाही किंवा त्यात कमी प्रमाणात सक्रिय घटक असू शकतात. अशी औषधे मानक दर्जाची नसलेली मानले जाते. या औषधांचे सेवन केल्याने व्यक्तीला हानी पोहोचू शकत नाही, परंतु काही प्रमाणात याचा दुष्परिणाम नक्की होऊ शकतो. कारण खर्या औषधांप्रमाणे ही औषधे शरीरासाठी लाभदायक ठरत नाहीत. उदाहरणार्थ, मेटफॉर्मिन या औषधाचाही यादीत समावेश आहे. हे औषध विघटन चाचणीत नापास झाले. याचा अर्थ असा की, एकदा सेवन केल्यास हे औषध योग्यरित्या विरघळत नाही.
भेसळयुक्त औषधे : अशा औषधांमध्ये भेसळयुक्त घटकांचा समावेश असतो. या औषधाचे सेवन करणार्या व्यक्तीला थेट हानी पोहोचू शकते. या औषधांच्या संपूर्ण बॅचेस सामान्यतः नियामकाद्वारे परत मागवले जातात किंवा कंपनीदेखील अशी औषधे परत बोलावू शकते.
हेही वाचा : चाइल्ड पोर्नोग्राफीच्या विरोधात सुप्रीम कोर्टानं कायदा कसा मजबूत केला?
आपण काय करावे?
ही यादी मुख्यतः नागरिकांसाठी नसून कंपन्यांसाठी असते. कंपन्यांना स्वत:ची सुधारणा करण्यासाठी किंवा आवश्यक कारवाई करण्यासाठी ही यादी जारी केली जाते. औषधाचे काही निवडलेले नमुने गुणवत्ता चाचणीत नापास झाल्याचे आढळल्यास बाजारात उपलब्ध असलेल्या त्या औषधी बनावट किंवा धोकादायक आहेत असे नाही. ही औषधे तुम्हाला लिहून दिली असल्यास तुम्ही त्यांचे सेवन करणे सुरू ठेवू शकता. परंतु, सैद्धांतिकदृष्ट्या याचा अर्थ असा होतो की, तशा आणखी काही बनावट औषधी बाजारात असू शकतात.