रतन टाटा हे भारतीय उद्योगविश्वाचे समानार्थी नाव आहे. त्यांनी केवळ मोठ्या कंपन्यांचे नेतृत्वच केले नाही तर, स्वप्न पाहणाऱ्या, आव्हानांचा सामना करत असणाऱ्या नवउद्यमी अर्थात स्टार्टअप कंपन्यांना आधार देण्याचे कार्य केले. स्वतःच्या व्यवसायातून केवळ संपत्ती निर्मितीचे काम न करता इतरांच्या क्षमतांना अधिक बळ देण्याचे कार्य केले. रतन टाटा यांनी त्यांच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून, उद्योजकांची नवीन कशी पिढी वाढवली आणि आज आपण पाहत असलेली नवउद्यमी परिसंस्था तयार करण्यात कशी मदत केली याचा आढावा.

नवउद्यमींमध्ये मोठी गुंतवणूक

रतन टाटा यांची नवउद्यमींमधील गुंतवणूक मोठी आहे. ओला, पेटीएम, लेन्सकार्ट, फर्स्टक्राय आणि इतर बऱ्याच कंपन्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य त्यांनी केले. नवउद्यमींची निवड करताना, केवळ बाजारातील कल म्हणजेच ट्रेंड किंवा झटपट परतावा मिळवून देणाऱ्या कंपन्या आणि मजबूत ताळेबंदाच्या पलीकडे त्यांनी पाहिले. हे करताना सामाजिक भान आणि मूल्यांशी संरेखित असलेल्या कंपन्यांचा शोध त्यांनी घेतला. नैतिकता, दीर्घकालीन दृष्टी आणि सामाजिक वचनबद्धता अशा तीनही मूल्यांचा सहयोग असलेल्या कंपन्यांना ते सहयोग करत असत. देशातील लोकांच्या वास्तविक समस्या सोडवणाऱ्या कंपन्यांना त्यांनी पाठिंबा दिला.ओला वाहतूक सुलभ करणे असो, पेटीएमसोबत आर्थिक सेवांचे लोकशाहीकरण आणि समावेशन असो किंवा लेन्सकार्टसोबत परवडणारे चष्मे पुरवणे असो, त्यांच्या गुंतवणुकीने लाखो लोकांचे जीवनमान उंचावले.

issue of house of police and service colonies is stalled
व्यथा पोलिसांच्या : घर व सेवा वसाहतींचा प्रश्न रखडलेला
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता
Shiv Sena Yuva Sena Secretary Dipesh Mhatre
शिवसेना युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांना जीवे ठार मारण्याची धमकी, फलकांवरुन जबाब देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत पोलीस ठाण्यात
Commercial Pilot License Holder ppl Cpl airplan career news
चौकट मोडताना: अनुभवानंतरचे शहाणपण
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी

हे ही वाचा…जीएसटी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले गुजरातमधील पत्रकार महेश लांगा कोण आहेत?

टाटांचा परीसस्पर्श कसा?

रतन टाटा यांचा प्रभाव आर्थिक पाठबळाच्या पलीकडे गेला. त्यांनी केवळ गुंतवणूक न करता संस्थापकांना अमूल्य मार्गदर्शन दिले. त्यांना मोठा विचार करण्यास, मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी आणि शाश्वत आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार असलेले व्यवसाय तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले.

त्यांचे गुंतवणूक तत्त्वज्ञान त्यांच्या स्वतःच्या नेतृत्व शैलीतून प्रतिबिंब होते. यामध्ये सचोटी, दीर्घकालीन दृष्टी आणि राष्ट्र उभारणीवर लक्ष केंद्रित केले असल्याचे निदर्शनास येते. केवळ झटपट नफा मिळवण्याच्या मागे न लागता, त्यांनी नवोपक्रम आणि नैतिक उद्योजकतेचा वारसा उभारला.

नावीन्यपूर्ण कंपन्यांची निर्मिती

विविध क्षेत्रातील, लोकांचे जीवन सुलभ करणाऱ्या स्टार्टअप्सना रतन टाटांनी सहकार्य केले.

अद्वितीय आणि नावीन्यपूर्ण स्टार्टअप्स :

टीबॉक्स : चहा प्रेमींचा आनंद! टीबॉक्स स्टार्टअप्स हा भारतभरातील चहाच्या बागांमधून मिळणारा प्रीमियम चहा थेट वितरित करतो. टीबॉक्समधील टाटाची गुंतवणूक भारतातील समृद्ध चहा संस्कृती आणि ग्राहकांना उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांशी ऑनलाइन मंचाच्या माध्यमातून जोडण्यासाठी मदतगार ठरली

टीम इंडस : अवकाशातील ताऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी टीम इंडस ही स्पेस रोव्हर्स विकसित आणि तयार करत आहे. टाटांची टीम इंडसमधील गुंतवणूक महत्त्वाकांक्षी तांत्रिक प्रयत्नांना आणि भारताच्या अंतराळ संशोधनाच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवते.

गूडफेलो : जेष्ठ नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, गुडफेलो वृद्ध व्यक्तींना सहचर आणि मदत प्रदान करतात. टाटांची यातील गुंतवणूक जेष्ठ नागरिकांचे उतारवयातील आयुष्य अधिक आरामदायी करण्यासाठीचे प्रयत्न दर्शवितात.

आयुष्य सुकर करणाऱ्या नवउद्यमींमध्ये गुंतवणूक

अर्बन कंपनी : टाटांनी २०१६ मध्ये सर्वप्रथम अर्बन कंपनीमध्ये गुंतवणूक केली. यामाध्यमातून घरगुती सेवा पुरविल्या जातात. घराची स्वच्छता, वैयक्तिक निगा आणि प्लंबर यांसारख्या सेवा एकाच मंचावरून पुरवल्या जातात.

फर्स्टक्राय – या नवउद्यमींच्या माध्यमातून अगदी तान्ह्या बाळापासून ते मोठ्या मुलांना लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये देखील २०१६ मध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. याबरोबरच ओला,कॅशकरो, नेस्टअवे यांसारख्या नवउद्यमींमध्ये देखील त्यांनी गुंतवणूक करून सामान्य लोकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी प्रयत्न केले.

हे ही वाचा…जोडीदाराच्या ‘लॉयल्टी टेस्ट’चा नवा व्यवसाय; जोडीदाराविषयी साशंक लोक घेत आहेत गुप्तहेराची मदत, नेमका हा प्रकार काय?

आरोग्य आणि वैयक्तिक निगा

क्यूअर फिट या मंचाच्या माध्यमातून शरीर, मानसिक आरोग्य आणि सात्त्विक आहार घेण्यासंबधी माहिती आणि प्रशिक्षण दिले जाते. आजारपणात डॉक्टरकडे जाणे शक्य नसल्यास लायब्रेटच्या माध्यमातून डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला घेता येणार आहे. यामध्ये टाटांनी २०१५ मध्ये गुंतवणूक केली होती. याबरोबर मॅपमायजिनोम या नवउद्यमीमध्ये त्यांनी गुंतवणूक केली, त्यामाध्यमातून जेनेटिक टेस्टिंग आणि आरोग्याविषयीच्या जोखीम जाणून घेण्यास मदत होईल. सुमारे पन्नासहून अधिक नवउद्यमींमध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली होती. रतन टाटा यांच्या विविध नवउद्यमींमध्ये गुंतवणूक केलेल्या काही कंपन्यांची ही केवळ एक झलक आहे. त्यांनी इतर अनेक कंपन्यांनाही पाठिंबा दिला असून या गुंतवणुकीतून कंपन्यांच्या नवोपक्रमाच्या सामर्थ्यावर असलेला विश्वास आणि समस्या सोडवणाऱ्या आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या उद्योजकांना पाठिंबा देण्याची त्यांची वचनबद्धता दिसून येते. शिवाय टाटांची गुंतवणूक मिळाल्यांनतर त्या नवउद्यमींसाठी अनेक दालने खुली झाली.

हे ही वाचा…Jammu Kashmir Election Results 2024: इतिहासात गाजलेल्या त्या ‘तीन’ निवडणुका का ठरल्या होत्या महत्त्वाच्या?

टाटांकडून दूरदर्शीपणाचे कोणते धडे?

रतन टाटा यांचा नवउद्यमींमधील गुंतवणूक प्रवास हा उद्योजकांसाठी मौल्यवान धडे देतो.

तुमच्या दृष्टीवर विश्वास ठेवा. कल्पना अवास्तव वाटत असल्या तरी धाडसी कल्पनांचा पाठपुरावा करण्यास घाबरू नका.

दीर्घकालीन प्रभावावर लक्ष केंद्रित करा. कारण व्यवसाय केवळ नफा कमावतो असे नाही, तर समाजासाठी मूल्यदेखील निर्माण करतो.

नैतिकता आणि सचोटीने केलेले व्यवसाय-उद्योग पुढे जाऊन मोठे यश मिळवून देतात. यासाठी पारदर्शकता हा कंपनीचा पाया असावा.

योग्य मार्गदर्शक शोधा. तुमच्या प्रवासात तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील अशा अनुभवी व्यक्तींकडून शिका.

नवनिर्मिती करणे कधीही थांबवू नका.