भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) ऑक्टोबर २०२३ मध्ये बँक ऑफ बडोदावर मोठी कारवाई केली होती. या कारवाईनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ बडोदाच्या ‘BoB World’ नावाच्या मोबाइल ॲपवर नवीन ग्राहक समाविष्ट करण्यास मनाई करणारा आदेश बँकेला दिला होता. या ॲपच्या कार्यप्रणालीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे त्यांचे म्हणणे होते. तेव्हापासून बँक ऑफ बडोदाला नवे ग्राहक आपल्या ॲपवर जोडता येत नव्हते. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ बडोदावर घातलेले हे बंधन बुधवारी (८ मे) मागे घेतले आहे.

आरबीआयने बँक ऑफ बडोदावर कोणती बंधने लादली होती?

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बँक ऑफ बडोदाच्या ‘BoB वर्ल्ड’ या मोबाइल ॲपवर नवे ग्राहक जोडण्याची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश आरबीआयने दिले होते. अर्थातच, या कारवाईमुळे बँकेच्या ग्राहकांवर थेट परिणाम झाला होता आणि बँकेच्या व्यवहारांमध्ये मोठी घट झाली होती. या मोबाइल ॲपच्या कार्यप्रणालीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या असून जोपर्यंत त्या दूर केल्या जात नाहीत, तोवर बँकेने नव्या ग्राहकांना या अॅपचा वापर करणे अनिवार्य करू नये, असा आदेश आरबीआयने दिला होता. मात्र, जे ‘Bob World’ ॲपचा आधीपासूनच वापर करतात, त्या ग्राहकांनाही व्यवहार करताना कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत, यासंबंधीची काळजी बँकेने घेणे गरजेचे असल्याचेही आदेश देण्यात आले होते. बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ अ नुसार, आरबीआयने ही कारवाई केली होती. या कलमाअंतर्गत बँकेच्या ठेवीदारांच्या अथवा बँकिंग कंपनीच्या हिताला बाधक ठरतील अशा गोष्टी टाळण्यासाठी आरबीआय असे आदेश देऊ शकते.

Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Reserve Bank,
“मी लष्कर-ए-तोयबाचा सीईओ बोलतोय, तुमच्या मागचा रस्त्यावर…”; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन!
rbi received threatening phone call from Lashkar e Taiba
रिझर्व बँकेला ‘लश्कर-ए-तैयबा’च्या नावाने धमकी, कशी आणि कोणती धमकी दिली वाचा…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
kerala ias officer Row
Keral IAS officer: हिंदू-मुस्लीम व्हॉट्सॲप ग्रुप बनवणं महागात पडलं; केरळमध्ये दोन आयएएस अधिकारी निलंबित

हेही वाचा : व्हॉट्सॲपवरील गुंतवणूक घोटाळ्यांमुळे लोकांची बँक खाती रिकामी; काय आहे हा घोटाळा?

बँक ऑफ बडोदाला मोबाइल ॲपद्वारे ग्राहकांना जोडण्यापासून का रोखण्यात आले होते?

बँकेच्या ‘बॉब वर्ल्ड’ या अ‍ॅपमध्ये ग्राहकांना नव्याने सहभागी करून घेण्याची प्रक्रिया सदोष होती. या प्रक्रियेतील त्रुटींचा गैरफायदाही घेतला जात होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये यासंदर्भात एक बातमीही आली होती. बँकेचेच काही कर्मचारी बॉब वर्ल्ड ॲपवर बनावट ग्राहकांना सामील करून घेण्यामध्ये गुंतले होते. बँकेच्या भोपाळ विभागीय कार्यालयामधील काही कर्मचारी या त्रुटींचा गैरफायदा घेत होते. त्यांनी बॉब वर्ल्डवरील नोंदणीचे आकडे वाढवण्यासाठी बँकेची काही खाती वेगवेगळ्या लोकांच्या मोबाइल नंबरशी जोडली होती. हा सगळा प्रकार आरबीआयच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेवर ही कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आरबीआयने ही कारवाई केल्यानंतर बँकेच्या ॲपच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करू, असे आश्वासन बँकेने आरबीआयला दिले होते. “प्रक्रियेमधील त्रुटी दूर व्हाव्यात म्हणून आम्ही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, लवकरात लवकर या सुधारणा करून आम्ही आरबीआयचे समाधान करू”, असे आश्वासन बँकेने १० ऑक्टोबर २०२३ रोजी आरबीआयला दिले होते.

आता आरबीआयने काय केले आहे?

बँक ऑफ बडोदाने बुधवारी (८ मे) स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, “आरबीआयने बॉब वर्ल्डवरील निर्बंध तात्काळ उठवण्याचा निर्णय बँकेला कळविला आहे. आता बँकेला आपल्या ॲपशी नव्याने ग्राहक जोडता येणार आहेत.” आम्ही आता मोबाइल ॲपद्वारे नवीन ग्राहकांना पुन्हा जोडून घेण्याची प्रक्रिया सुरू करू, असे बँकेने सांगितले आहे.

हेही वाचा : कोव्हिशिल्ड लस दुष्परिणामांमुळे मागे घ्यावी लागली? ॲस्ट्राझेनेका म्हणते मागणीपेक्षा साठा अधिक!

आरबीआयच्या निर्णयाचा बँकेवर कसा परिणाम झाला?

बँक ऑफ बडोदाने सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांचे मोबाइल बँकिंग ॲप लाँच केले होते. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ॲपवर बंदी घालण्याच्या आधी म्हणजेच सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीच्या शेवटी ‘बॉब वर्ल्ड’वरील एकूण आर्थिक तसेच बिगर-आर्थिक व्यवहार ७.९५ दशलक्ष इतके होते. आरबीआयने बँकेच्या ॲपवर बंधने लादल्यानंतर या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली. डिसेंबर २०२३ च्या तिमाहीच्या अखेरीपर्यंत हे व्यवहार ७.१९ दशलक्षपर्यंत घसरले. बॉब वर्ल्ड ॲपद्वारे उघडलेल्या मुदत ठेवी (FDs) किंवा आवर्ती ठेवींची (RDs) टक्केवारी Q2 FY24 च्या शेवटी ३५ टक्क्यांवरून FY24 Q3 च्या शेवटी २८ टक्क्यांवर आली होती.