बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती अशा अनेक गोष्टींमुळे जगभरात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. जीवघेण्या कर्करोगाच्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ पहायला मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कर्करोग हा जगातील सर्वात मोठा मारक ठरत आहे. कर्करोगामुळे २०२२ मध्ये सुमारे १० दशलक्ष नागरिकांचा जीव कर्करोगाने घेतला आहे तर २० दशलक्ष नवीन कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कर्करोग एजन्सीने अंदाज वर्तवला आहे की, २०५० पर्यंत नवीन कर्करोगाच्या रुग्णांची संख्या तब्बल ७७ टक्क्यांनी वाढेल. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी) नुसार २०५० पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या ३५ दशलक्षांपेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वाढीस तंबाखू, मद्यपान, लठ्ठपणा आणि वायू प्रदूषण कारणीभूत ठरत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…

कर्करोगाविषयीची प्रमुख तथ्ये

कर्करोग असा रोग आहे ज्यामुळे असामान्य पेशींची संख्या वाढते आणि या पेशी शरीरात पसरतात. माणसांसह इतर सर्व प्राणी प्रजातींवरही याचा परिणाम होतो. प्रागैतिहासिक काळापासूनच्या मानवी सांगाड्यांमध्येही याच्या खुणा सापडल्या आहेत. कर्करोगाचे १०० पेक्षा जास्त प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराचे स्वतःचे निदान आणि उपचार आहेत. नऊपैकी एका पुरुषाचा आणि १२ पैकी एका महिलेचा मृत्यू कर्करोगाने होतो.

२०२२ मध्ये अंदाजे ९. ७४ दशलक्ष लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला. तर १९.९६ दशलक्ष नवीन प्रकरणे नोंदवण्यात आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या अहवालानुसार प्रकाशित करण्यात आली आहे. यूएस-आधारित इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशननुसार, २००९ ते २०१९ दरम्यान जागतिक प्रकरणांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सरासरी पाच व्यक्तींपैकी एका व्यक्तीला त्याच्या जीवनकाळात कर्करोगाचा सामना करावा लागत आहे.

आयएआरसीने २०२२ मध्ये नोंदवलेल्या १९.९६ दशलक्षांपेक्षा २०४० मध्ये कर्करोगाच्या नवीन रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी जास्त असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. २०२२ च्या तुलनेत २०५० मध्ये ही संख्या ७७ टक्क्यांनी वाढणार असल्याची शक्यता आहे. “कर्करोगाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे,” असे आयएआरसीच्या कर्करोग निरिक्षण शाखेचे प्रमुख डॉ. फ्रेडी ब्रे म्हणाले.

फुफ्फुस, स्तन, आतडे या कर्करोगांची संख्या जास्त

तीन सर्वात सामान्य कर्करोग म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग (२०२२ मध्ये नवीन केसेस १२.४ टक्के), स्तनाचा कर्करोग (११.६ टक्के) आणि कोलन किंवा आतड्याचा कर्करोग (९.६ टक्के). मृत्यूच्या बाबतीत फुफ्फुसाचा कर्करोग हा आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक रोग आहे. ज्यामुळे १८.७ टक्के लोकांचा मृत्यू होतो. यात कोलन कर्करोग (९.३ टक्के), यकृताचा कर्करोग (७.८ टक्के) आणि स्तनाचा कर्करोग (६.९ टक्के) आहे.

‘या’ देशांमध्ये कर्करोगाची वाढ सर्वात जास्त

जागतिक आरोग्य संघटनेनुसार विकसित देशांमध्ये कर्करोग रूग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ होणार असल्याची शक्यता आहे. २०२२ च्या अंदाजाच्या तुलनेत २०५० मध्ये अतिरिक्त ४.८ दशलक्ष नवीन केसेसमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. “त्याचप्रमाणे, २०५० मध्ये या देशांतील कर्करोगाने होणारे मृत्यूचे प्रमाण जवळजवळ दुप्पट होण्याची शक्यता आहे,” असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

आयएआरसी मधील कर्करोग निरिक्षण शाखेचे प्रमुख फ्रेडी ब्रे म्हणाले, “ज्यांच्याकडे कर्करोगाचे प्रमाण व्यवस्थापित करण्यासाठी सर्वात कमी संसाधने आहेत त्यांना याचा फटका जाणवणार आहे.”

युरोपला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता…

२०२२ मधील सर्वात जास्त नवीन प्रकरणे आशियातील होती. कारण जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या आशियात आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रशियासह युरोपमध्ये जागतिक लोकसंख्येच्या १० टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या आहे, मात्र कर्करोगाच्या नवीन प्रकरणांपैकी एक चतुर्थांश प्रकरणे येथील होती. “युरोपमधील बऱ्याच देशांमध्ये प्रोस्टेट आणि स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे,” असे ब्रे यांनी ‘एएफपी’ला सांगितले.

२०२२ मधील कर्करोगाच्या प्रकरणांपैकी सहा टक्क्यांहून कमी प्रकरणे आफ्रिकेत होती. जिथे जगातील सर्वात तरुण लोकसंख्या आहे. आफ्रिकेतील तरुण लोकसंख्येमुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग (सरवाईकल कॅन्सर) व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण इथे कमी आहे.

वय हा एक मुख्य घटक

२०२२ मधील नवीन कर्करोगाच्या प्रकरणांपैकी तीन चतुर्थांश कर्करोगचे प्रमाण ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये होते. जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास ५० टक्के लोकसंख्या २९ वर्षाखालील आहे. परंतु असे असले तरीही २९ वर्षाखालील मुलांमध्ये कर्करोगाची तीन टक्क्यांपेक्षा कमी प्रकरणे आहेत. वयानुसार कर्करोगाचा धोका वाढतो कारण कालांतराने शरीरातील वाढत्या असामान्य पेशींमुळे कर्करोग होतो. काहींना कर्करोग शरीरातील बदलामुळे होतो परंतु अनेकांना मद्यपान, धुम्रपान यांसारख्या बाह्य कारणांमुळे होतो.

पुरुषांना जास्त धोका?

हेही वाचा : बहुविध दारिद्र्य म्हणजे काय? बहुविध दारिद्र्य निर्देशांक कसा ठरवला जातो?

कॅन्सरमुळे स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषांचा मृत्यू होतो. प्रत्येक १०० कॅन्सर मृत्यूंपैकी ५६ पुरुष असतात, तर ४४ स्त्रिया. पुरुष जास्त धूम्रपान करतात, ज्यामुळे त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. सर्व कर्करोगाच्या प्रकारांपैकी सर्वात प्राणघातक फुफ्फुसांचा कर्करोग असतो. परंतु स्त्रियाही एकंदरीत कर्करोगाचा कमी वयात समान त्रास सहन करतात, असे ब्रे यांनी ‘एएफपी’ला सांगितले.