Dyslexia Brain Research : हा अनुभव तुम्ही कदाचित घेतलेलाही असेल… आवाज आणि चिन्हे ओळखण्यात अडचण येते. तसेच, वाचनादरम्यान अडखळल्यासारखं वाटतं तर कधी एकसुरीही वाटतं. अक्षरं ही विशिष्ट ध्वनी असल्यासारखी वाचली जातात, त्यातून शब्द आणि अर्थ यांचा मेळ लागत नाही. तसंच वाचन किंवा लिखाण करताना अक्षरं, शब्द किंवा संपूर्ण वाक्यच कधी गाळलं जातं, तर कधी बदललं जातं. अनेकदा तर तुम्हाला चुका लक्षातही येत नाहीत आणि व्यवस्थित लिखाण करणेही कठीण जाते.

अधिक वाचा: विश्लेषण : धर्म केव्हा अस्तित्वात आला? तुर्कस्तानमधील उत्खननात मिळाले पुरावे?

What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
quantum chip Willow solves in 5 minutes
Quantum Chip :सुपर कॉम्प्युटरलाही हजारो वर्षे लागतील; पण गूगलची ‘ही’ नवी चिप ५ मिनिटांत उत्तर देईल
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!

अध्ययन अक्षमता आयुष्यभराची…

अध्ययन अक्षमता म्हणजेच डिस्लेक्सिया हा जगभरात सर्वत्र आढळणारा विकार असून जगभरातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ५% ते १०% लोकांमध्ये तो आढळतो. याची लक्षणे अनेकदा बालवयातच दिसतात. मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये हा विकार दुप्पट किंवा तिपटीने आढळतो. अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत भाषेच्या तासाला वाचन केलेला मजकूर पुन्हा सांगणे किंवा त्याचा अर्थ लावून सांगणे या गोष्टी कठीण जातात. वाचन किंवा लिखाण अपेक्षित असलेल्या प्रत्येक विषयाच्या अभ्यासात विद्यार्थ्यांसाठी हे आव्हानच ठरते. अगदी गणितासारख्या विषयातदेखील किंवा मग जिथे लेखन वा वाचन अभ्यास म्हणून अपेक्षित आहे अशा ठिकाणीही ही समस्या जाणवतेच.

अधिक वाचा: विश्लेषण : पाच हजार वर्षांपूर्वीची स्मार्ट शहरे नक्की होती तरी कशी? राखीगढीत मिळाले उत्तर…!

आयुष्यभराचा सामना

वाचन आणि शब्दलेखनाच्या अडचणी असलेल्या व्यक्तींना अध्ययन अक्षमतेमुळे आयुष्यभर अनेक समस्यांचा सामना सतत करावा लागतो. सुरुवातीस शाळेत, नंतर कामाच्या ठिकाणी आणि प्रत्यक्षात दैनंदिन जीवनातही. डिस्लेक्सियाचा संबंध हा तुमच्या बुद्धिमत्तेशी किंवा सर्जनशीलतेशी नसतो. हा विकार असलेल्या व्यक्तींमध्ये विख्यात संशोधक अल्बर्ट आइन्स्टाईन, संगीतकार लुडविग वान बीथोव्हन, शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन, साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वे, अगाथा ख्रिस्ती आदींचा समावेश होतो.

अधिक वाचा: History, Culture and significance of Ganesh: ‘महाविनायक’ गणरायाचे ‘अफगाणिस्तान कनेक्शन’ काय आहे?

अध्ययन अक्षमतेमागचे कारण शोधण्यात यश

अध्ययन अक्षमतेमागची कारणे अद्याप संशोधकांना पूर्णपणे उलगडलेली नाहीत. परंतु, जर्मनीतील ड्रेस्डनमधील संशोधकांनी असा दावा केला आहे की, मानवी मेंदूच्या बरोबर मध्यभागी असलेल्या काळ्या मिरीच्या आकाराच्या असलेल्या व्हिज्युअल थॅलेमस नावाच्या विशिष्ट भागाशी हा विकार संबंधित आहे. आपल्या पंचसंवेदनांच्या आधारे समोर आलेल्या बाबींचा अर्थ लावण्याचे काम मेंदूमधील व्हिज्युअल थॅलेमस हा भाग करत असतो.

कारणमीमांसा ते जाणीव

व्हिज्युअल थॅलेमस हा एकाबाजूला आपल्या डोळ्यांशी आणि दुसरीकडे आपल्या मेंदूतील कॉर्टेक्सशी जोडलेला असतो. त्याच्या रचना आणि कार्यप्रणालीत झालेला बदल हाच डिस्लेक्सियाला कारणीभूत ठरतो, असे या संशोधनामध्ये लक्षात आले आहे. कारणमीमांसा, भावना, विचार, भाषा आणि जाणीव या सर्व बाबी या व्हिज्युअल थॅलेमसमध्ये होणाऱ्या प्रक्रियेशी जोडलेल्या असतात.

दृश्यांवर प्रक्रिया

डोळ्यांकडून येणाऱ्या दृश्यांवर दोन ठिकाणी प्रक्रिया केली जाते. यातील एक भाग आकाराने मोठा असतो आणि प्रामुख्याने तिथे रंगांशी संबंधित माहितीवर प्रक्रिया केली जाते. तर दुसरा भाग हा वेगात हलणाऱ्या प्रतिमांवर काम करतो. तो आकाराने अतिशय लहान असतो. व्हिज्युअल थॅलेमस मधील रचना अतिशय गुंतागुंतीची असल्याने आणि तो मेंदूच्या अगदी आतील भागात आणि शिवाय आकाराने अतिशय लहान म्हणजेच काळ्या मिरीच्या दाण्याएवढाच असल्याने मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग अर्थात एमआरआयचा (MRI) वापर करून त्याचा अभ्यास करणे कठीण जाते.

व्हिज्युअल थॅलेमसमधील बदल कसे दिसून आले?

लीपझिगमधील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन कॉग्निटिव्ह अॅण्ड ब्रेन सायन्सेसमध्ये असलेल्या विशेष एमआरआय प्रणालीच्या मदतीने संशोधकांनी व्हिज्युअल थॅलेमसचा तपशीलवार अभ्यास केला. संशोधनात असे लक्षात आले की, डिस्लेक्सियाग्रस्त व्यक्तींच्या व्हिज्युअल थॅलेमसच्या कार्य आणि रचनेत बदल होतात, विशेषत: पुरुषांमध्ये हे बदल अधिक सुस्पष्ट दिसतात. प्रामुख्याने हे बदल हालचाल असणाऱ्या बाबींसदर्भात अधिक असतात. डिस्लेक्सियाच्या एकूण २५ रुग्णांवर आणि नियंत्रित गटातील २४ व्यक्तींवर हा अभ्यास करण्यात आला आणि त्याचे निष्कर्ष ब्रेन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले. यामुळे येणाऱ्या काळात डिस्लेक्सिया केंद्रस्थानी ठेऊन मेंदूचा सखोल अभ्यास करून संशोधन करणे शक्य होणार आहे. त्याचा निश्चितच फायदा उपचार पद्धतींनाही होईल, असे ड्रेस्टन येथील कॉग्निटिव्ह अॅण्ड क्लिनिकल न्युरोसायन्स अध्यासनाच्या कॅथरिना क्रेगस्टेन यांनी सांगितले.

नवीन उपचारांसाठी संशोधन

या निष्कर्षांमुळे डिस्लेक्सियाच्या संदर्भात नवीन उपचारांच्या पद्धती विकसित होऊ शकतात. मेंदूतील या थॅलेमसच्या क्रियाशीलतेत बदल घडवून डिस्लेक्सियाशी संबंधित बाबी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी ऑपरेशन करण्याचीही गरज नाही. याविषयावर काम करणाऱ्या संशोधक ख्रिस्ता मुल्लर अॅक्स्ट सांगतात, डिस्लेक्सियाची सुरुवात नेमकी कुठे आणि कशी होते हे आता नेमके कळल्याने, मेंदूतील या भागाला केंद्रस्थानी ठेऊन डिस्लेक्सियाची लक्षणे कमी करण्यात आपल्याला भविष्यात यश येऊ शकते.

Story img Loader