पावलस मुगुटमल

महाराष्ट्रामध्ये यंदा जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या चार महिन्यांच्या हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला. त्यानंतर परतीच्या पावसाने कहर केला. ऑक्टोबरमध्ये काही भागांत सरासरीपेक्षा दुप्पट-तिप्पट पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश स्थितीही दिसून आली. नैर्ऋ त्य मोसमी वारे देशातून आणि महाराष्ट्रातून माघारी जात असताना पावसाने दाखविलेल्या रौद्ररूपाने, प्रामुख्याने उत्तर विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात शेतमालाला मोठा फटका बसला. मात्र, याच कालावधीत राज्यातील धरणांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेतील विक्रमी पाणीसाठा जमा झाला. राज्यातील बहुतांश धरणे काठोकाठ भरली आहेत. सर्वच मोठय़ा प्रकल्पांमध्ये समाधानकारकच नव्हे, तर गेल्या पाच ते सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाणीसाठा झाला आहे.

mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
RBI
अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!
Cucumber, flower, brinjal, carrot,
पुणे : काकडी, फ्लॉवर, वांगी, गाजर स्वस्त

राज्यातील धरणांत पाणी किती?

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या सहा विभागांत धरणांची विभागणी केली जाते. त्यातील उपयुक्त पाण्याची नोंदही ठेवली जाते. सहा विभागांमध्ये एकूण १४१ प्रमुख आणि मोठे प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्प २५८ असून लघु प्रकल्पांची संख्या २८६८ आहे. सद्य:स्थितीत या सर्व प्रकल्पांत मिळून ९१ टक्क्यांहून अधिक पाण्याचा साठा आहे. महत्त्वाच्या आणि मोठय़ा प्रकल्पातील साठा आणखी अधिक असून, तो ९६ टक्क्यांच्या पुढे आहे. विभागानुसार मोठय़ा प्रकल्पांमध्ये नाशिक विभागात सर्वाधिक आणि जवळपास १०० टक्क्यांच्या जवळपास पाण्याचा साठा आहे. त्याखालोखाल अमरावती विभागात ९८ टक्के, औरंगाबाद आणि पुणे विभागात प्रत्येकी ९७ टक्के, कोकण विभागात ९६ आणि नागपूर विभागात ८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा आहे.

पूर्वीच्या तुलनेत पाणी अधिक कसे?

राज्यातील मोठय़ा प्रकल्पांत ९६ टक्के, एकूण सर्व धरणांत मिळून सध्या ९१ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. या पाणीसाठय़ाची तुलना गेल्या चार वर्षांशी केल्यास तो सर्वाधिक असल्याचे दिसून येते. २०१८ च्या तुलनेत तर यंदाचा मोठय़ा धरणांतील पाणीसाठा तब्बल ३० टक्क्यांहून अधिक आहे. २०१९ मध्ये नोव्हेंबरच्या सुरुवातीला याच कालावधीत मोठय़ा प्रकल्पांत ८९ टक्के पाणी होते. २०२० आणि गेल्या वर्षी २०२१ मध्येही राज्यातील धरणांमध्ये ९४ टक्क्यांच्या आसपास उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा मात्र, ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच गेल्या अनेक वर्षांतील पाणीसाठय़ाच्या तुलनेत अधिक पाणी धरणांत आहे.

लांबलेल्या पावसाचा परिणाम काय?

धरणांतील मोठय़ा पाणीसाठय़ाचे प्रमुख कारण लांबलेला पाऊस हेच आहे. नैर्ऋ त्य मोसमी पावसाचा देशातील प्रवास गेल्या काही वर्षांत लांबतो आहे. पावसाचा लांबणारा कालावधी लक्षात घेता दोन वर्षांपूर्वीच भारतीय हवामानशास्त्र विभागाने मोसमी पावसाच्या प्रवासाच्या तारखा बदलल्या आहेत. पूर्वी राजस्थानमधून मोसमी पाऊस माघारी फिरण्याची नियोजित सर्वसाधारण तारीख १ सप्टेंबरच्या आसपास होती. ती १७ सप्टेंबर करण्यात आली. मात्र, या तारखांनाही आता परतीचा पाऊस चुकवत असल्याचे दिसून येत आहे. यंदा राजस्थानमधून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास २० सप्टेंबरला सुरू झाला आणि महाराष्ट्रातून त्याची माघारी १४ ऑक्टोबरला सुरू झाली. त्यानंतर नऊ दिवसांनी २३ ऑक्टोबरला तो महाराष्ट्रातून निघून गेला. महाराष्ट्रातून जाण्याची अपेक्षित सर्वसाधारण तारीख १४ ते १५ ऑक्टोबर आहे. परतीच्या पावसाचा लांबलेला नऊ ते दहा दिवसांचा कालावधी आणि झालेला धुवाधार पाऊस धरणांतील पाणीसाठय़ात भर घालून गेला.

ऑक्टोबरचा चटका टळल्याने काय झाले?

राज्यातील सर्वच धरणांमधील वर्षांचा पाणीसाठा पाहिल्यास २०१८ मध्ये अत्यंत कमी पाणीसाठा दिसून येतो. या वर्षांच्या पाणीसाठय़ाशी त्याची तुलना केल्यास तो तब्बल ३० टक्क्यांनी कमी आहे. २०१९ मध्येही पाणीसाठा यंदाच्या तुलनेत कमीच होता. २०१८-१९ मधील पावसाची माघारी आणि तापमानाची स्थिती पाहिल्यास नेमके झाले काय, ते लक्षात येईल. २०१८ मध्ये १ ऑक्टोबरला राज्यातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र तो मोठा बरसला नाही. त्या वर्षी ऑक्टोबर चटकाही होता. २०१९ मध्ये १६ ऑक्टोबरच्या आतच मोसमी पाऊस राज्यातून निघून गेल्यामुळे परतीच्या पावसाचे प्रमाण कमी होते. यंदा पावसाचे प्रवास अधिक आणि उन्हाचा चटकाही टळला. यंदा सलग तिसऱ्या वर्षी ऑक्टोबरचा चटका वातावरणीय प्रणालीतून गायब झाला आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत पाऊस धुवाधार बरसला. त्यातून पाण्याचे बाष्पीभवन टळून पाणीसाठा टिकला, त्यात लांबलेल्या पावसाच्या जोरधारांनी भर घातली.

पुढील पावसापर्यंत पाणीसाठा टिकणार?

पाऊस येण्यासही विलंब करीत असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नियोजित सर्वसाधारण तारखेनुसार १ जूनला केरळमार्गे नैर्ऋ त्य मोसमी वारे भारतात प्रवेश करतात. पाऊस साधारण या तारखेच्या दोन-चार दिवस पुढे-मागे केरळमध्ये दाखल होतो. पण पुढे तो विलंब लावतो. यंदा महाराष्ट्रात विलंबाने पाऊस सुरू झाला आणि पूर्वमोसमी पाऊसही पुरेसा बरसला नाही. परिणामी संपूर्ण जून महिना अनेक भागांत कोरडा गेला. त्यामुळे राज्यभर पाण्याची बिकट स्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी अपुऱ्या पाण्यामुळे पाणीकपात करण्यात आली. वास्तविक २०२१ मध्ये राज्यातील धरणे पावसानंतर ९४ टक्के भरली होती. पण, उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच त्याच २५ ते ३० टक्के घट झाली होती. उन्हाळा संपताना अनेक धरणे रिकामी झाली होती. यंदा विक्रमी पाणीसाठा आहे, पण तो पुढील पावसापर्यंत पुरेशा प्रमाणात टिकणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पावसाचा वाढता कालावधी लक्षात घेता आता जलसंपदा विभागाकडूनही पावले उचलली जात आहेत. आतापर्यंत १५ जुलैपर्यंतच धरणांतील पाण्याचे नियोजन करण्यात येत होते. त्यात वाढ करून राज्यातील पाणीसाठय़ाचे नियोजन आता १५ ऑगस्टपर्यंत केले जाणार आहे.

pavlas.mugutmal@expressindia.com

Story img Loader