एअरबसच्या ताफ्यातील ए – ३२० विमानांच्या देखभाल दुरुस्तीच्या माध्यमातून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) व्यावसायिक विमानांना सेवा देण्याच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. हवाई दलासाठी मिग, सुखोई या लढाऊ विमानांची बांधणी आणि संपूर्ण देखभाल-दुरुस्ती (ओव्हरहॉल) अर्थात एमआरओचा प्रदीर्घ अनुभव एचएएलकडे आहे. त्याचा उपयोग व्यावसायिक विमानांसाठी केला जाणार आहे. देशातील नागरी विमान वाहतूक उद्योग वेगाने विस्तारत असून यातील संधी साधण्याची तयारी एचएएलने केली आहे.

एअरबस – एचएएलचा करार काय?

एअर बसच्या ए – ३२० ताफ्यासाठी एचएएलच्या नाशिक प्रकल्पात संपूर्ण देखभाल-दुरुस्ती केंद्राची (एमआरओ, ओव्हरहॉल) सुविधा स्थापन करण्याचा हा करार आहे. विमान कंपन्यांना सेवा देण्यासाठी एचएएलला देशात एकात्मिक देखभाल, दुरुस्ती व ओव्हरहॉल केंद्राची स्थापना करायची आहे. या करारातून त्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात आले. एअरबसच्या सहकार्याने एचएएल नाशिक प्रकल्पात पायाभूत सुविधा उभारणार आहे. देशात अशा प्रकारची ही एकमेव सुविधा असेल. करारान्वये एअरबस साधन सामग्री (सुट्टे भाग) पुरवठा, देखभाल-दुरुस्तीसाठी विशेष सल्लागार सेवा एचएएलला देईल. वर्षभरात या केंद्रात पहिले ए – ३२० विमान देखभाल, दुरुस्तीसाठी आणण्याचे नियोजन आहे. युरोपियन युनियनच्या विमान वाहतूक सुरक्षा संस्थेकडून (ईएएसए) मंजुरी मिळाल्यानंतर एअरबसच्या अशिया विभागातील सर्व विमानांची दुरुस्ती याच केंद्रात करण्याचे निश्चित झाले आहे.

Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Robotic assisted Surgery at Fortis Hospital
हृदयविकाराच्या रुग्णावर केली रोबोटिक गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया!
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती

हेही वाचा – विश्लेषण : विद्यापीठातील प्र-कुलगुरू नियुक्तीच्या नव्या पद्धतीला वाढता विरोध का?

एमआरओ उद्योग कसा विस्तारतोय?

कुठल्याही विमानाला कार्यरत राखण्यासाठी नियमित देखभाल, दुरुस्ती आणि संपूर्ण देखभाल-दुरुस्ती (ओव्हरहॉल) अर्थात एमआरओ व्यवस्था महत्वाची मानली जाते. नीती आयोगाच्या गेल्या वर्षीच्या अहवालानुसार देशात सध्या ७१३ व्यावसायिक विमानांचा ताफा आहे. पुढील काळात ही संख्या एक हजाराचा टप्पा ओलांडणार आहे. वार्षिक १५ टक्के प्रवासी वृद्धीमुळे (करोनापूर्वी) भारतीय विमान वाहतूक क्षेत्र २०२४ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी हवाई प्रवासी बाजारपेठ बनण्याचा अंदाज वर्तविला जातो. एक हजारपेक्षा जास्त व्यावसायिक विमानांची मागणी नोंदवली गेली आहे. विमान कंपन्या आपल्या उत्पन्नातील १२ ते १३ टक्के निधी देखभाल, दुरुस्तीवर खर्च करतात. इंधनानंतर एमआरओ त्यांच्यासाठी सर्वाधिक खर्चिक बाब. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२१ मध्ये सुमारे १७० कोटींवर असणारा एमआरओ व्यवसाय २०३१ पर्यंत ४०० कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. 

विमान दुरुस्ती कशी, कुठे होते?

देशातील हवाई वाहतूक प्रचालक विशिष्ट उड्डाण तासानंतर व्यावसायिक विमानांच्या आवश्यक त्या प्राथमिक पडताळणीचे (ए आणि बी तपासणी) काम आपल्या स्तरावर करतात. व्यावसायिक विमानांची साधारणत १८ ते २४ महिन्यांतून एकदा सखोल पडताळणी (सी तपासणी) केली जाते. तशीच पडताळणी संपूर्ण देखभाल-दुरुस्तीसाठी (डी तपासणी) केली जाते. विमानातील सर्व उपकरणे, इंजिन, ब्रेक, विमान उतरताना वापरला जाणारा गिअर, रचनात्मक सुट्टे भाग, विमान विज्ञानाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली व उपकरणे आदी प्रत्येक भागाची तपासणी होते. या स्वरुपाच्या तपासणीला बराच वेळ लागतो. एअरफ्रेमची देखभाल, दुरुस्ती देशात होते. परंतु, इंजिन व सखोल देखभालीची कामे अधिक्याने त्रयस्थ परदेशी संस्थेकडून करून घ्यावी लागतात.

संधी कोणत्या?

देशातील व्यावसायिक विमानांचा ताफा जसा विस्तारतोय, तशी एमआरओ सेवांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे देशाअंतर्गत व परदेशी गुंतवणूकदारांसह ही सेवा पुरवणाऱ्या घटकांसमोर गुंतवणूक संधी उपलब्ध होतील, याकडे नीती आयोगाचा अहवाल लक्ष वेधतो. देशात कमी खर्चात, कमी वेळेत विमान देखभाल, दुरुस्तीची कामे करता येतील. जगात भारताची मजबूत अभियांत्रिकी कौशल्याधारीत देश म्हणून ओळख आहे. एमआरओ क्षेत्रासाठी कुशल अभियंत्यांची स्थानिक पातळीवर मुबलक उपलब्धता आहे. त्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य ही देखील जमेची बाजू आहे.

एचएएलचा अनुभव कसा आहे?

मागील सहा दशकांपासून एचएएल लढाऊ विमानांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी सांभाळत आहे. या काळात मिग प्रकारातील तब्बल १८०० हून अधिक विमानांची दुरुस्ती करण्यात आली. नाशिक प्रकल्पात सुखोई – ३० एमकेआय विमानाच्या दुरुस्ती व संपूर्ण देखभाल, दुरुस्तीसाठी (ओव्हरहॉल) पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी विमानाचे विलगीकरण, संरचनात्मक दुरुस्ती, जोडणी, छत दुरुस्ती, इंधन टाकी गळती तपासणी, उड्डाण चाचणी आदी सर्व प्रकारची व्यवस्था आहे. मिग श्रेणीतील काही विमानांच्या अद्ययावतीकरणाचे कार्य या प्रकल्पात झाले आहे. या बळावर एचएएल देशाअंतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. एचएएलच्या नाशिक प्रकल्पात संपूर्ण देखभाल दुरुस्ती अर्थात ओव्हरहॉल विभागात सुमारे ९०० कर्मचारी आणि ४०० अधिकारी आहेत.

हेही वाचा – विश्लेषण : वसई-विरार, मीरा-भाईंदरचे वाहतूक धोरण काय आहे? कोंडी कमी करण्यात ते कितपत व्यवहार्य?

दुरुस्तीचा कालावधी किती असणार?

विशिष्ट हवाई तास उड्डाण झाल्यानंतर लढाऊ विमानाचे सर्व भाग पूर्णपणे विलग केले जातात. प्रत्येक सुट्ट्या भागाची तपासणी केली जाते. त्यांची झीज, यंत्रणांमधील दोष यावर संशोधन होते. प्रयोगशाळेत सखोल छाननीच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पडते. त्यात सदोष सुटे भाग काढून त्यांच्या जागी नवीन भाग बसविले जातात. एका लढाऊ विमानाच्या ओव्हरहॉलसाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो. व्यावसायिक विमानांसाठी तो किती असेल, याची स्पष्टता नाही. दोष कोणत्या प्रकारचा आहे, त्यावर हा कालावधी अवलंबून असेल, असे एचएएलचे अधिकारी सांगतात.

Story img Loader