अमेरिकेच्या अध्यक्षीय प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्याच एका महिला समर्थकामुळे डोनाल्ड ट्रम्प चर्चेत आले आहेत आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची चिंता वाढली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्वतःला शोध पत्रकार म्हणवणाऱ्या लॉरा लूमर यांच्यातील जवळीकतेमुळे पक्षाची चिंता वाढली आहे. ११ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या अध्यक्षीय वादविवाद सत्र आणि ९/११ च्या हल्ल्याच्या स्मारकाला भेट देण्यासाठी लूमर यांनी ट्रम्प यांच्या खासगी विमानातून प्रवास केला. त्याबद्दल ग्रॅण्ड ओल्ड पार्टी (GOP) नाखूष आहेत. लूमर यांच्यामुळे रिपब्लिकन नेते चिंतेत का आहेत? ट्रम्प आणि लूमर यांचा नेमका संबंध काय? लॉरा लूमर कोण आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.

लॉरा लूमर कोण?

लॉरा लूमर (वय ३१) एक सोशल मीडिया इनफ्लूएन्सर आहेत. त्या अतिउजव्या विचारसरणीच्या असून, गेल्या काही वर्षांत त्यांनी वर्णद्वेषी, इस्लामविरोधी व लैंगिकतावादी टिप्पण्या केल्या आहेत. लूमर यांनी इस्लामचे वर्णन ‘कॅन्सर (कर्करोग)’ असे केले आणि ‘proudislamophobe’ असा हॅशटॅग वापरला, अशी माहिती ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ (एनवायटी)च्या वृत्तात देण्यात आली आहे. २०१८ मध्ये ‘एक्स’वर (तेव्हा ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) वारंवार मुस्लिमविरोधी पोस्ट केल्याबद्दल त्यांचे अकाऊंट बंद करण्यात आले. त्याचा निषेध करण्यासाठी, लूमर यांनी न्यूयॉर्कमधील कंपनीच्या मुख्यालयात जाऊन स्वतःच्या हातात बेड्या घातल्या आणि नाझींनी ज्यूंना परिधान करण्यास भाग पाडलेला पिवळ्या ताऱ्याचा ‘बॅज’ही परिधान केला होता. लूमरदेखील ज्यू आहेत, असे ‘एनवायटी’च्या वृत्तात म्हटले आहे. एलोन मस्कने कंपनी विकत घेतल्यानंतर, लूमर यांचे खाते पुनर्संचयित केले गेले आणि सध्या लूमरचे ‘एक्स’वर १.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi: बिगबॉस सारखे शो प्रेक्षकांच्या मानसिकतेशी कसे खेळतात?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
five trillion dollar economy
विश्लेषण: रुपयातील घसरणीने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्टच अवघड?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
earth mini moon
दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र; ही दुर्मीळ खगोलीय घटना काय आहे?
Nawab Malik Son in Law Accident
Sameer Khan : नवाब मलिक यांचा जावई कार अपघातात गंभीर जखमी, समीर खान आणि निलोफर यांच्या थारचा मुंबईत अपघात
pager blasts in Lebanon marathi news
विश्लेषण: लेबनॉन पेजर-स्फोट मालिकेमागे कोणाचा हात? हेझबोलाला धडा शिकवण्यासाठी इस्रायलची क्लृप्ती?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
लॉरा लूमर (वय ३१) एक सोशल मीडिया इनफ्लूएन्सर आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : तरुण वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण का वाढतेय? याचा अपचनाशी काही संबंध आहे का?

२०१५ पासून लूमर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. २०१५ मध्ये मियामीजवळील बॅरी विद्यापीठाचे अधिकारी इस्लामिक स्टेट किंवा ‘आयएसआयएस’ला समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक क्लब सुरू करण्याच्या योजनेवर चर्चा करीत होते. या चर्चेचा लूमर यांनी गुप्तपणे एक व्हिडीओ तयार केला. ‘प्रोजेक्ट व्हेरिटास’ या पुराणमतवादी माध्यम संस्थेच्या हाती हा गुप्त व्हिडीओ लागला आणि त्यांनी याची बातमी केली. लूमर यांनी अनेक वर्षे या माध्यम संस्थेबरोबर काम केले. २०१७ साली त्यांनी ज्युलियस सीझरच्या नाटकात व्यत्यय आणला आणि या नाटकातील पात्र आणि ट्रम्प यांच्यात साम्य असल्याचे सांगत नाटकाचा निषेध केला. त्यानंतर लूमर प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

लूमर या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंतर्गत मंडळाच्या सदस्य कशा झाल्या?

२०२० मध्ये लॉरा लूमरने काँग्रेसच्या (काँग्रेस हे अमेरिकेचे विधिमंडळ आहे) निवडणुकांसाठी रिपब्लिकन प्रायमरी जिंकली. ट्रम्प यांनी त्यांचे ‘एक्स’वर अभिनंदनही केले. परंतु, सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दोन वर्षांनंतर त्यांनी फ्लोरिडातील रिपब्लिकन नेते डॅनियल वेबस्टर यांना आव्हान दिले; परंतु प्राथमिक फेरीतच त्यांचा पराभव झाला, असे ‘एनवायटी’च्या वृत्तात दिले आहे. २०२१ पासून लूमर फ्लोरिडातील ट्रम्प यांच्या ‘मार-ए-लागो रिसॉर्ट’मध्ये किमान नऊ वेळा दिसल्या आहेत, असेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. २०२३ मध्ये त्यांना ट्रम्प यांच्या अध्यक्षीय मोहिमेच्या सदस्य म्हणून नियुक्त केले गेले. मात्र, रिपब्लिकन पक्षाची ही योजना फसल्याचे चित्र आहे. लूमर यांनी असे म्हटले आहे की, त्या राजकीय उद्देशासाठी काम करीत नाहीत; परंतु ट्रम्प यांना लूमर यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे.

२०२१ पासून लूमर फ्लोरिडातील ट्रम्प यांच्या ‘मार-ए-लागो रिसॉर्ट’मध्ये किमान नऊ वेळा दिसल्या आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

रिपब्लिकन पक्ष चिंतेत का?

ट्रम्प यांनी लूमर यांना निवडणूक मोहिमेत सहभागी करून घेतल्याने पक्षातील अनेक नेत्यांना मोहीम चुकीच्या दिशेने जात असल्याची काळजी वाटू लागली आहे. ‘एनबीसी न्यूज’नुसार, ट्रम्प यांच्या काही समर्थकांचे, “ट्रम्प यांचे लूमर यांच्याशी असलेले संबंध पाहता, निवडणुकीत महत्त्वाच्या राज्यांमध्ये त्यांना मते मिळू शकतात”, असे मत आहे. विद्यमान उपाध्यक्ष आणि ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांच्या भारतीय वारशावरही लूमर यांनी वर्णद्वेषी टिप्पणी केली; ज्याबाबत डेमोक्रॅटिक पक्षासह रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनीही विरोध व्यक्त केला. हॅरिस अध्यक्षपदी निवडून आल्यास व्हाईट हाऊसला ‘करी’सारखा (भाजीसारखा) वास येईल, अशी टीका त्यांनी केली. त्यानंतर रिपब्लिकन पक्षात जणू संतापाची लाटच उसळली.

हेही वाचा : चीनवर निवृत्तीचे वय वाढवण्याची वेळ का आली? ४० वर्षांनंतर का घ्यावा लागला एवढा मोठा निर्णय?

दीर्घकाळ ट्रम्पचे निष्ठावंत राहिलेले आणि अत्यंत उजव्या विचारसरणीचे राजकारणी मार्जोरी टेलर-ग्रीन यांनी गुरुवारी (१२ सप्टेंबर) लूमरच्या विधानाचा निषेध केला आणि म्हटले की, त्यांना लूमर यांचे विधान आणि त्यांची द्वेषपूर्ण भाषा याबद्दल चिंता आहे. त्यांच्या व्यक्तव्याचा आणि ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेचा काहीही संबंध नाही, असेदेखील ते म्हणाले. रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनीदेखील लूमर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. उपाध्यक्षपदाचे उमेदवार जे. डी. व्हॅन्स यांच्या पत्नीही भारतीय वंशाच्या आहेत. त्यांनीही लूमर व त्यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवले आणि त्यांच्या विधानांशी आपण सहमत नसल्याचे सांगितले.