काही दिवसांच्या वातावरण निर्मितीनंतर अखेर रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनमध्ये आक्रमण केले. रशियाच्या आकाराच्या तुलनेत युक्रेन देश जरी लहान असला तरी वर्षभरात रशियाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. युक्रेनच्या पूर्वेकडील भाग हा सध्या रशियाच्या वर्चस्वाखाली आहे. पूर्व भागात असलेल्या युक्रेनच्या राजधानीवर अजुनही रशियाला ताबा मिळवता आलेला नाही. मोठं नुकसान सोसुनही युक्रेन रशियाशी प्राणपणाने लढत असल्याचं वर्षभरानंतरचं चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
स्थलांतर
या युद्धाचा सर्वांत मोठा फटका अर्थात युक्रेनमधील सर्वसामान्य लोकांना बसला आहे. United Nations Refugee Agency (UNHCR) च्या दाव्यानुसार जवळपास ६३ लाख नागरीकांनी युक्रेनमधून पश्चिम दिशेला – युरोपमध्ये आसरा घेतला आहे. तर ६६ लाखांपेक्षा जास्त लोकांना युक्रेनमध्येच युद्धक्षेत्रापासून दूर म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे स्थलांतर करावं लागलं आहे, राहतं घर सोडावं लागलं आहे. काही प्रमाणात युक्रेनच्या पूर्वेकडील भागातील नागरीकांनी रशियात देखील स्थलांतर केलं आहे.
गरिबी आणि मंदी
युद्धामुळे युक्रेनमधील परिस्थिती ही वेगाने बिघडली असून आता जवळपास ४० टक्क्यांपेक्षा जास्त जनता ही मानवतवादी मदतीवर अवलंबून आहे. जागतीक बॅँक आणि युक्रेन सरकारच्या म्हणण्यानुसार देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न हे तब्बल ३५ टक्क्यांनी घसरलं आहे. रशियाच्या हल्ल्यात तब्बल १३९ अब्ज डॉलर्स एवढ्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. देशातील ६० टक्के जनता ही आता द्रारिद्रय रेषेखाली गेली आहे.
रशियाचीही घसरगुंडी
युक्रेन युद्धाचा भार हा रशियाला सोसावलेला दिसत नसल्याचं आता वर्षभानंतर स्पष्ट झालं आहे. युद्धाला सुरुवात झाल्यावर अमेरिका, युरोप तसंच जगभारातील अनेक देशांनी रशियावर विविध निर्बंधांचा मारा केला. त्यामुळे आता वर्ष उलटतांना रशियाचे अर्थचक्र कोलमडण्याच्या स्थितीत आहे. Organisation for Economic Co-operation and Development च्या म्हणण्यानुसार रशियाची अर्थव्यवस्था ५.६ टक्क्यांनी आक्रसली आहे.
युक्रेन युद्ध सुरु झाल्यावर सुरुवातीच्या काही दिवसात तेल आणि गॅल विक्रीमुळे मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. युरोपाकडून होणारी खरेदी जरी थांबली असली तरी जगभरातून रशियाकडे मागणी वाढली होती. मात्र आता ही विक्री पुन्हा पूर्वपदावर आल्याचं चित्र आहे, म्हणजे युद्ध सुरु झाल्यावर जेवढी विक्री होत होती त्यावर काटा स्थिरावला आहे.
युक्रेनसाठी अब्जावधी लष्करी मदत
रशियाने आक्रमण केल्यावर वर्षभरात युक्रेनला जरी जगभरातून पाठिंबा मिळाला असला तरी प्रत्यक्षात थेट युक्रेनमध्ये मदतीला कोणताही देश पुढे आलेला नाही हे विशेष. असं असलं तरी सुरुवातीचा काळ वगळता विविध प्रकारे मदत खास करुन थेट लष्करी मदत पण ती युद्ध साहित्यांच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणात युक्रेनमध्ये सुरु झाली आहे. आत्तापर्यंत तब्बल ७० अब्ज डॉलर्स किंमतीची लष्करी मदत ही युक्रेनला करण्यात आली आहे, यामध्ये अर्थात अमेरिकेचा आणि त्यानंतर जर्मनीचा वाटा मोठा आहे.
युरोपीयन युनियनने आता हळूहळू युद्धक्षेत्रापासून जवळ लष्कर तैनात करत गस्त वाढवली आहे. जमीन, समुद्र आणि आकाश या ठिकाणाहून युक्रेनमधील युद्धभूमिकडे लक्ष ठेवलं जात आहे.
गव्हाचे भाव सावरले
रशिया आणि युक्रेन युद्धाचा अन्न धान्य उत्पादनावर आणि विक्रीवर एक मोठा परिणाम होईल, जगाला याचा मोठा फटका बसेल असा अंदाज सुरुवातील वर्तवला जात होता. खास करुन गव्हाच्या बाबतीत हे प्रकर्षाने सांगितले जात होते. युक्रेनला तर युरोपमध्ये गव्हाचे कोठार असं म्हंटलं जातं. मात्र जगभरातूनच गव्हाचे उत्पादन हे वाढलेले बघायला मिळाले. २०२१-२२ मध्ये ७७८ दशलक्ष टनावरुन २०२२-२३ मध्ये ७८३ दशलक्ष टन एवढे गव्हाचे उत्पादन जगामध्ये झाले.
रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यावर दर टनामागे गव्हाच्या किंमतीने ४३० युरो एवढा उच्चांक गाठला होता. युद्ध सुरु होण्यापूर्वी हा दर २७५ युरो एवढा होता. आता ही किंमत दर टनामागे ३०० युरो एवढी स्थिरावली आहे. थोडक्यात गव्हाच्या किंमतीत फार मोठी वाढ झालेली नाही. ऑस्ट्रेलिया आणि रशियाने गव्हाच्या उत्पादनात मोटी वाढ केली. रशियाचा दावा आहे की युक्रेनव्याप्त भागातील कृषी क्षेत्रामुळे अन्न धान्य उत्पादनात मोठा पल्ला गाठता आला.