केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘भारतातील रस्ते अपघात २०२२’संबंधी वार्षिक अहवाल मंगळवारी (३१ ऑक्टोबर) प्रकाशित केला. या अहवालानुसार २०२२ या एका वर्षात देशातील राज्ये, तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या क्षेत्रात एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १,६८,४९१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे; तर ४,४३,३६६ जण जखमी झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आधीच्या वर्षातील आकडेवारीशी तुलना करता, या अहवालानुसार २०२२ या वर्षी अपघातात ११.९ टक्के, मृत्यूंमध्ये ९.४ टक्के, तर जखमींच्या प्रमाणात १५.३ टक्के वाढ झाली असल्याचे समोर येत आहे. या अहवालातील सात महत्त्वाच्या मुद्द्याचा द इंडियन एक्स्प्रेसने ऊहापोह केला आहे.

१. वाहनांचा अतिवेग सर्वाधिक मृत्यूस कारणीभूत

२०२२ मध्ये एकूण अपघातांपैकी ७२.३ टक्के अपघात केवळ वाहन वेगाने चालविल्यामुळे झाले आहेत. वेगाने वाहन चालविल्यामुळे ७१.२ टक्के मृत्यू आणि ७२.८ टक्के लोक जखमी झाले आहेत. २०२१ च्या वेगाने वाहन चालविण्याच्या घटनांची तुलना केल्यास एकूण अपघातांमध्ये १२.८ टक्के, मृत्यूंमध्ये ११.८ टक्के आणि जखमींच्या संख्येत १५.२ टक्के एवढी वाढ झाली आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालविणे हे अपघाताचे दुसरे मोठे कारण असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे; ज्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या ४.९ टक्के एवढी दाखविण्यात आली आहे.

Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”

हे वाचा >> राज्यात दिवसाला ४२ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू

२. सर्वाधिक अपघात सरळ रेषेत असलेल्या महामार्गावर

अहवालातील आकडेवारीनुसार ६७ टक्के अपघात हे सरळ रेषेत असलेल्या रस्त्यांवर झालेले आहेत. वळण असलेले रस्ते, खड्डेमय रस्ते, तीव्र उतार यांसारख्या रस्त्यांपेक्षा चार पट अधिक अपघात सरळमार्गी असलेल्या रस्ते किंवा महामार्गावर झाले आहेत.

३. मागून धडक देणे सर्वांत सामान्य कारण

२०२२ मधील अहवालात मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातांची सर्वाधिक नोंद करण्यात आली आहे. एका वाहनाची दुसऱ्या वाहनाला बसणारी टक्कर किंवा धडकेपैकी सर्वाधिक संख्या या प्रकारची असून, ती २१ टक्क्यांपर्यंत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्याखालोखाल समोरासमोर धडक देण्याचे प्रमाण १६.९ टक्के एवढे आहे.

४. दिवासाच्या उजेडात सर्वाधिक अपघात

तीन-चतुर्थांश अपघात दिवसाच्या उजेडात झालेले आहेत; ज्यावेळी सूर्याचा लख्ख प्रकाश असतो, त्या प्रकाशात सर्वाधिक अपघात झाल्याचे समोर आल्यामुळे आश्चर्य वाटू शकते. दिवसा उजेडात झालेल्या अपघातांची संख्या ७४.२ टक्के एवढी आहे; तर त्यामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या ७१ टक्के एवढी आहे. याउलट पाऊस, धुके व गारा पडत असताना झालेल्या अपघातांची संख्या १६.६ टक्के एवढी आहे.

५. दुचाकी वाहनांचे सर्वाधिक अपघात आणि मृत्यू

२०२२ मध्ये दुचाकी वाहनांचे एकूण ६३,११५ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये २५,२२८ मृत्यू झालेले आहेत. चारचाकी वाहनांचे अपघात दुसऱ्या क्रमाकांवर असून, अशा अपघातांची संख्या २९,००५ असून, त्यात १०,१७४ लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर, पादचारी अपघातग्रस्त होण्याच्या २०,५१३ घटना घडल्या आहेत; ज्यात १०,१६० पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा >> राज्यात रस्ते अपघातांत वाढ; दोन वर्षांत २७ हजार जणांचा मृत्यू; ११ जानेवारीपासून रस्ते सुरक्षा अभियान

६. अपघातांचा सर्वाधिक मृत्यूदर सिक्कीममध्ये; लडाख, दमण आणि दीवमध्ये सर्वांत कमी

रस्ते अपघातांची आकडेवारी विशद करण्यासाठी नमूद केलेल्या राज्यांतील वाहनांच्या संख्येवरून मृत्यूदर काढण्यात येतो. प्रत्येक १० हजार वाहनांमागे रस्ते अपघातांत मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या किती, या निकषावरून मृत्यूदर काढला जातो. त्यानुसार सिक्कीममध्ये सर्वाधिक मृत्यूदर असल्याचे आढळून आले आहे. सिक्कीमचा मृत्यूदर १७ एवढा आहे. तर, केंद्रशासित प्रदेश लडाख, दमण आणि दीव यांचा मृत्यूदर ‘शून्य’ असून, तो सर्वांत कमी आहे. भारताचा सरासरी मृत्यूदर ५.२ एवढा आहे; तर महाराष्ट्राचा मृत्यूदर देशाच्या सरासरीपेक्षा कमी असून, तो चार एवढा आहे.

७. तमिळनाडूमध्ये सर्वाधिक अपघात

तमिळनाडूमध्ये सर्वाधिक अपघातांची नोंद झाली असून, एकूण ६४,१०५ अपघात नोंदविले गेले आहेत. मागच्या वर्षापेक्षा अपघातांच्या संख्येमध्ये १५.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एकूण अपघातांपैकी ही संख्या १३ टक्क्यांनी अधिक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेशचे नाव आहे. २०२२ मध्ये ५४,४३२ अपघातांची नोंद झाली आहे. त्यात महाराष्ट्राचा क्रमांक सहावा असून, महाराष्ट्रात ३३,३८३ अपघातांची नोंद झाली आहे.

८. दिवसभरात १२०० हून अधिक अपघात

भारतात दिवसभरात १,२६४ अपघात होतात आणि ४६२ मृत्यू या अपघातांत होत असतात. तासाचा हिशेब करायचा झाल्यास भारतात प्रत्येक तासाला ५३ अपघात होतात आणि त्यात १९ लोकांचा मृत्यू होत असतो.