तरुणांमधील वाढती बेरोजगारी ही चीनमध्ये मोठी आर्थिक समस्या ठरत आहे. चीनमधील बहुतांश तरुणांना कमी पगाराच्या नोकर्‍या कराव्या लागत आहेत. वाढत्या बेरोजगारीमुळे चीनमध्ये एका नवीन ट्रेंडला सुरुवात झाली आहे. या ट्रेंडचे नाव आहे ‘रॉटन टेल किड्स’ ट्रेंड. चीनमध्ये महाविद्यालयीन पदवीधरांजवळ रोजगार नाही. काही तरुण कमी पगाराच्या नोकर्‍या करीत आहेत; तर काहींना त्यांच्या पालकांवर अवलंबून राहावे लागत आहे. चीनमध्ये नक्की काय परिस्थिती आहे? चीनमधील वाढत्या बेरोजगारीचे कारण काय? ‘रॉटन टेल किड्स’ हा ट्रेंड नक्की काय आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला चीन महागाई आणि बेरोजगारीने हैराण आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच १६-२४ वर्षे वयोगटातील सुमारे १०० दशलक्ष तरुण बेरोजगार झाल्यामुळे चीनमधील तरुण बेरोजगारीचा दर २० टक्क्यांहून अधिक झाला होता. जून २०२३ मध्ये हा दर २१.३ टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचला. वर्षभरानंतरही चीनमधील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. या वर्षी जुलैमध्ये बेरोजगारीचा दर १७.१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. कारण- ११.७९ दशलक्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या उन्हाळ्यात पदवी प्राप्त केली आहे. हे तरुण अजूनही नोकरी मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहेत.

p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
या वर्षी जुलैमध्ये बेरोजगारीचा दर १७.१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. कारण- ११.७९ दशलक्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या उन्हाळ्यात पदवी प्राप्त केली. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसक संघर्ष; सत्तांतरानंतरही बांगलादेशी निषेध का करत आहेत?

‘रॉटन टेल किड्स’ हा ट्रेंड काय आहे?

‘रॉटन टेल किड्स’ हा वाक्प्रचार या वर्षी सोशल मीडियावर एक गूढ शब्द ठरत आहे. ‘रॉटन टेल बिल्डिंग’ या मूळ शब्दापासून हा शब्द आला आहे आणि तो २०२१ पासून चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणाऱ्या लाखो घरांचा संदर्भ देतो. आता नोकरी शोधणार्‍या तरुण वर्गाला ‘रोटन टॉल किड्स’ असे नाव देण्यात आले आहे.

सरकार काय करतंय?

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी वारंवार जोर देऊन स्पष्ट केले आहे की, तरुणांसाठी नोकऱ्या शोधण्याला त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रोजगार मेळाव्यांसारखे अनेक उपक्रम चीनमध्ये राबविले जात आहेत. सरकारने नोकरभरतीला चालना देण्यासाठी सहायक व्यवसाय धोरणेही आणली आहेत. “बऱ्याच चिनी महाविद्यालयीन पदवीधरांसाठी नोकरीच्या चांगल्या संधी, सामाजिक गतिशीलता, चांगल्या जीवनाचा दृष्टिकोन या सर्व गोष्टी निरर्थक ठरत आहेत,” असे मिशिगन विद्यापीठातील समाजशास्त्राचे सहायक प्राध्यापक युन झोउ यांनी सांगितले आहे. नोकऱ्यांच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी सरकारी प्रयत्न सुरू असूनही परिस्थितीमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या तरुणांमध्ये निराशा आहे. हताश असलेल्या आणि नोकरी शोधणाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या काही घोटाळ्यांमुळे परिस्थिती आणखीन बिकट झाली आहे; ज्यामुळे सध्याच्या नोकरीच्या बाजारपेठेत अंधकार पसरला आहे, असे म्हणता येईल.

चीनमधील सरकारी मालकीची मीडिया एजन्सी ‘ग्लोबल टाइम्स’ने उद्योग आणि सेवा क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञानाच्या वाढीचा हवाला देत, देशातील रोजगार परिस्थिती बहुतांश स्थिर असल्याचे म्हटले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी नुकतीच पदवी प्राप्त केल्याने तरुणांमध्ये बेरोजगारीची संख्या वाढली असल्याचे ‘आउटलेट’ने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.

तरुणांची परिस्थिती काय?

चीनमध्ये शैक्षणिक क्षेत्रातही स्पर्धा आहे. या स्पर्धात्मक वातावरणात घालवलेली अनेक वर्षे आणि मेहनत करून प्राप्त केलेल्या पदवीनंतरही तरुण नोकर्‍या मिळवण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे त्यांचा उल्लेख ‘रोटन टॉल किड्स’ असा केला जात आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांकडे मर्यादित नोकऱ्यांचे पर्याय आहेत. त्यामुळे आता ते उच्च पगाराच्या नोकऱ्यांबद्दलची त्यांची अपेक्षा कमी करून, कमी पगाराची नोकरी करण्यासही तयार आहेत; तर काही जण गुन्हेगारीकडेही वळले आहेत.

झेफिर काओने गेल्या वर्षी बीजिंगमधील प्रतिष्ठित चायना फॉरेन अफेअर्स विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. हेबेई या त्याच्या मूळ प्रांतात अपेक्षेपेक्षा कमी वेतनाची नोकरी करीत असल्याने त्याच्या शिक्षणाच्या मूल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर त्याने नोकरीचा शोध थांबवला आहे. हुबेई युनिव्हर्सिटी ऑफ चायनीज मेडिसिनमधून नुकतीच पदवी मिळविलेल्या अमाडा चेनने एक महिन्यानंतर गेल्या आठवड्यात सरकारी मालकीच्या एंटरप्राइझमधील नोकरी सोडली. त्यासाठी तिने तिच्या अवास्तव अपेक्षांना दोष दिला. तिच्या प्रोबेशनच्या पहिल्या १५ दिवसांसाठी तिला दररोज १२ तास काम करूनही दिवसाला फक्त ६० युआन (८.४० डॉलर्स म्हणजे ७०६.९२ रुपये) मिळत होते.

ती म्हणाली, “मी आठवडाभर दररोज रडत होते. चेनला गुणवत्ता निरीक्षक किंवा संशोधक बनायचे होते. तिला वाटले होते की, तिच्या कौशल्यांशी जुळणारी अशी पारंपरिक चिनी औषध प्रमुख म्हणून नोकरी तिला मिळेल. तिने नोकरीसाठी १३० हून अधिक ठिकाणी अर्ज केले; पण त्यातील बहुतेक कंपन्यांकडून तिला सेल्स किंवा ई-कॉमर्सशी संबंधित पदांचीच ऑफर देण्यात आली. चेन म्हणाली की, ती तिच्या करिअरच्या मार्गाचा पूर्णपणे पुनर्विचार करीत आहे आणि कदाचित ती मॉडेलिंगकडे वळेल.

हेही वाचा : Badlapur Sexual Assault : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात एफआयआरमध्ये शाळेचे नाव का? कायदा काय सांगतो?

या समस्येचे मूळ कारण काय आहे?

महाविद्यालयीन पदवीधरांमधील बेरोजगारीचा प्रश्न एका रात्रीत उद्भवलेला नाही. १९९९ मध्ये चीनने आपल्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चांगले शिक्षित कर्मचारी तयार करण्यासाठी विद्यापीठांच्या नावनोंदणी क्षमतेचा विस्तार केला. परंतु, नोकर्‍यांपेक्षा जास्त पदवीधर तयार होऊ लागले. २००७ मध्ये अधिकाऱ्यांनी नोकऱ्यांच्या उपलब्धतेबद्दल चिंता व्यक्त केली होती. मध्यंतरी ही समस्या कमी झाली; परंतु पूर्णपणे नाहीशी झाली नाही. २०२४ ते २०३७ पर्यंत ही समस्या आणखी वाढेल, असे शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या चायना हायर एज्युकेशन रिसर्च या जर्नलने जूनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. २०३४ मध्ये नवीन महाविद्यालयीन पदवीधरांची संख्या सुमारे १८ दशलक्ष इतकी असेल, असेही त्यात म्हटले आहे.