सुशांत मोरे

राज्याच्या परिवहन विभागाने वाहनांशी संबंधित सेवा ऑनलाइन केल्या आहेत. मात्र तरीही कागदपत्रे सादर करण्यासाठी आरटीओच्या कार्यालयात खेटे घालावे लागत असल्याने वाहनमालक – चालकांना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. परिवहन विभागाने आता नागरिकांची यातूनही सुटका केली असून आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची सेवा उपलब्ध केली आहे. यासाठी आधारकार्ड क्रमांकाची जोडणी करावी लागणार आहे. या सुविधेमुळे वाहनचालक – मालकांचा आरटीओ कार्यालयात जाण्याचा बराचसा वेळ वाचणार आहे.

Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
EPF Pension Scheme Eligibility
EPF Pension Schemeसाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या काय आहे पात्रता, आर्थिक सुरक्षा आणि करबचत फायदे
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन

परिवहन विभागाचे ऑनलाइन सेवांचे धोरण काय?

महाराष्ट्रात सध्या ५० आरटीओ आणि डेप्युटी आरटीओ आहेत. वाहनांशी संबंधित अनेक कामे आरटीओत केली जातात. त्यासाठी वाहनमालक – चालकांना आरटीओच्या कार्यालयात खेटे घालावे लागतात. विविध सेवा ऑनलाइन केल्यानंतरही संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी पुन्हा आरटीओत जावे लागत होते. मात्र केंद्र सरकारने १६ सप्टेंबर २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ५८ सेवा आधारकार्ड क्रमांकाचा वापर करून नागरिकांना फेसलेस पद्धतीने देण्याचे सूचित केले. महाराष्ट्रात परिवहन विभागामार्फत अनुज्ञप्ती (लायसन्स), नोंदणी प्रमाणपत्र, कर तसेच परवानासंबंधित ११५ सेवा देण्यात येत असून यातील ८४ सेवा या ऑनलाइन केल्या आहेत. ८४ सेवांपैकी एकूण १८ सेवा यापूर्वीच ‘फेसलेस’ पद्धतीने करण्यात आल्या आहेत.

  • कोणत्या सेवा आधार क्रमांकाशी जोडल्या?

राज्यातील परिवहनच्या कर भरणासह अनेक सेवा ऑनलाइन करताना त्या आधारकार्ड क्रमांकाशी जोडण्यात आल्या. प्रथम शिकाऊ लायसन्स परीक्षा ऑनलाइन करण्यात आली. या सेवेबरोबरच वाहनांचे राष्ट्रीय परवाना सुविधा, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल, वाहनचालक अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण, वाहन हस्तांतरण, अनुज्ञाप्तीवरील पत्ता बदल, अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, वाहनांकरिता विशेष परवाना, वाहनांसाठी तात्पुरता परवाना, दुय्यम योग्यता प्रमाणपत्र, दुय्यम शिकाऊ अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, वाहकांच्या अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल आणि धोकादायक मालवाहू वाहने चालविण्याची परवानगी या सेवा फेसलेस केल्या आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

ऑनलाइन केलेल्या शिकाऊ लायसन्स परीक्षेचा फायदा काय?

परिवहन विभागाने ऑनलाइन आणि फेसलेस केलेली प्रथम शिकाऊ लायसन्स परीक्षा घरबसल्या देण्याची संकल्पना १४ जून २०२१पासून अमलात आली. राज्यात दरवर्षी सुमारे १५ लाखांहून अधिक शिकाऊ परवाने देण्यात येतात. तसेच २० लाखांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी करण्यात येते. यासाठी वर्षाला १०० कोटी रुपये खर्च होतात. शिकाऊ लायसन्स परीक्षा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने खर्चात बचत होत असून नागरिकांचा वेळही वाचतो. इच्छुकांना परिवहनच्या संकेतस्थळावर जाऊन शिकाऊ लायसन्स हा पर्याय निवडून अर्ज करता येतो. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक जोडून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते. परीक्षा दिल्यानंतर काही वेळातच संबंधित व्यक्तीला परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे ऑनलाइनवरच समजते. पास झालेल्यांना ऑनलाइनवरच शिकाऊ लायसन्स उपलब्ध होते. त्याची छायांकित प्रत काढून संबंधितांना आपल्याजवळ ठेवावी लागते. मात्र आरटीओच्या कार्यालयात जाऊनही ही परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहेच.

आणखी सात सेवांचाही लाभ कसा घ्याल?

वाहनांकरिता विशेष परवाना, वाहनांसाठी तात्पुरता परवाना, दुय्यम योग्यता प्रमाणपत्र, दुय्यम शिकाऊ अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, वाहकांच्या अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल आणि धोकादायक मालवाहू वाहने चालविण्याची परवानगी या सात सेवाही नुकत्याच फेसलेस करण्यात आल्या आहेत. या सेवांचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधारकार्ड आणि त्याच्याशी जोडलेला अचूक मोबाइल क्रमांक असणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. आधारकार्ड क्रमांकाचा वापर केल्यानंतर मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवण्यात येतो. या ओटीपीची नोंदणी परिवहनच्या संकेतस्थळावर केल्यास अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खातरजमा होते आणि अर्जदाराला पुढे अर्ज करणे शक्य होते. अर्जदाराचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाइल क्रमांक याची खातरजमा झाल्यानंतर या सेवांकरिता अर्जदारास कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नसल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्जदाराला कुठूनही अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अर्जदाराच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच कागदपत्रांची प्रत काढण्याची आवश्यकताही नाही.

आणखी कोणत्या सेवा फेसलेस होणार?

राज्यातील नागरिकांना परिवहन विभागाकडून ११५ सेवा देण्यात येतात. यातील ऑनलाइन झालेल्या ८४ पैकी एकूण १८ सेवा यापूर्वीच फेसलेस करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरबसल्या या सेवेचा लाभ घेता येतो. येत्या एक ते दोन महिन्यात आणखी काही सेवा फेसलेस करण्यात येणार असून यामध्ये अनुज्ञप्तीशी (लायसन्स) संबंधित एखाद्या वाहन मालकाच्या नावात बदल करणे, लायसन्सवरील जन्मतारखेतील चूक सुधारणे, परवाना जमा करणे इत्यादींचा समावेश आहे. आतापर्यंत त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी आरटीओच्या कार्यालयात जावे लागत होते. मात्र आधारकार्ड क्रमांक जोडून ही सेवा फेसलेस झाल्यामुळे परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने त्याची पूर्तता करता येणार आहे.