संजय जाधव

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल चेतन सिंह याने केलेल्या गोळीबारात चार जण ठार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. चेतनला मानसिक आजार असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मनोरुग्णांना देण्यात येणारी ‘अँटी-सायकोटिक’ औषधे तो घेत असल्याचेही उघड झाले आहे. मानसिक आजारग्रस्त जवानाच्या हाती शस्त्र का देण्यात आले, असा प्रश्नही यानिमित्ताने समोर आला आहे.

Union Finance Minister Nirmala Sitharaman highlighted mental health in Economic Survey 2024 25 report
तरुणांचे मानसिक आरोग्य कशामुळे बिघडते ? काय म्हणतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Tata Hospital to start super specialty hospital for cancer
कर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय सुरू करणार अतिविशेषोपचार रुग्णालय
Guillain Barre Syndrome , Sinhagad Road Area,
संशयित रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षणाचे केंद्रीय उच्चस्तरीय पथकाचे निर्देश! जाणून घ्या नेमकं काय घडलं…
Hair , bald , Buldhana, Ayurveda, Homeopathy ,
बुलढाण्यात टक्कल पडलेल्यांना पुन्हा केस; ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीसह…
ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या पंजाबने केंद्राकडे ६०० कोटींची मदत का मागितली? (फोटो सौजन्य द इंडियन एक्स्प्रेस)
Punjab Drug Case : ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या पंजाबने केंद्राकडे ६०० कोटींची मदत का मागितली?
suspect arrested for inciting girl doctor suicide
डॉक्टर तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणारा अटकेत; नवी मुंबईत सांगलीतील डॉक्टर ताब्यात
As Pune reports over 50 suspected cases of Guillain-Barré syndrome, doctors explain why cerebrospinal fluid examination is done
हाता-पायाला मुंग्या, अशक्तपणा… पुण्यात नव्या व्हायरसची एन्ट्री! काय आहे हा दुर्मीळ आजार? डॉक्टरांनी दिली माहिती…

जवानाची मानसिक स्थिती कशी होती?

चेतन सिंह याने मथुरा जिल्ह्यातील एका रुग्णालयात १२ फेब्रुवारी २०२३ रोजी एका मेंदूविकारतज्ज्ञाकडे तपासणी करून घेतली होती. ताणतणावावेळी तो आक्रमक होत होता आणि त्याला अनेक विचित्र भास होत होते. त्याला तीव्र डोकेदुखीचाही त्रास असल्याचे त्याच्या आधीच्या वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. तो मानसिक आजारासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेत होता. त्यामुळे प्रवाशांनी भरलेल्या रेल्वे गाडीची सुरक्षा करण्यासाठी मानसिक आजारी असलेल्या जवानाच्या हाती शस्त्र दिल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित झाला आहे.

‘अँटी-सायकोटिक’ औषधे कशासाठी?

चेतन सिंह याच्या मेंदूमध्ये निर्माण झालेल्या गाठींमुळे त्याच्या मेंदूत अनेक बदल घडले होते. त्यामुळे त्याला ‘अँटी-सायकोटिक’ औषधे देण्यात आली होती. या औषधांमुळे चेतासंस्थेची तीव्र प्रतिक्रिया कमी होते. व्यक्तीच्या वर्तनात जास्त चढउतार होऊ नयेत, यासाठी ही औषधे दिली जातात. चेतनला निद्रानाश आणि तीव्र डोकेदुखीची समस्या असल्याने ही औषधे देण्यात आली होती, असे तपासात पुढे आले आहे.

मानसिक आजार लपवला का?

रेल्वे मंत्रालयाने याप्रकरणी हात झटकण्याची भूमिका घेतली आहे. चेतन सिंह याच्या नजीकच्या काळात केलेल्या तपासणीत कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार समोर आला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याने वैयक्तिक पातळीवर उपचार घेतले असण्याची शक्यता असून, त्याच्यावरील उपचारांचे कोणतेही वैद्यकीय अहवाल उपलब्ध नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी हे गुपित ठेवले असण्याची शक्यता रेल्वेकडून व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी रेल्वेने चौकशी नेमली असून, त्याच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्यात येणार आहे.

नैराश्यामध्ये असे काय होते की, आत्महत्येचे पाऊल उचलले जाते?

जबाबदारी कुणाची?

चेतन सिंह याच्या सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तो अनेकदा स्वत:शी असंबंद्ध बडबडत असे आणि अचानक आक्रमक होत असे. काही वेळा तो त्याचे नातेवाईक आणि सहकाऱ्यांनाही ओळखू शकत नसे. आपल्याबद्दल वरिष्ठांना सहानुभूती वाटत नाही, अशी भावना त्याच्या मनात होती, असाही सहकाऱ्यांचा दावा आहे. यामुळे वरिष्ठांना त्याच्या मानसिक स्थितीबाबत निश्चितच माहिती होती. दर सहा महिन्यांनी सर्वांची तपासणी होते. त्याप्रमाणे त्याचीही झाली असेल. शस्त्र जवळ बाळगणाऱ्या जवानांसाठीचीही तपासणी अधिक कठोर असते. या तपासणीतून त्याची मानसिक स्थिती समोर आली असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे यात नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

‘‘औषधांचे परिणाम असतात, त्याप्रमाणेच दुष्परिणाम असतात. कोणतेही औषध दुष्परिणामांशिवाय नसते. रुग्णाच्या स्थितीची तपासणी करून त्याच्याबाबत डॉक्टर उपचारांची दिशा ठरवत असतात. रुग्णाच्या स्थितीनुसार त्याच्या कामाबाबतही सल्ला दिला जातो. एखाद्या शस्त्र बाळगणाऱ्या जवानाची तपासणी मानसोपचारतज्ज्ञांनी केली तर त्याची मानसिक स्थिती पाहून तो शस्त्र बाळगण्यास योग्य की अयोग्य हा सल्ला तातडीने दिला जातो’’, असे प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे म्हणाले. या प्रकरणात मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीकडे शस्त्र देण्याचा पूर्णपणे चुकीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रशासनाने संबंधित जवानाची स्थिती तपासून हा निर्णय घ्यायला हवा होता, असेही वाटवे यांनी नमूद केले.

sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader