विजयादशमीनिमित्त ( २४ ऑक्टोबर) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेशीमबाग येथे संघपरिवाराला संबोधित केले. त्यांनी मार्क्सवादाविषयी बोलताना सांगितले की, ”आजकाल या सर्वभक्ष्यी शक्तींचे लोक स्वतःला सांस्कृतिक मार्क्सवादी किंवा वोक म्हणजे जागे झालेले म्हणवत असले, तरीही १९२०च्या दशकातच ते मार्क्सवादाला विसरले आहेत. ते जगातील सर्व सुव्यवस्था, मांगल्य, संस्कार आणि संयम यांना विरोध करतात. मूठभर लोकांचे संपूर्ण मानव जातीवर नियंत्रण राहण्यासाठी ते अराजकता आणि स्वैराचाराचा पुरस्कार करतात.” या भाषणात त्यांनी ‘सांस्कृतिक मार्क्सवादी किंवा वोक’ लोकांना देशातील “अराजकता पसरवणारीआणि विध्वंसक शक्ती’ से म्हटले आहे.

भागवत यांनी ‘वोक’ लोकांविषयी बोलताना सांगितले की, ”भारताच्या उन्नयनाचे प्रयोजन विश्वकल्याण हेच आहे. परंतु, त्या उदयाचा परिणाम म्हणून स्वार्थी, भेदभाव करणाऱ्या आणि कपटी शक्ती आपल्या हितसंबंधांसाठी भारताला मर्यादित किंवा नियंत्रित करण्याचा कुटील प्रयत्न करत आहेत, त्यांच्याकडून सतत विरोध होत आहे. या विचारसरणी कुठला ना कुठला मुखवटा धारण करून काही आकर्षक घोषणा करतात, विशिष्ट ध्येयासाठी काम करत असल्याचा आव आणतात. या सर्वभक्ष्यी शक्तींचे लोक स्वतःला सांस्कृतिक मार्क्सवादी किंवा वोक समजतात. पण, १९२० पासूनच मार्क्सवाद विसरलेले आहेत. ते जगातील सर्व सुव्यवस्था, मांगल्य, संस्कार यांना विरोध करतात. प्रसारमाध्यमे आणि अकादमींना हाताशी धरून देशाचे शिक्षण, मूल्ये, राजकारण आणि सामाजिक वातावरण भ्रम आणि भ्रष्ट व्यवहाराने कलंकित करण्याची त्यांची कार्यशैली आहे.”

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Shivajinagar Constituency BJP Vs Congress Rebellion in Congress Congress nominated Dutta Bahirat against BJP MLA Siddharth Shirole Pune
शिवाजीनगरमध्ये ‘सांगली पॅटर्न?’
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते
What Raul Gandhi Said?
Rahul Gandhi : “संघ आणि भाजपाचे लोक वेगवेगळ्या छुप्या शब्दांमागे लपून, संविधान..” राहुल गांधीचं वक्तव्य

हेही वाचा : नवरात्रीमध्ये उत्तर भारतात सादर होणारी रामलीला कॅरेबियन बेटांवर कशी पोहोचली ?

‘वोक’ शब्द आला कुठून ?

सध्या ‘वोक’ शब्दाचा अर्थ पुरोगामी किंवा राजकीय अर्थाने घेतला जातो. परंतु, या शब्दाची निर्मिती सशक्तीकरण, सामाजिक सक्रियतेसाठी उभे राहणे या अर्थांनी झाली आहे. ‘वोक’ शब्दाचा वापर कृष्णवर्णीय समुदायांमध्ये होत होता. अवेक (awake) या शब्दापासून ‘वोक’ शब्द निर्माण झाला. मेरियम-वेबस्टर डिक्शनरीनुसार, ‘वोक’ हा अपभ्रंश झालेला शब्द आहे. आफ्रिकन अमेरिकन व्हर्नाक्युलर इंग्लिश (एएव्हीइ) मधून हा शब्द आलेला आहे. आफ्रिकन अमेरिकन व्हर्नाक्युलर इंग्लिशमध्ये, ‘अवेक’ याकरिता ‘वोक’ शब्द वापरण्यात येत असे. ‘आय वॉज स्लीपिंग, बट नाऊ आय एम वोक.’ अशा प्रकारे शब्दप्रयोग केलेला दिसतो.
कृष्णवर्णीय समूहांमध्ये ‘वोक’ या शब्दाचा अर्थ जागृतता या अर्थी घेण्यात येत होता. कृष्णवर्णीय लोकांचे मूलभूत अधिकारही नाकारले जातात. कृती स्वातंत्र्यापासून ते मतदानापर्यंतचे हक्क नाकारण्यात आले आहेत. त्यांना हिंसाचाराच्या धमक्यांना तोंड देण्यासाठी जागृत राहा, सतर्क राहण्याची गरज असल्याचे ‘वोक’ शब्दातून सूचित होते.

‘वोक्स’ या अमेरिकन मास मीडिया समूहासाठी लिहिणारे पत्रकार अजा रोमानो यांनी नमूद केले की, १९२३ मध्ये जमैकाचे सामाजिक कार्यकर्ते मार्क्स गार्वे यांनी “वेक अप इथिओपिया! जागे व्हा आफ्रिका!” अशी घोषणा केली. या घोषणा जागतिकस्तरावरील कृष्णवर्णीय नागरिकांना सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या जागरूक होण्याकरिता देण्यात आल्या होत्या.

द कॉन्व्हर्सेशनमधील एका लेखात असे म्हटले आहे की, १९६५मध्ये नागरी हक्कांचे नेते मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी ओबरलिन कॉलेजमध्ये ‘रेमेनिंग अवेक थ्रू अ ग्रेट रिव्होल्यूशन’ शीर्षक असणारे भाषण दिले होते. त्यात ते म्हणाले, “देअर इज नथिंग मोअर दॅन टू स्लिप थ्रू रिव्हॅल्युएशन. द विंड ऑफ चेंजेस इज ब्लॉविंग अँड वी सी इन अवर डे अँड अवर एज या सिग्निफिकंट डेव्हलपमेंट. द ग्रेट चॅलेंजेस फेसिंग एव्हरी इंडिव्हिज्युअल टूडे इज टू रिमेन अवेक थ्रू सोशल रिव्हॅल्युएशन. क्रांतीच्या काळात झोपणे म्हणजे काहीही कृती न करणे यांसारखे खेदजनक काही नाही. बदलाचे वारे वाहत आहेत. आताच्या काळात, युगात विकास होण्याची आवश्यकता आहे. आज प्रत्येक शिक्षित व्यक्तीने सामाजिक क्रांतीद्वारे जागृत राहणे आवश्यक आहे.

हेही वाचा : १९८४ नंतर पहिल्यांदाच शीखबहुल भागात काँग्रेसची सभा; काय असेल काँग्रेसची रणनीती ?

‘वोक’ शब्दाची निर्मिती आणि अर्थाभिन्नता

शब्दकोशानुसार, ‘वोक’ हा शब्द कृष्णवर्णीय कलाकारांच्या संगीतामध्ये समाविष्ट केला गेला. या संगीतातून राजकीय संदर्भाने त्याचा वापर होत असे. २००८मध्ये अमेरिकन गायिका एरिका बडूच्या ‘मास्टर टीचर’ या गाण्याचे रूपांतरण “आय स्टे वोक” असे करण्यात आले होते. या गाण्यामध्येही स्वतःचा विकास असा त्याचा अर्थ होता. बडू यांनी काही वर्षांनंतर अधिकारांसाठी प्रयत्न करणाऱ्या रशियन संगीतकारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हा वाक्यांश ट्विट केला. वर्णद्वेषाच्याही पलीकडे या शब्दाचा अर्थ असल्याचे त्यांनी सूचित केले.
काही दशकांनंतर फसवणूक करणाऱ्या जोडीदाराविषयी, त्याच्या संशयास्पद कृतींसंदर्भात ‘वोक’ हा शब्द वापरण्यात येऊ लागला. रोमनो याने लिहिलेले चाईल्डिश गॅम्बिनो-रेडबोन या २०१८ प्रसिद्ध झालेल्या गाण्यामध्ये ‘वोक’ हा शब्दप्रयोग करण्यात आला होता.” I wake up feeling like you won’t play right…. How’d it get so scandalous? But stay woke, But stay woke” असे या गाण्याचे बोल होते.
मेरियम-वेबस्टरनुसार, २०१४ मध्ये अमेरिकेत १८ वर्षीय कृष्णवर्णीय व्यक्ती मायकेल ब्राउन हा पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यानंतर ‘स्टे वोक’ आणि ‘वोक’ या घोषणा पुन्हा केंद्रस्थानी आल्या. हा शब्द पोलिसांची क्रूर वागणूक आणि ब्लॅक लाइव्ह्स मॅटर (कृष्णवर्णीय लोकांच्या जगण्याच्या हक्कांशी संदर्भित) चळवळीशी हे शब्द जोडण्यात येऊ लागले.

‘वोक’चा जागतिक स्तरावर करण्यात आला वापर

२०१७ मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी आणि मेरियम-वेबस्टर शब्दकोशांमध्ये ‘वोक’ शब्दाचा समावेश करण्यात आला. अमेरिकेत २०२० मध्ये जॉर्ज फ्लॉइडच्या झालेल्या मृत्यूमुळे कृष्णवर्णीय लोकांना मिळणाऱ्या वागणुकीसंदर्भात निषेध करण्यात करण्यात आला, आंदोलने काढण्यात आली. तेव्हा ‘वोक’ हा शब्द अनेक ठिकाणी वापरण्यात येऊ लागला. ऑनलाईन शोधांमध्येही तो उपलब्ध झाला.
‘वोक’ हा शब्द आता जागतिक स्तरावर वापरण्यात येतो. युरोप आणि ऑस्ट्रेलियातील पुराणमतवादी राजकारण्यांनी ‘वोक’ चा अर्थ लैंगिक समानता आणि पर्यावरण संवर्धनाशीसुद्धा जोडला. बीबीसीच्या ‘इंडियाः द मोदी प्रश्न’ या माहितीपटावर द इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिताना रा. स्व. संघाचे राम माधव यांनी लिहिले की, बीबीसीची अधोगती ही ब्रिटीश लोकांमध्ये ‘वोक कल्चर’ निर्माण झाल्यामुळे झाली आहे.’वोकेझम’ हा शब्दप्रयोग कायम अराजकतावादी या अर्थी करण्यात येतो. बीबीसीच्या मोदीविरोधी अजेंड्यामागे ‘वेकेझम’ आहे. ‘वोक’ने बहुसंख्यांपेक्षा अल्पसंख्याकांच्या मताला अधिक प्राधान्य देण्याचा सिद्धांत मांडला आहे, असे राम माधव यांनी लिहिले.

‘वोक’ या शब्दावर एवढी चर्चा का केली जाते ?

अनेक पुरोगामी गटांना ‘वोक’च्या इतिहासाविषयी माहिती नाही. वोक शब्द आता मूळ इतिहास, अर्थ यापासून तो बाजूलाच गेला आणि त्याचा अनौपचारिकपणे वापर सुरू झाला. ‘ओकेप्लेअर’ या मासिकानुसार जॉर्जिया अॅन मुल्ड्रो यांनी मुलाखतीदरम्यान, ”एरिका बडू या संगीतकर्तीने ‘वोक’ या शब्दाची ओळख करून दिली” असे गुलामगिरीच्या इतिहास उलगडताना सांगितले. ‘वोक’ हा नक्कीच दुःखदायक अनुभव आहे. जर एखाद्या पोत्यामध्ये तुम्हाला घातले, बाहेर फेकून दिले किंवा नवीन ठिकाणी आणले, तर हे आपले शेजारी, आपली लोक नाहीत हे समजते. ती समजून घेण्याची क्रिया म्हणजे ‘वोक’ होय. आपल्या पूर्वजांनी संघर्ष केला, आपल्या काही लोकांनी संघर्ष केला आज आम्हीही संघर्ष करत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जॉर्जिया पुढे म्हणाल्या, ‘वोक’चा सामना जे लोक करतायत, तेच या समाजात उपेक्षित आहेत. सामाजिक वादांपासून ते दूर आहेत.
भारतीय वंशाचे यूएस रिपब्लिकन नेते विवेक रामास्वामी हे २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी ‘वोक’ला लक्ष्य करून लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. त्यांनी ‘‘Woke, Inc.: Inside Corporate America’s Social Justice Scam’ शीर्षक असणारे पुस्तक लिहिले आहे. ऍमेझॉन.कॉमवर या पुस्तकाची संक्षिप्त माहिती दिलेली आहे. “याची प्रत्येक जाहिरात आम्ही खरेदी करत असलेल्या प्रत्येक उत्पादनावर परिणाम करते. सकाळच्या कॉफीपासून ते बुटांच्या नवीन जोडीवरही याचा परिणाम होतो. स्टेकहोल्डर कॅपिटलिझम हे चांगल्या, वैविध्यपूर्ण, अनुकूल जीवनशैलीचे चित्र उभे करते. परंतु प्रत्यक्षात अमेरिकेतील उद्योग आणि राजकीय नेत्यांच्या विचारसरणीचा आमच्या पैशांवर, हक्कांवर, ओळखीवर परिणाम होतो.”

पुराणमतवादी लोकांकरिता ‘वोक’ म्हणजे बदल घडवून आणण्याचा, ओळख निर्माण करण्याचा एक मार्ग होय. विशेषतः अमेरिकेमधील उदारमतवाद आणि भांडवलशाहीच्या कल्पनांशी विरोधाभास दर्शवते. त्यांच्या मते, ज्याला यशस्वी व्हायचे आहे, तो ते स्वतःच्या कष्टाने, जिद्दीने होऊ शकतो. सामाजिक गोष्टी त्याला प्रभावित करत नाही. ‘वोक’चा उदय हा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, जिथे गरज आहे, तिथे खंबीरपणे उभे राहण्यासाठी झाला असावा.