जवळपास सहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचा गणवेश चर्चेत आला होता. कारण अगदी स्थापनेपासून आरएसएसच्या गणवेशाचा भाग असलेली हाफ पँट बदलून संघानं तपकिरी रंगाची फुल पँट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठीची कारणं आणि दृष्टीकोनदेखील तेव्हा संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी स्पष्ट केला होता. पण संघाच्या कार्यपद्धतीमध्ये नेमकं गणवेशाचं महत्त्व का आहे? अगदी स्थापनेपासून, अर्थात १९२५ पासून ही खाकी हाफ पँट संघाच्या गणवेशाचा भाग कशी बनली? त्यासाठी काय कारण होतं? या मुद्द्यांचा हा संक्षिप्त आढावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
केंद्रातील सत्ताधारी भाजपावर टीका करताना अनेकदा विरोधकांकडून आरएसएसला देखील लक्ष्य करण्यात येतं. नुकताच असाच एक प्रकार घडला असून काँग्रेसकडून करण्यात आलेल्या एका ट्विटमुळे वाद निर्माण झाला आहे. हे ट्वीट तातडीने डिलीट करण्यात यावं, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे.
ताजा कलम…
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. त्यात सोमवारी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करण्यात आलं. या ट्वीटमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. या ट्वीटमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला असून त्यामध्ये कधीकाळी आरएसएसच्या गणवेशाचा भाग असलेल्या खाकी हाफ पँटला एका बाजूने आग लागल्याचं दाखवण्यात आलं आहे. या फोटोसोबत “द्वेषाच्या राजकारणापासून देशाला मुक्त करण्यासाठी आणि भाजपा-आरएसएसनं देशाचं केलेलं नुकसान भरून काढण्यासाठी एकेक पाऊल टाकत आपण आपलं ध्येय गाठू..भारत जोडो यात्रा”, असा संदेश देखील लिहिण्यात आला आहे.
गेल्या ९० वर्षांहून अधिक काळ खाकी रंगाची हाफ पँट आरएसएसच्या गणवेशाचा भाग राहिला आहे. २०१६मध्ये हाफ पँटची जागा फुल पँटनं घेतली असली, तरी तिचा खाकी रंग काही बदलला नाही.
आरएसएसला गणवेशाची गरज का पडली?
आरएसएसच्या वेबसाईटवर नमूद केल्यानुसार, “दैनंदिन शाखा किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या बैठकांसाठी गणवेश असणं आवश्यक करण्यात आलं. या शाखांमध्ये आरएसएसचे स्वयंसेवक शारीरिक कवायत, देशभक्तीपर गीते, समूह चर्चा, वाचन, मातृभूमीची प्रार्थना अशा गोष्टींमध्ये सहभागी होत असतात”. देशात अंदाजे ५० हजार आरएसएसच्या शाखा असल्याचा अंदाज आहे. यासोबतच, “शारीरिक प्रशिक्षणातून स्वयंसेवकांमध्ये एकतेची आणि बंधुत्वाची भावना निर्माण होते. यासाठी सर्वांना एक गणवेश असल्यामुळे मदत होते”, असंही नमूद करण्यात आलं आहे.
मात्र, आरएसएसचा गणवेश हा फक्त विशेष कार्यक्रमांसाठीच बंधनकारक करण्यात आला आहे. शाखांमध्ये हा गणवेश घालणं हे त्या त्या व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असेल. यासह आरएसएसच्या वेबसाईटवरील FAQ भागामध्ये “दैनंदिन शाखांसाठीच्या गणवेशासाठी हाफ पँटचीच निवड का करण्यात आली?” या प्रश्नावरदेखील उत्तर देण्यात आलं आहे.”हा आग्रहाचा भाग नसून स्वयंसेवकांच्या सोयीचा भाग आहे. दैनंदिन शाखांमध्ये शारिरीक कवायतींचा देखील समावेश असतो. यासाठी हाफ पँट ही अधिक सोयीस्कर आणि सर्वांना परवडेल अशी आहे”, असं नमूद करण्यात आलं आहे.
विश्लेषण : कोविड लशीचा बूस्टर डोस तरुणांसाठीही का महत्त्वाचा आहे? जाणून घ्या कारणं
२०१६मध्ये बदल घडला!
खरंतर २०१५मध्येच आरएसएसच्या गणवेशामध्ये बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यासंदर्भात दावेही केले जात होते. इंडियन एक्स्प्रेसनं तेव्हा आरएसएसमधील वरीष्ठ प्रचारकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सरसंघचालक मोहन भागवत आणि तत्कालीन सहकार्यवाह भैय्याजी जोशी हे दोघे गणवेशात बदल करण्यासाठी अनुकूल होते. आपण काळानुसार बदलायला हवं या विचाराचे ते होते. पण या कल्पनेला काहींचा विरोध देखील होता.
पण २०१६मध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. हाफ पँटच्या जागी फुल पँट आली. मात्र, तिचा खाकी रंग कायम ठेवण्यात आला. आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभा अर्थात एबीपीएसमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
आत्तापर्यंत किती वेळा बदलला गणवेश?
१९२५ पासून आत्तापर्यंत आरएसएसच्या गणवेशात अनेक बदल करण्यात आले आहेत. १९२५ ते १९३९ या कालावधीमध्ये आरएसएसचा पूर्ण गणवेश खाकी रंगाचा होता. १९४०मध्ये खाकी शर्टची जागा पांढऱ्या शर्टानं घेतली. १९७३मध्ये चामड्याच्या बुटांची जागा लांब बुटांनी घेतली. पुढे रेग्झिन बूट देखील समाविष्ट झाले. मात्र, हे सगळं होत असताना आरएसएसची खाकी हाफ पँट कायम होती. ती थेट २०१६मध्ये बदलून तपकिरी रंगाची फुल पँट वापरात आणण्यात आली.
विश्लेषण: दसरा मेळाव्याची मुहूर्तमेढ केव्हा रचली? पहिल्या मेळाव्यात बाळासाहेबांना होती ‘ही’ भीती
“आपल्या रोजच्या आयुष्यात हल्ली फुल पँट ही सामान्य बाब झाली आहे. त्यामुळे आम्ही तिचा स्वीकार केला आहे. आम्ही वेळेनुसार चालणारे आहोत. याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही”, अशी भूमिका आरएसएसचे तत्कालीन सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी जाहीर पत्रकार परिषदेत मांडली होती.