दोन दिवसांपासून उत्तर भारतात पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले असून, हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या पावसाचा मुख्यत्वे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब या राज्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या चार राज्यांमध्ये लोकांची मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात ‘एनडीआरएफ’च्या ३९ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पावसाने माजवलेल्या या हाहाकाराचे अनेक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. त्यातील ‘शेल्फ क्लाऊड्स’च्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा होत आहे.

समाजमाध्यमांवर शेल्फ क्लाऊड्सचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ उत्तराखंडमधील हरिद्वार येथील असल्याचा दावा केला जात आहे. उत्तराखंडमधील परिस्थिती किती भीषण आहे, हे दाखवण्यासाठी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मात्र, या व्हिडीओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. काही लोक हा व्हिडीओ खोटा असून, तो हरिद्वारमधील नाही, असेही सांगत आहेत. असे असले तरी या निमित्ताने आकाशात एका वादळाप्रमाणे भासणारे ‘शेल्फ क्लाऊड’ काय असतात? हे शेल्फ क्लाऊड विध्वंसक असतात का? असे प्रश्न विचारले जात आहेत.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
sonam wangchuck marathi news,
जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे नागपुरात “हेरिटेज ट्री वॉक”
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’

सध्या उत्तरेत काय स्थिती?

उत्तरेतील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब या चार राज्यांत पावसाने थैमान घातले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शिमल्यात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्यातील एका घटनेत चार जणांचा मृत्यू झाला; तर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथे आतापर्यंत १६ ते १७ जणांचा मृत्यू झाला. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हरियाणा, राजस्थानमध्ये जनजीवन विस्कळित

पंजाब आणि हरियाणामध्येही सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. या राज्यांत ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे १३ जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राजस्थानमध्येही अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. येथे मुख्यत्वे अजमेर, पाली, करौली, टौंक, सिकर या जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे.

शेल्फ क्लाऊड म्हणजे काय?

वादळ, मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटाची शक्यता असते, तेव्हा आकाशात ‘शेल्फ क्लाऊड’ दिसू लागतात. या ढगांचा आकार कमानीप्रमाणे असतो. म्हणूनच त्यांना ‘आर्कस क्लाऊड्स’ही म्हणतात. शेल्फ क्लाऊड्स हे आकाशात कमी उंचीवर असलेले लांब ढग असतात. अशा प्रकारच्या ढगांचा संबंध मोठ्या वादळाशी लावला जातो. मुळात वादळाची परिस्थिती निर्माण झाल्यावर शेल्फ क्लाऊड्स व रोल क्लाऊड्स अशा दोन प्रकारच्या ढगांची निर्मिती होते. हे ढग मुख्यत्वे वादळाचे सारथ्य करतात. ते वादळाच्या अग्रभागी असतात. ढग आले की पाऊस येतो, असे आपण ढोबळपणे म्हणतो. मात्र, शेल्फ क्लाऊड्स हे पावसाचे ढग नसतात; तर या ढगांमुळे पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असते.

शेल्फ क्लाऊड्सची निर्मिती कशी होते?

शेल्फ क्लाऊड्सची निर्मिती वातावरणातील बदलांमुळे होते. क्युम्युलोनिम्बस ढगांमधील थंड हवा जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे म्हणजेच खाली येते तेव्हा खालची गरम हवा, आर्द्रता असलेली उबदार हवा वर जाते. त्यामुळे शेल्फ क्लाऊड्स तयार होतात.

शेल्फ क्लाऊड्स विध्वंसक असतात का?

वादळाची स्थिती असेल तेव्हाच शेल्फ क्लाऊड्सची निर्मिती होते. सामान्यत: जोरदार वारे, मुसळधार पाऊस, जोराची गारपीट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट अशा स्थितीत शेल्फ क्लाऊड्सची निर्मिती होते. म्हणजेच अशा प्रकारच्या ढगांमुळे मुसळधार पाऊस, गारपीट यांची शक्यता असते. मात्र, अशा प्रकारचे शेल्फ क्लाऊड्स धोकादायक ठरण्याची शक्यता कमी असते. जेव्हा जोरात वाहणारा वारा जवळ येत असतो, तेव्हा फार कमी वेळा शेल्फ क्लाऊड्स विध्वंसक ठरू शकतात.

सुरक्षित ठिकाणी जाणे गरजेचे

अशा प्रकारचे शेल्फ क्लाऊड्स लांब असल्यावर त्यांच्यापासून धोका नसतो. मात्र, हवेमुळे ते जवळ येत असल्यास लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी जाणे गरजेचे असते.

Story img Loader