Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea: युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाच रशियाने क्रिमिया द्वीपकल्पात पुरातत्त्वीय उत्खननास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये प्राचीन खजिनांचा शोध लागला आहे. परंतु, या कृतीकडे युक्रेनियन जनता सांस्कृतिक लूटमार म्हणून पाहतात. क्रिमियावरचा वाद २०१४ पासून सुरू आहे. रशियाने या द्वीपकल्पावर आक्रमण करून त्याला आपल्यामध्ये विलीन केले. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियन आणि रशियाप्रेमी पुरातत्त्वज्ञांनी या समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेल्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू ठेवले आहे, या प्रदेशाचा इतिहास गेल्या काही सहस्रकांपर्यंत मागे जातो.

क्रिमियाच्या जमिनीखालील प्राचीन इतिहास

क्रिमियाच्या ब्लॅक सीच्या किनाऱ्यावर प्राचीन ग्रीक वसाहतींचे केंद्र होते. इसवी सनपूर्व ६ व्या आणि ५ व्या शतकातील इतिहास या नव्या उत्खननाच्या माध्यमातून उघड होत आहे. या नंतरही अनेक मानवी वस्ती येथे अस्तित्वात आल्या. त्यामुळे या भागात पुरातत्त्वीय संशोधनाला अधिक वाव असल्याचे सांगितले जाते. सेव्हास्तोपोलजवळ अलीकडच्या उत्खननांमध्ये प्राचीन काळापासून ते मध्ययुगाच्या आरंभीच्या कालखंडातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा शोध लागला आहे. यामध्ये बकल्स, सोन्याच्या कानातल्यांसह बेल्टचे तुकडे समाविष्ट आहेत, हे तत्कालीन महिलांचे दागिने होते असा संशोधकांचा दावा आहे. हे पुरावे दक्षिण क्रिमियातील आलमालिक-डेरे स्मशानभूमीत सापडले, ही जागा १९व्या शतकापासून पुरातत्त्वज्ञांना आकर्षित करत आली आहे.

News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
What is dispute over historic Durgadi Fort and what did court say while handing over fort to government
ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा वाद काय आहे? त्यावर मुस्लिमांचा दावा कसा? किल्ला सरकारच्या ताब्यात देताना न्यायालयाने काय म्हटले?
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
What is Pysanka?
Ukrainian egg: युनेस्कोच्या वारसा यादीत प्राचीन युक्रेनियन अंड्याला स्थान !

अधिक वाचा: Ukrainian egg: युनेस्कोच्या वारसा यादीत प्राचीन युक्रेनियन अंड्याला स्थान !

“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप

युक्रेनने या उत्खननाचा तीव्र निषेध केला आहे. तसेच रशियावर त्यांच्या सांस्कृतिक वारशाची लूटमार केल्याचा आरोप केला आहे. V.I. Vernadsky Crimean Federal University चे पुरातत्त्वज्ञ वलेरी नाऊमेनको यांच्या मते आलमालिक-डेरे स्मशानभूमीत आधीच्या लुटमारीनंतरही महत्त्वपूर्ण शोध लागण्याच्या घटना सुरूच आहेत. “अद्याप इथे वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण गोष्टी सापडत आहेत,” असे नाऊमेनको यांनी एका प्रसिद्धीपत्रकात नमूद केले. हे उत्खनन रशियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सहकार्याने केले जात आहे. सापडलेले पुरावे इसवी सनाच्या ४ थ्या व ५ व्या शतकातील असून ते गॉथिक ख्रिस्ती प्रांत गोथियाशी संबंधित आहेत. नुकत्याच उत्खनन केलेल्या खजिन्याचे भवितव्य अद्याप अस्पष्ट आहे.

क्रिमियामधील पुरातत्त्वीय उत्खनन: कायदेशीर वाद आणि सांस्कृतिक वारशाचा प्रश्न

क्रिमियामधील पुरातत्त्वीय उत्खननांनी वारंवार कायदेशीर वाद निर्माण केले आहेत. या उत्खननातून सापडलेल्या पुराव्यांवर मालकी हक्क कोणाचा, हा वादाचा मुख्य मुद्दा आहे. हे पुरावे/ अवशेष युक्रेनला परत केले जावेत की रशियन नियंत्रणाखाली क्रिमियामध्येच ठेवले जावेत? हा मुद्दा सध्या चर्चेत आहे.

क्रिमिया: गोल्ड आणि ब्लॅक सीचे रहस्य

२०१४ साली अॅमस्टरडॅममधील अॅलार्ड पिअर्सन म्युझियमने क्रिमियातील चार संग्रहालयांमधून जवळपास ४०० पुरावशेष कर्जावर घेतले होते आणि “क्रिमिया: गोल्ड आणि ब्लॅक सीचे रहस्य” या प्रदर्शनासाठी सादर केले. या प्रदर्शनात सोन्याचे दागिने, नक्षीदार फलक, मौल्यवान रत्न, दगडी सजावट, आणि मृदभांडी यांचा समावेश होता.

अधिक वाचा: Cold War Secret City: हिमयुद्धाचं रहस्य; ग्रीनलॅण्डच्या बर्फाखाली दडलाय अमेरिकेचा लष्करी तळ!

२०१४ साली रशियाने क्रिमियावर ताबा मिळवला, त्यावेळी या पुराव्यांवर मालकी कोणाची हा वाद उफाळला. २०१६ साली अॅमस्टरडॅम न्यायालयाने हे पुरावे युक्रेनला परत करावेत असा निर्णय दिला. २०२३ साली सप्टेंबर महिन्यात नेदरलँड्सच्या सर्वोच्च न्यायालयानेही युक्रेनच्या बाजूने निर्णय दिला. त्यानुसार हे पुरावे युक्रेनच्या कीव येथील ‘म्युझियम ऑफ हिस्टॉरिकल ट्रेजर्स ऑफ युक्रेन येथे परत करण्यात आले. परंतु त्यानंतरही झालेल्या उत्खननात अनेक पुरावशेष सापडत असल्याने या वादाला पूर्णविराम अद्याप मिळालेला नाही.

क्रिमियामधील पुरातत्त्वीय संशोधन

रशियाने क्रिमियामध्ये उत्खनन करणाऱ्या खासगी आणि सरकारी संस्थांना पाठिंबा दिला आहे. मात्र काही जाणकारांचे म्हणणे आहे की या उत्खननांमुळे वैज्ञानिक मूल्याला तडा गेला आहे, कारण या प्रकल्पांत सहभागी असलेल्यांना क्रिमियातील पुरातत्त्वीय वस्तूंबाबत पुरेसे ज्ञान आणि अनुभव नाही. याशिवाय, काही जणांचा असा आरोप आहे की हे पुरावे क्रिमियाबाहेर हलवले जात आहेत. यामुळे या प्राचीन वारशाशी संबंधित मुद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. क्रिमियामधील उत्खनने आणि त्यातून सापडणाऱ्या पुराव्यांवरून सुरू असलेला हा वाद केवळ कायदेशीर नाही, तर सांस्कृतिक वारशाच्या रक्षणाशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण करतो.

Story img Loader