रशियातील खासगी लष्कर असलेल्या ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी मे महिन्यात रशियन सरकारविरोधात थेट बंड केले होते. या बंडामुळे रशियासह संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली होती. मात्र, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हे बंड मोडून काढले होते. या बंडानंतर रशियन सरकारने प्रिगोझिन यांच्यासह वॅग्नरच्या सैनिकांना बेलारूसमध्ये हद्दपार करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, कथित मृत्यूनंतर प्रिगोझिन यांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. ते रशियातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेऊ या …

विमान अपघातात प्रिगोझिन यांचा मृत्यू?

वॅग्नर ग्रुपच्या बंडानंतर या खासगी सैन्य आणि रशियन सरकार यांच्यामधील तणाव कायम होता. दरम्यान, आता प्रिगोझिन यांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते बुधवारी मॉस्को येथून सेंट पीटर्सबर्ग येथे विमानातून निघाले होते. मात्र, हे विमान अचानकपणे कोसळले. या विमानातील प्रवाशांच्या यादीत प्रिगोझिन यांचेही नाव होते. तशी माहिती रोजाव्हियाट्सिया या रशियातील हवाई वाहतूक नियंत्रक यंत्रणेने दिली आहे. रशियातील तास या वृत्तसंस्थेनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रिगोझिन यांचा हवाई अपघातात मृत्यू झाल्याचा दावा रशियन संस्था करीत आहेत. तर, वॅग्नर ग्रुपने मात्र हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अपघात होण्यापूर्वी विमानावर क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचा दावा वॅग्नर ग्रुपकडून करण्यात आला आहे.

syria interim president ahmed al sharaa first visit to saudi
सीरियाच्या हंगामी अध्यक्षांची पहिली भेट सौदी अरेबियाला… इराणपासून फारकत घेत असल्याचे संकेत?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Navri Mile Hitlarla
‘नवरी मिळे हिटलरला’मधील लक्ष्मी व सरस्वतीने शेअर केला व्हिडीओ; सहकलाकारांच्या कमेंट्सने वेधले लक्ष
US to extradite Pakistani terrorist Tahawwur Rana to India
२६/११ चा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिका भारतात पाठवणार… मुंबई हल्ल्यात नेमका सहभाग काय?
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
girish mahajan chhagan bhujbal l
छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार? गिरीश महाजन म्हणाले…
Russia-Ukraine war Putin Trump
Vladimir Putin: ‘ट्रम्प २०२० साली हरले नसते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं मोठं विधान
russia ukraine war
Russia Ukraine War : युद्ध थांबविण्यासाठी झेलेन्स्की तयार

लहान असताना चोऱ्या; १३ वर्षांची शिक्षा

येवजेनी प्रिगोझिन यांचा जन्म १ जून १९६१ रोजी तत्कालीन लेनिनगार्ड, सोविएत युनियन (आता सेंट पीटर्सबर्ग, रशिया) येथे झाला होता. येवजेनी प्रिगोझिन हे रशियातील सर्वांत श्रीमंतांपैकी एक होते. विशेष म्हणजे रशियात त्यांच्याकडे प्रभावशाली व्यक्ती म्हणून पाहिले जायचे. उद्योगपती म्हणून नावारूपाला येण्यापूर्वी त्यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे तुरुंगात काढली होती. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार १९८० मध्ये अवघ्या १३ वर्षांचे असताना त्यांनी अनेक चोऱ्या केल्या होत्या. पुढे अनेक गुन्हे केल्यामुळे त्यांना १३ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सोविएत युनियनच्या विघटनानंतर ते तुरुंगातून बाहेर आले.

प्रिगोझिन यांच्या मनात होती मोठी स्वप्ने

दरम्यान, त्यांनी भूतकाळातील घटनांना मागे टाकत अर्थार्जनासाठी वेगवेगळी कामे करण्यास सुरुवात केली. त्यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे सुरुवातीला हॉट डॉग विकण्याचे काम केले. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार सुरुवातीपासूनच प्रिगोझिन यांच्या मनात मोठीमोठी स्वप्ने होती. या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांनी सुपर मार्केटपासून ते रेस्टॉरंट उघडण्यापर्यंत प्रयोग करून पाहिले.

हॉटेल, खाद्यसेवा क्षेत्रात प्रिगोझिन यांची प्रगती

या क्षेत्रात सतत काम केल्यानंतर लोक त्यांना ओळखू लागले. पुढे १९९५ साली त्यांनी अनेक रेस्टॉरंट्स सुरू केली. याच क्षेत्रात आपले प्रस्थ वाढवण्यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांची स्थापना केली. सेंट पीटर्सबर्ग येथील ‘कॉन्कॉर्ड केटरिंग’ या सुप्रसिद्ध कंपनीचाही यात समावेश आहे. रशियात उद्योगांच्या भरभराटीसाठी तेव्हा योग्य वातावरण होते. याच स्थितीचा फायदा प्रिगोझिन यांनी घेतला. त्यांनी हॉटेल, खाद्यसेवा क्षेत्रात वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवीत खूप प्रगती केली. पुढे त्यांना रशियातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळाले.

वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी मैत्री

प्रिगोझिन यांचे सर्व उद्योग यशाची शिखरे गाठत होते. अत्यंत कमी कालावधीत त्यांची कॉन्कॉर्ड केटरिंग ही कंपनी संपूर्ण रशियात ओळखली जाऊ लागली. या कंपनीला रशियन सरकारकडून वेगवेगळ्या विभागांना जेवण, खाद्यपदार्थ पुरवण्याची कंत्राटे मिळू लागली. त्यामध्ये रशियन सैन्याचाही समावेश होता. लोकांशी कसे बोलायचे, याचे त्यांना उत्तम ज्ञान होते. आपल्या याच स्वभावाने त्यांनी रशियातील सत्ताधारी वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न सुरू केला.

२००१ साली पुतिन आले सत्तेत

प्रिगोझिन यांच्याबाबत त्यांना जवळून ओळखणाऱ्या एका उद्योजकाने प्रतिक्रिया दिली आहे. “प्रिगोझिन यांना जे हवे ते ते मिळवायचेच. त्यासाठी संबंधित व्यक्तीचे मन जिंकण्याची त्यांच्याकडे कला होती,” असे या उद्योजकाने सांगितले. पुढे २००१ साली रशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन सत्तेत आले. तोपर्यंत प्रिगोझिन यांची ‘रशियातील श्रीमंत लोकांच्या पसंतीचे केटरर्स’ अशी ओळख निर्माण झाली होती.

प्रिगोझिन-पुतिन यांच्यात घनिष्ठ संबंध

कालांतराने प्रिगोझिन यांचे व्लादिमीर पुतिन यांच्याशी असलेले संबंध अधिक घनिष्ठ होत गेले. जेव्हा जेव्हा पुतिन हे प्रिन्स चार्ल्स, जॉर्ज बुश अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटायला जायचे, तेव्हा तेव्हा पुतिन यांच्या आजूबाजूला
प्रिगोझिन दिसू लागले. या काळात ते पुतिन यांना खानपान पुरवायचे. पुतिन यांचे काही जुने फोटो पाहिल्यास त्या फोटोंमध्ये प्रिगोझिन दिसतील. त्यावरून प्रिगोझिन यांचे पुतिन यांच्याशी किती घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते, हे दिसून येते.

नावारूपाला आल्यावर प्रिगोझिन यांच्या महत्त्वाकांक्षांत वाढ

पुढे पुतिन यांची मर्जी संपादन केल्यानंतर प्रिगोझिन यांना अनेक शासकीय कंत्राटे मिळू लागली. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास २०१२ साली त्यांना १०.५ अब्ज रुबल्सचे एक कंत्राट मिळाले होते. या कंत्राटाच्या माध्यमातून प्रिगोझिन यांच्यावर मॉस्को येथील सर्व शाळांना अन्न पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अन्नपुरवठा सेवेत रशियातील सर्वांत मोठे ब्रँड म्हणून नावारूपाला येऊनही प्रिगोझिन यांच्या महत्त्वाकांक्षा कमी झाल्या नाहीत. ते २०१४ साली खासगी सैन्यनिर्मिती क्षेत्रात उतरले.

वॅग्नर ग्रुप आणि क्रिमियावर स्वारी

वॅग्नर ग्रुप स्थापन करण्याची कल्पना कोणाची होती, पुतिन यांनीच अशा प्रकारचे खासगी लष्कर उभारण्याचा सल्ला दिला होता का, हे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. मात्र, क्रिमियावरील आक्रमणाच्या काळात म्हणजेच २०१४ साली वॅग्नर ग्रुपची स्थापना झाली होती. क्रिमियावर आक्रमण करताना वॅग्नर ग्रुपने रशियन सैनिकांना मदत केली होती. मात्र, प्रत्यक्ष रशियन सैनिकांपासून या ग्रुपने अंतर ठेवलेले आहे. विशेष म्हणजे २०२२ च्या सुरुवातीपर्यंत प्रिगोझिन हे माझा वॅग्नर ग्रुपशी कसलाही संबंध नाही, असा दावा करायचे.

पुतिन घ्यायचे वॅग्नर ग्रुपची मदत

रशियामध्ये खासगी सैन्यावर अधिकृतपणे बंदी होती. अजूनही ही बंदी कायम आहे. तरीदेखील रशियात वॅग्नर ग्रुप सक्रिय होता. क्रिमियावर ताबा मिळवल्यानंतर रशियाने वॅग्नर ग्रुपला पूर्व युक्रेनमधील डोबास या भागात पाठवले. या भागातील रशियासमर्थक बंडखोरांची मदत करण्याचे काम या ग्रुपकडे सोपवण्यात आले. या मोहिमांत यश मिळाल्यानंतर प्रिगोझिन यांच्या वॅग्नर या ग्रुपचा झपाट्याने विस्तार झाला. कालांतराने वॅग्नर ग्रुपचे रशियातील महत्त्व वाढत गेले. पुतिन यांच्यासाठी वॅग्नर ग्रुप म्हणजे दुसरे सैन्यच झाले होते. ज्या ठिकाणी हस्तक्षेप करायचा आहे, तेथे रशिया या वॅग्नर ग्रुपची मदत घ्यायचा. पुतिन स्वत:ला दूर ठेवून हे काम करायचे; तर दुसरीकडे प्रिगोझिन हे या वॅग्नर ग्रुपचे जनरल होते. त्यांच्या नेतृत्वाखाली या सर्व कारवाया पार पडायच्या.

क्रिमियावर आक्रमण आणि आणखी विस्तार

क्रिमियावर ताबा मिळवल्यानंतर पुतिन यांनी बशर अल असद यांना पाठिंबा देण्याचे ठरवले. या निर्णयानंतर त्यांनी २०१५ साली सीरियामध्ये सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला. येथेही सैन्याला अन्न पुरवण्याचे कंत्राट प्रिगोझिन यांना देण्यात आले. तसेच वॅग्नर ग्रुपचे सैनिकही त्यांनी सीरियामध्ये पाठवले. वॅग्नर ग्रुपचा प्रभाव खूप वाढला होता. रशियाने राबवलेल्या अनेक मोहिमा, तसेच अनेक कारवायांत ‘वॅग्नर’चे खासगी सैनिक पुढे असायचे. या कारवायांमध्ये वॅग्नर ग्रुपचे नुकसानही झालेले आहे. सीरियामधील हस्तक्षेपामुळे याच ग्रुपवर पहिला युद्धगुन्हा नोंदवण्यात आला होता. सीरियात सैन्य घुसवल्यानंतर वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये वॅग्नर ग्रुपचे सैनिक एका सीरियन नागरिकाचा शिरच्छेद करताना दिसत होते. तसेच सैनिकांनी नागरिकाच्या शरीराचे तुकडे केलेले या व्हिडीओत दाखवण्यात आले होते. त्याच कारणामुळे वॅग्नर ग्रुपवर युद्धगुन्हा नोंदवण्यात आला होता.

भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या ज्या प्रकरणात रशियाचा समावेश होता, अशा सर्वच सैनिकी कारवायांमध्ये वॅग्नर ग्रुपचा समावेश होता. सीऔरिया, सुदानमधील गृहयुद्धापासून ते आफ्रिका, व्हेनेझुएला येथील २०१९ सालच्या अध्यक्षीय पेचप्रसंगातही वॅग्नर ग्रुपचा हस्तक्षेप होता

२०२२ साली युक्रेनवर आक्रमण

२०२२ साली पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचे ठरवल्यानंतर या मोहिमेत प्रिगोझिन यांच्या वॅग्नर ग्रुपने महत्त्वाची भूमिका पार पाडली. प्रिगोझिन यांनी नेहमीच वॅग्नर ग्रुपशी असलेले संबंध नाकारलेले आहेत. मात्र, या ग्रुपमध्ये अधिकाधिक लोकांचा समावेश कसा करता येईल, यासाठी ते पडद्याआडून काम करायचे. २०२२ साली एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत प्रिगोझिन तुरुंगातील गुन्हेगारांना वॅग्नर ग्रुपमध्ये सामील व्हा, असे सांगताना दिसले होते. ‘तुम्ही वॅग्नर ग्रुपमध्ये सामील व्हा. या सहा महिन्यांत तुम्ही जिवंत राहिलात, तर मी तुमची शिक्षा कमी करीन; तसेच भरपूर पैसे देईन,’ असे प्रिगोझिन आश्वासन देताना या व्हिडीओत दिसले होते.

“त्यांनी आमचा विश्वासघात केला”

दरम्यान, युक्रेन युद्धाच्या वेळी प्रिगोझिन आणि रशियन सरकार यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली. युद्धामध्ये या ग्रुपने पूर्व युक्रेनमधील बाखमूत हे शहर ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रिगोझिन यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओमध्ये त्यांनी रशियाचे अभिनंदन केले होते. त्यासह रशियन सरकारवर सडकून टीकाही केली होती. विशेषत: संरक्षणमंत्री सेर्गेई शोइगु आणि चीफ ऑफ द जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्याकडे प्रिगोझिन यांचा रोख होता. या दोघांनीही आमचा विश्वासघात केला, असा आरोप प्रिगोझिन यांनी केला होता.

रशियन सरकारमुळेच सैनिकांचा मृत्यू झाल्याच आरोप

याच युद्धादरम्यान प्रिगोझिन रशियन सरकारवर सतत आरोप करीत राहिले. रशियन सरकार आमच्या सैनिकांची काळजी घेत नाहीये. युद्धासाठी आवश्यक ती सामग्री आम्हाला पुरवली जात नाहीये, असा आरोप प्रिगोझिन यांनी केला होता. त्यांनी या वर्षाच्या ५ मे रोजी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेल्या ‘वॅग्नर ग्रुप’मधील सैनिकांची एक फाईल त्यांनी दाखवली होती. युद्धासाठी लागणारी सामग्री न दिल्यामुळेच या सैनिकांचा मृत्यू झाला, असा आरोप प्रिगोझिन यांनी केला होता.

रशियन सरकारविरोधात केले बंड

पुढे हा वाद वाढतच राहिला. शेवटी वॅग्नर ग्रुपने २४ जून रोजी रशियन सरकारविरोधात थेट बंड पुकारले. या बंडामध्ये प्रिगोझिन यांनी वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांना मॉस्कोकडे प्रस्थान करण्याचा आदेश दिला होता. मात्र, बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी मध्यस्थी केल्यामुळे प्रिगोझिन यांनी हे बंड मागे घेतले. त्यानंतर रशियन सरकार आणि प्रिगोझिन यांच्यात एक करार झाला. कोणतीही कारवाई न करण्याचे आश्वासन देऊन प्रिगोझिन, तसेच त्यांच्या वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांना बेलारूसला जाण्यास सांगण्यात आले होते. मात्र, आता प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Story img Loader