रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन आता दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धाचे विविध स्तरांवरील परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. तसेच या युद्धाचा दोन्ही देशांना मोठा फटका बसला आहे. मात्र, या युद्धामुळे युद्धनीतीवरील चर्चांनाही उधाण आले आहे. युद्धात वापरली जाणारी शस्त्रे, त्यांची क्षमता आणि त्यांचा प्रभावी वापर यांवर अनेक तज्ज्ञ विविधांगी चर्चा करीत असतात.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने रशिया-युक्रेन युद्धात उद्ध्वस्त झालेल्या रणगाड्याविषयी वृत्त दिले आहे. त्यांना एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने गेल्या वर्षी युक्रेनला पाठविलेल्या अमेरिकन बनावटीच्या ३१ एम-१ अब्राम्स रणगाड्यांपैकी पाच रणगाडे रशियाने गेल्या दोन महिन्यांमध्ये उद्ध्वस्त केले आहेत. तसेच २०२४ च्या सुरुवातीला लढाईसाठी पाठविलेल्या आणखी किमान तीन रणगाड्यांचेही नुकसान झालेले असण्याची शक्यता आहे. ‘ओरिक्स’ हे संकेतस्थळ युद्धविषयक घडामोडींचे विश्लेषण करते. त्यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला अशी माहिती दिली आहे की, २०२२ मध्ये हे युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेन व रशिया या दोघांनाही स्वत:चे अनुक्रमे ७९६ व २९० रणगाडे गमवावे लागले आहेत.

ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय

हेही वाचा : कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?

या युद्धामध्ये ज्या संख्येने रणगाडे उद्ध्वस्त झाले आहेत, त्यावरून असे दिसून येते की, आता आधुनिक युद्धनीतीमध्ये रणगाडे कमकुवत ठरत आहेत. त्यामुळे आता त्यांचा वापर कालबाह्य ठरण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे रशियासहित इतर अनेक देशांनी मोठ्या प्रमाणावर रणगाड्यांची निर्मिती करणे सुरूच ठेवले आहे. गेल्या शुक्रवारी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोईगु यांनी म्हटले आहे की, रशियाने रणगाड्यांच्या निर्मितीच्या कामाला गती दिली आहे.

मात्र, रणगाडे इतके कमकुवत कशामुळे ठरत आहेत आणि तरीही अनेक देशांकडून त्यांची निर्मिती आणि वापर का केला जात आहे, यावर आपण एक नजर टाकणार आहोत.

युद्धनीतीमध्ये रणगाडे इतके कमकुवत का झाले आहेत?

रशिया-युक्रेन युद्धापासून ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. रणगाड्यांना उद्ध्वस्त करणारा स्वस्त आणि प्रभावी पर्याय म्हणून ड्रोन्सकडे पाहिले जात आहे. ‘फर्स्ट-पर्सन-व्ह्यू’ (FPV) हा असाच एक ड्रोन आहे; ज्याची किंमत ५०० डॉलर किंवा त्याहून कमी आहे. हा ड्रोन कॅमेरा आणि स्फोटकांनी सज्ज असतो. तो रिमोट कंट्रोलचा वापर करून चालवला जातो. त्यामुळे दूरवरूनच रणगाड्यांना लक्ष्य करण्यासाठी सैनिकांकडून मोठ्या प्रमाणावर त्यांचा वापर केला जातो.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या बातमीनुसार, इंजिन, ओपन हॅच किंवा हल आणि टरेट यांच्यामधील भाग अशा रणगाड्यांवरील सर्वांत असुरक्षित ठिकाणी सैनिकांकडून FPV ड्रोन्सचा वापर करून हल्ला केला जातो. त्यामुळे रणगाडे सहजगत्या उद्ध्वस्त होतात. पुढे या बातमीमध्ये म्हटले आहे की, युक्रेनने आपल्या रणगाड्यांना संपूर्ण संरक्षण दिलेले नसल्यामुळे त्यांचे सर्वाधिक रणगाडे उद्ध्वस्त झाले आहेत. ड्रोन्सचा त्यांच्या दूरवर असलेल्या पायलटशी संपर्क तोडणे हा एक चांगला उपाय आहे. त्यासाठी व्यत्यय आणणाऱ्या जॅमर्सचा वापर केला जाऊ शकतो. तसेच काही ड्रोन्सना उद्ध्वस्त करण्यासाठी वा त्यांना पकडण्यासाठी शॉटगन्स आणि साध्या मासेमारीच्या जाळ्यांचा वापरदेखील प्रभावीपणे करता येतो.

युक्रेनकडे शॉर्ट रेंज अँटी-एअरक्राफ्ट शस्त्रेदेखील आहेत. आपल्या रणगाड्यांच्या संरक्षणासाठी तीदेखील युद्धात तैनात केली जाऊ शकतात. मात्र, युक्रेनने आजवर त्यांचा वापर रशियाच्या FPV ड्रोन्सना नष्ट करण्यासाठी केला नसून एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्स नष्ट करण्यासाठीच केला आहे. काही उणीवा असल्या तरी रणगाड्यांमध्ये, प्रतिस्पर्धी रणगाड्यांची ताकद ओळखून त्यांच्याशी सामना करण्याचे सामर्थ्य, वेगवान हालचाली आणि धक्कातंत्र यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो.

ऑस्ट्रियन लष्करी प्रशिक्षक कर्नल मार्क्स रेइसनर यांचा शस्त्र वापरासंबंधी चांगला अभ्यास आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’शी बोलताना ते म्हणाले, “तुम्हाला जर भूभाग ताब्यात घ्यायचे असतील, तर तुमच्याकडे रणगाडे असणे गरजेचे ठरते.”

युद्धनीतीमधील रणगाड्यांचे कित्येक वर्षांपासूनचे महत्त्व त्यांनी विशद करून सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या जागतिक महायुद्धाच्या शेवटी रणगाड्यांची पहिल्यांदा निर्मिती करण्यात आली होती. मात्र, नाझींकडून दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांचा वापर प्रभावीपणे आणि चतुराईने करण्यात आला. त्यामुळे रणगाडे ब्लिट्झक्रीग धोरणांचा एक महत्त्वाचा भाग बनले.

अनेक देशांनी अत्यंत प्रभावी अशा रणगाडाविरोधी शस्त्रांची निर्मिती केल्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर रणगाडे कालबाह्य होतील, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. १९७३ साली झालेल्या अरब-इस्रायल युद्धादरम्यान ही बाब अधिकच अधोरेखित झाली. कारण- त्या युद्धात इजिप्शियन सैन्याने सोविएत-निर्मित ९के११ मायलुत्कस (9K11 Maylutkas) नावाच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करून अनेक इस्रायली रणगाडे नेस्तनाबूत केले होते.

हेही वाचा : विश्लेषण : सर्वाधिक BH मालिका वाहन क्रमांकाची खरेदी पुण्यात का? हा क्रमांक कुणाला मिळू शकतो?

पुरेशा पायदळाच्या सहाय्याने रणगाड्यांचा वापर केला गेला आणि त्यांच्या आर्मरला अधिक संरक्षित केले गेले, तर रणगाडे प्रभावी ठरू शकतात, असे अनेक युद्धनीती तज्ज्ञांच्या लवकरच लक्षात आले. विशेषत: शहरी युद्धात त्यांचा वापर प्रभावी ठरू शकतो. उदाहरणार्थ, बंडखोरांविरोधात २००४ मध्ये झालेल्या फालुजाहच्या दुसऱ्या लढाईमध्ये अमेरिकेच्या नौसेनेने M1 अब्राम्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. त्यामुळे आपापल्या रणगाड्यांच्या संरक्षणासाठी युक्रेन आणि रशियाला व्यवहारात उपयोगी पडणारे संरक्षण धोरण अमलात आणावे लागेल.

‘ब्लूमबर्ग’मध्ये रणगाड्यांविषयी प्रसिद्ध झालेल्या एका विश्लेषणामध्ये याविषयीच माहिती देण्यात आली आहे. १९६० मध्ये ब्रिटिश लष्करी इतिहासकार बेसिल हेन्री लिडेल हार्ट यांनी या संदर्भात एक प्रभावी भाष्य केले होते. ते म्हणाले होते, “गेल्या ४० वर्षांत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी वारंवार असा दावा केला आहे की, रणगाडे आता कालबाह्य झाले आहेत. मात्र, त्याचवेळी रणगाड्यांची उपयुक्तता सिद्ध होते आणि रणगाडे मोडीत निघाले म्हणणाऱ्यांचा दावा फोल ठरतो.”