रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ते त्यांच्या राष्ट्रांचा अधिकृत ध्वज घेऊन या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकलेले नाहीत. या देशातील अनेक खेळाडू वेगळ्या श्रेणीच्या अंतर्गत या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. या वर्गाला फ्रेंचमध्ये ‘ॲथलीट्स इंडिव्हिड्युल्स न्यूट्रेस (एआयएन)’ असे म्हणतात. याचा सोपा अर्थ वैयक्तिक अथवा तटस्थ खेळाडू, असा होतो. ऑलिम्पिकने घेतलेल्या या निर्णयावरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बोचरी टीका केली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (International Olympic Committee – IOC) नेत्यांवर टीका करताना म्हटले आहे की, खेळांचा वापर अशा लोकांविरोधात राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो; ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, हेच यातून दिसते. हा अत्यंत वाईट असा वर्णद्वेषी वांशिक भेदभाव आहे, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा : LGBTQ खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये धमक्या? ग्राइंडर डेटिंग अ‍ॅप ब्लॉक करण्यामागचे खरे कारण काय?

reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
Maharashtra assembly elections 2024 independent candidate getting support from mahayuti maha vikas aghadi Unsatisfied leader in bhandara Vidhan sabha
भंडारा विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला? युती-आघाडीतील असंतुष्ट अपक्षांच्या पाठिशी!
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
smriti irani in Vasai Assembly constituency for Maharashtra Assembly Election 2024
वसईची परिस्थिती जैसे थे; स्मृती इराणी, महायुतीच्या प्रचारासाठी वसईत सभा

रशिया आणि बेलारूसला सहभागी होण्यास बंदी का?

सुरुवातीला २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) रशिया आणि बेलारूसला सहभागी होण्यासाठी मंजुरी दिली होती. विंटर ऑलिम्पिक संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी हे निर्बंध लादण्यात आले. विंटर ऑलिंपिक २० फेब्रुवारी २०२२ रोजी बीजिंगमध्ये संपले होते. आयओसीने म्हटले होते की, रशियाच्या या आक्रमणामुळे ऑलिम्पिक कराराचे उल्लंघन झाले आहे. या करारामध्ये ऑलिम्पिक खेळांच्या एक आठवडा आधी ते पॅरालिंपिक खेळांनंतरच्या एक आठवड्यापर्यंत राष्ट्रांनी एकमेकांवर हल्ला करू नये, असे म्हटले आहे. ऑलिम्पिकनंतर लगेचच पॅरालिम्पिकचे आयोजन केले जाते. बेलारूसने रशियाला आपला भूभाग लष्करी उद्देशांसाठी वापरण्याची परवानगी दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे बेलारtसही या बंदीच्या निर्णयामध्ये ओढला गेला आहे. बेलारूसची पश्चिम सीमा रशियाशी जोडलेली आहे; तर त्याच्या दक्षिणेला युक्रेनची सीमा आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये रशियन ऑलिम्पिक समिती अधिकृतपणे निलंबित करण्यात आली. रशियन ऑलिम्पिक समितीने डोनेस्तक, खेरसन, लुहान्स्क व झापोरिझ्झिया या युक्रेनमधील युक्रेनियन क्रीडा संघटनांवर आपला अधिकार सांगितला होता. तसेच, IOC ने या प्रदेशांना युक्रेनियन ऑलिम्पिक समितीचा भाग म्हणून मान्यता दिली आहे. IOC ने रशियाच्या इंटरनॅशनल फ्रेंडशिप असोसिएशनचा (IFA) हवालाही दिला. IFA ची स्थापना समर आणि विंटर फ्रेंडशिप गेम्स आयोजित करण्यासाठी करण्यात आली होती. IFA ही राजकीय संस्था असून, त्यांनी आयओसी चार्टरचे उल्लंघन केल्याचे IOC ने म्हटले आहे. IOC च्या चार्टरमध्ये असे म्हटले आहे की, क्रीडा संघटनांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असले पाहिजे. रशियाने सप्टेंबर २०२४ साठी फ्रेंडशिप गेम्सची घोषणा केली आहे. आयओसीने या घोषणेनंतर रशियन सरकारने केलेल्या आक्रमणाचा धिक्कार केला आणि रशिया खेळाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही म्हटले आहे.

मात्र, राजकीयदृष्ट्या तटस्थ राहणे म्हणजे काय, हे पुरेसे स्पष्ट नसल्यामुळे याबाबत अनेकांची मते वेगळीही असू शकतात. विशेषत: ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांबाबत हा वाद नक्कीच होऊ शकतो. काही टीकाकारांचे असे म्हणणे आहे की, इस्रायलने गाझावर आक्रमण करूनही इस्रायलमधील खेळाडू अधिकृतपणे सहभागी होत आहेत.

रशिया आणि बेलारूसमधून कोण सहभागी होऊ शकेल?

IOC ने २०२३ मध्ये अशी घोषणा केली की, रशियन आणि बेलारशियन खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतील; मात्र, ते त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत; तसेच युक्रेनवरील रशियन आक्रमणाचे समर्थन करणारे खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. या निर्णयानंतर ३२ खेळाडूंनी निमंत्रण स्वीकारले; तर इतर २८ पात्र खेळाडूंनी ही ऑफर नाकारली. सध्या हे खेळाडू तटस्थ म्हणून ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांचा गणवेशही ते तटस्थ असल्याचे दर्शविणारे आहेत. जर त्यांनी पदके जिंकली, तर त्यांच्या देशाचे राष्ट्रगीत न वाजविले जाता, त्यांच्यासाठी विशेष तयार केलेले गीतच वाजवले जाईल. फक्त खेळाडूच नव्हे, तर प्रेक्षकांनाही त्यांच्या देशांचे झेंडे फडकवण्यास बंदी आहे.

हेही वाचा : ऑलिम्पिक उद्घाटनावरून वाद का झाला? काय आहे ‘द लास्ट सपर’चा संदर्भ?

रशियावर यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये बंदी घालण्यात आली आहे का?

होय. २०१७ मध्ये वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA) ने एक मोठा घोटाळा उघडकीस आणला होता. २०११ ते २०१४ दरम्यान झालेल्या या घोटाळ्यामध्ये एक हजारहून अधिक लोक सहभागी होते. सोची येथील २०१४ विंटर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचाही यामध्ये समावेश होता. या घोटाळ्यानंतर आयओसीने बंदी जारी केली होती. मात्र, खेळाडू वैयक्तिकरीत्या ‘रशियाचे ऑलिम्पिक खेळाडू’ म्हणून अर्ज करू शकत होते. २०१९ मध्ये WADA नेही २०२० टोकियो ऑलिंपिक आणि २०२२ बीजिंग विंटर ऑलिंपिकमध्ये रशियावर बंदी असावी, या बाजूनेच मतदान केले होते. त्यानंतर रशियाने टूर्नामेंटसाठी बोली लावण्याचा किंवा स्पर्धा करण्याचा अधिकार गमावला होता; तसेच सरकारी अधिकाऱ्यांनाही ऑलिम्पिकच्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रशियन खेळाडूंनी रशियन ऑलिम्पिक समितीच्या (ROC) बॅनरखाली सहभाग नोंदविला होता.

स्वतंत्र खेळाडू प्रथमच ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहेत का?

नाही. ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना स्वतंत्र किंवा तटस्थ खेळाडू म्हणून याआधीही सहभाग घेता आला आहे. सोविएत रशिया विसर्जित झाल्यानंतर या प्रदेशातील काही खेळाडूंनी स्पेनमधील बार्सिलोनामध्ये १९९२ साली झालेल्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये तटस्थ खेळाडू म्हणून भाग घेतला होता. विघटित झालेल्या सोविएत राज्यांमध्ये ऑलिम्पिक समित्या नसल्यामुळे ही परवानगी देण्यात आली होती.