रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधक तथा टीकाकार ॲलेक्सी नवाल्नी सध्या तुरूंगात आहेत.ते गेल्या दोन आठवड्यांपासून गायब होते. त्यांना नेमके कोठे ठेवण्यात आलेले आहे, याची कोणालाही माहिती नव्हती. दरम्यान त्यांना आर्क्टिक समुद्राजवळच्या एका तुरुंगात ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. तशी माहिती नवलेनी यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर नवलेनी यांच्यावर काय आरोप आहेत? त्यांना ठेवण्यात आलेल्या तुरुंगाची स्थिती काय आहे? या तुरुंगाचा इतिहास काय? हे जाणून घेऊ या….

ॲलेक्सी नवाल्नी यांना नेमकं कोठे ठेवलंय?

नवाल्नी यांच्या प्रवक्त्या किरा यार्मिश यांनी नवाल्नी यांना नेमके कोठे ठेवलेले आहे, याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्क्टिक सर्कलमधील आयके-३ (IK-3) पेनाल कॉलोनीमध्ये (एका प्रकारचा तुरुंग) ठेवण्यात आले आहे. या तुरुंगाला ‘द पोलार वुल्फ’ असेही म्हणतात. रशियातील यमल-नेनेट्स या प्रदेशातील खार्प या ठिकाणी हा तुरुंग आहे. मॉस्को शहरापासून हा तुरुंग साधारण १९०० किलोमीटर दूर आहे. यार्मिश यांनी नवाल्नी यांच्या ठावठिकाण्याबाबत अधिक माहिती दिली आहे. “नवाल्नी यांना ठेवण्यात आलेल्या याआधीच्या तुरुंगापेक्षा सध्याची तुरुंगाची स्थिती फारच बिकट आहे. नवाल्नी यांना त्यांचे जीवन असह्य वाटावे, यासाठी सरकारकडून प्रयत्न केला जात आहे,” असे यार्मिश यांनी सांगितले.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Ukraine surgical strike on the head of Russia nuclear forces
रशियाच्या अण्वस्त्र दल प्रमुखावरच युक्रेनचा ‘सर्जिकल स्ट्राइक’! धाडसी हल्ला की अगतिक कारवाई? रशियाचे प्रत्युत्तर किती विध्वंसक?
Loksatta anvyarth Chancellor Olaf Scholz suffers defeat in German parliament
अन्वयार्थ: जर्मनीत स्थैर्य नाही… मर्केलही नाहीत!
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”

पेनाल कॉलोनीज म्हणजे काय?

खास कैद्यांना ठेवण्यासाठी रशियात पेनल कॉलोनीज (तुरुंग) उभारण्यात आल्या होत्या. स्टॅलिन यांच्या काळात सोव्हियत युनियनमध्ये कैद्यांना (सक्तीचे कामगार) ठेवण्यासाठी गुलॅग्स असायचे. या गुलॅग्समध्ये दहा लाखांहून अधिक कैद्यांचा मृत्यू झाला होता. काळानुसार या कैद्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीत बदल होत गेला.

कैद्यांचे एकूण चार विभागांत वर्गीकरण

रशियामध्ये अशा प्रकारचे साधारण ७०० तुरुंग आहेत. आजही या तुरुंगांत ५ लाखांपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आलेले आहे. या कैद्यांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्याऐवजी त्यांना एका मोठ्या खोलीत ठेवले जाते. या ठिकाणी असलेल्या कैद्यांकडून सक्तीने काम करून घेतले जाते. अल जजिराच्या वृत्तानुसार या तुरुंगातील कैद्यांचे एकूण चार विभागांत वर्गीकरण करण्यात आलेले आहे. कैद्याने केलेल्या गुन्ह्यानुसार त्यांना या वेगवेगळ्या विभागांत ठेवले जाते.

स्टालिन यांच्या काळात तुरुंगाची निर्मिती

ॲलेक्सी नवाल्नी यांना ठेवण्यात आलेल्या पोलार वुल्फ पेनाल कॉलोनीतील (तुरुंग) आयके-३ या विभागात ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हा तुरुंग रशियातील सर्वांत भीषण तुरुंगांपैकी एक आहे. या तुरुंगाची निर्मिती १९६० मध्ये करण्यात आली. स्टालिन यांच्या आदेशानुसार रशियन आर्क्टिक प्रदेशात रेल्वे रुळ निर्माण करण्यात येत होता. या रुळासाठी काम करणाऱ्या कामगारांना येथे ठेवण्यात येत होते. मात्र शेवटपर्यंत या रेल्वे रुळाचे काम झाले नव्हते.

तुरुंगात मच्छर, अंधार

मानवाधिकार समूह अमेन्स्टी इंटरनॅशनलच्या म्हणण्यानुसार युरोपमधील तुरुंगांची स्थिती सर्वांत वाईट आहे. पोलार वुल्फ या तुरुंगात अंधार असतो, या भागात खूप थंडी असते, कैद्यांना उन्हाळ्यात मच्छारांमध्ये राहावे लागते. हिवाळ्यात तर आणखीच बिकट स्थिती असते. डिसेंबर महिन्यात या भागातील तापमान उने २८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. रशियातील बहुतांश पेनाल कॉलोनीज (तुरुंग) या दुर्गम भागात आहेत. हे तुरुंग शहरापासून दूर आहेत. कैद्यांच्या कुटुंबीयांना तसेच अन्य लोकांना या भागात भेटायला येणे फार कठीण होऊन बसते. रशियाप्रमाणेच अन्य देशांतील पेनाल कॉलोनींमध्ये अशीच स्थिती आहे.

ॲलेक्सी नवाल्नी यांना तुरुंगवास का?

ॲलेक्सी नवाल्नी हे व्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधक आहेत. ते सध्या तुरुंगात आहेत. अगोदर ते मॉस्कोपासून २३५ किमी अंतरावर असलेल्या एका तुरुंगात होते. मात्र त्यांना आता मॉस्कोपासून खूप दूर असलेल्या तुरुंगात हलवण्यात आले आहे. आगामी वर्षाच्या मार्च महिन्यात रशियामध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे ॲलेक्सी नवाल्नी हे मॉस्को शहरापासून जास्तीत जास्त दूर असावेत, म्हणून तेथील प्रशासनाने हा निर्णय घेतला असावा, असे म्हटले जात आहे.

राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी आरोप?

ॲलेक्सी नवाल्नी यांना एकूण १९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार, निधीचा अपव्यय तसेच अन्य आरोप करण्यात आले होते. नवलेनी यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून राजकीय तसेच सार्वजनिक जीवन उद्ध्वस्त व्हावे, यासाठी माझ्यावर असे आरोप करण्यात आलेले आहेत, असा दावा नवलेनी यांनी केला आहे.

Story img Loader