आज विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे, नवनवीन शोध लावले जात आहेत. परंतु, असे असले तरी अनेक आजार असे आहेत, ज्यांचा उपचार अजूनही शक्य नाही. आता रशियाने केलेल्या दाव्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. रशियाने कर्करोगाविरोधातील लस शोधून काढल्याचा दावा केला आहे. रशिया नवीन वर्षात कर्करोगाविरुद्ध लस तयार करण्यास सज्ज आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून ही लस रुग्णांसाठी विनामूल्य उपलब्ध असेल, असेही सांगण्यात आले आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘टीएएसएस’नुसार, रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी अलीकडेच सांगितले की, देश यासाठी तयार आहे. कर्करोगासाठी स्वतःची एमआरएनए लस तयार आहे. ही लस नक्की कसे कार्य करते? लस कशी विकसित केली गेली? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रशियाचा दावा काय?
रशियन आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, त्यांनी कर्करोगावरील लस विकसित केली आहे, जी रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाईल. कर्करोगापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक रुग्णासाठी ही लस वैयक्तिकृत केली जाईल. यापूर्वी मॉस्कोमधील गमालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमिओलॉजी व मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी टीएएसएस वृत्तसंस्थेला सांगितले होते, “कर्करोगविरोधी लस ट्युमरची वाढ रोखू शकते आणि रोगाचा प्रसार रोखू शकते. सध्या लस कोणत्या कर्करोगावर उपचार करील, ती कसे कार्य करते किंवा त्याचे नाव काय, हे माहीत नाही.”
हेही वाचा : ओबीसी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपला केंद्र सरकारकडून विलंब, विद्यार्थी अडचणीत; कारण काय?
या वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले होते की, रशियन शास्त्रज्ञ कर्करोगावरील लस विकसित करण्याच्या खूप जवळ आहेत. त्यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले की, आम्ही तथाकथित कर्करोगाच्या लसी आणि नवीन पिढीची इम्युनोमॉड्युलेटरी औषधे तयार करण्याच्या अगदी जवळ आलो आहोत. मला आशा आहे की, लवकरच त्याचा वैयक्तिक थेरपीच्या पद्धती म्हणून प्रभावीपणे वापर केला जाईल.
‘mRNA’ लस कसे कार्य करते?
“कर्करोगावरील लस ट्युमर असलेल्या रुग्णांना दिली जाते. mRNA किंवा मेसेंजर RNA हा मानवी आनुवंशिक कोडचा एक भाग आहे, जो पेशींमध्ये प्रथिने तयार करतो. रुग्णाला ही लस दिल्यावर विषाणू किंवा जीवाणूंशी लढण्यासाठी मेसेंजर RNA (mRNA) तंत्रज्ञान पेशींना प्रथिने तयार करण्याचा संदेश पाठवते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीला आवश्यक प्राथिने मिळतात आणि शरीरात अँटीबॉडीज तयार होतात,” असे राष्ट्रीय कर्करोग संस्था (एनसीआय) सांगते. ही लस इतर लसींच्या तुलनेत लवकर तयार होते. तसेच शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. mRNA तंत्रज्ञानावर आधारित ही पहिली लस आहे.
कर्करोगावरील लस महत्त्वाची का?
जगभरात कर्करोग हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, २०२२ मध्ये जगभरात अंदाजे २० दशलक्ष (२ कोटी) नवीन कर्करोगाची प्रकरणे आणि ९.७ दशलक्ष (९७ लाख) मृत्यू झाले. फुप्फुसाचा कर्करोग हा २०२२ मध्ये जगभरात सर्वांत सामान्य कर्करोग होता. इतर सामान्य कर्करोगांत स्तन, मोठे आतडे, गुदाशय व पुरुषस्थ ग्रंथीच्या कर्करोगाचा समावेश आहे. उर्वरित जगाप्रमाणे रशियामध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. देशात २०२२ मध्ये ६,३५,००० प्रकरणे नोंदवली गेली; ज्यामध्ये मोठे आतडे, स्तन व फुप्फुसाचा कर्करोग हे सर्वांत सामान्य कर्करोगाचे प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. फेडरल मेडिकल अॅण्ड बायोलॉजिकल एजन्सी (एफएमबीए)च्या प्रमुख वेरोनिका स्कवोर्त्सोवा यांनी गेल्या महिन्यात ‘टीएएसएस’ला सांगितले की, रशिया त्वचेच्या कर्करोग मेलेनोमा आणि घातक ब्रेन ट्युमर असणाऱ्या ग्लिओब्लास्टोमायासह अनेक कर्करोगांवर अभ्यास करीत आहे.
इतर देशांतील स्थिती काय?
रशियाप्रमाणेच पश्चिमेतील देशदेखील वैयक्तिक कर्करोगाच्या लसींवर काम करीत आहेत. ऑगस्टमध्ये डॉक्टरांनी अमेरिका आणि ब्रिटनसह सात देशांमध्ये रुग्णांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगावरील लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या. फुप्फुसाचा कर्करोग हा जगभरात कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. जर्मनीस्थित ‘BioNTech’ने विकसित केलेली, BNT116 ही लस नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सरवर (एनएससीएलसी) उपचार करील, जो रोगाचा सर्वांत सामान्य प्रकार आहे. गेल्या वर्षी ब्रिटनने वैयक्तिकीकृत कर्करोग उपचार प्रदान करण्यासाठी क्लिनिकल चाचण्या सुरू करण्याकरिता ‘बायोएनटेक’शी करार केला. मे महिन्यामध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी ग्लिओब्लास्टोमा असलेल्या चार रुग्णांमध्ये वैयक्तिक लसीची चाचणी केली. त्यांना असे आढळून आले की, लस दिल्यानंतर दोन दिवसांनी प्रतिकारशक्ती निर्माण होते.
हेही वाचा : भारतात डायबेटिससाठी पहिल्या जैविक बँकेची सुरुवात, याचे फायदे काय? देशातील मधुमेहाचे संकट किती मोठे?
फार्मास्युटिकल कंपन्या Moderna आणि Merck & Co त्वचेच्या कर्करोगावरील लसीवर काम करत आहेत. प्रतिबंधात्मक कर्करोगाच्या लसी आधीच अस्तित्वात आहेत, जसे की human papillomaviruses (HPV). पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि केंद्र यांनी संयुक्तपणे विकसित केलेली गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाविरुद्धची भारतातील पहिली स्वदेशी लस, Cervavac गेल्या वर्षापासून बाजारात उपलब्ध आहे. हेपॅटायटिस बी विषाणू (HBV) लसदेखील उपलब्ध आहे, जी HBV-संबंधित यकृत कर्करोगास प्रतिबंध करण्यास मदत करते. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांना या वर्षी गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी जगातील पहिली लस तयार करण्यासाठी निधी मिळाला आहे.