रशियाने तब्बल पाच दशकांनी चंद्राकडे पाठविलेले ‘लुना-२५’ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले असल्याचे रशियाची अवकाश संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ यांनी रविवारी (दि. २० ऑगस्ट) जाहीर केले. रशियाची मोहीम अपयशी ठरल्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणे किती कठीण काम आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आतापर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर तब्बल २० हून अधिक वेळा यशस्वीरित्या अवतरण (लँडिग) करण्यात आले आहे. यात सहा मोहिमा अशा होत्या, ज्यात मानवाचाही सहभाग होता; तरीही अद्याप प्रत्येकवेळी यशस्वी अवतरण करण्यावर तंत्रज्ञानाला प्रभुत्व मिळवता आलेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, मागच्या १० वर्षांत चीनकडून प्रक्षेपित केलेल्या तीन यानांचा अपवाद वगळता इतर देशांना यशस्वी अवतरण करता आलेले नाही. १९६६ ते १९७६ या सालादरम्यानच इतर देशांनी यशस्वीरित्या अवतरण केले होते, हे विशेष. पृष्ठभागावर उतरणे इतके कठीण काम का आहे? आतापर्यंत किती मोहिमा यशस्वी झाल्या आणि लुना मोहिमेचे भवितव्य काय? याबाबत घेतलेला हा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शेवटची १५ मिनिटे महत्त्वाची
२०१९ साली भारताची चांद्रयान-२ मोहीम अंशतः अपयशी ठरली होती. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) अध्यक्ष के. सिवन यांनी अवतरण प्रक्रियेच्या शेवटच्या १५ मिनिटांना “धास्ती निर्माण करणारा काळ” असे म्हटले होते. के. सिवन यांची ही टिप्पणी चंद्राच्या कक्षेपासून ते त्याच्या पृष्ठभागापर्यंतच्या प्रवासाचे आणि यशस्वीरित्या उतरण्याचे सर्व काही सार सांगते. ही प्रक्रिया किती जटील आहे आणि चांद्रमोहिमेतील हा सर्वात कठीण टप्पा असल्याचे सिवन यांच्या विधानातून दिसून येते.
मागच्या चार वर्षांत भारत, इस्रायल, जपान आणि आता रशिया या चार देशांमधील सरकारी आणि खासगी अंतराळ संशोधन संस्थांनी आपले यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याचा प्रयत्न केला आणि चौघांनाही अपयश आले. सर्वांच्याच मोहिमेत एक बाब लक्षात आली की, शेवटच्या क्षणी म्हणजे यानाचे अवतरण (लँडिग) करत असताना काहीतरी अडचण निर्माण होऊन यान पृष्ठभागावर कोसळले.
रशियाचे लुना-२५ यान नेमके कशामुळे कोसळले हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. ‘रॉसकॉसमॉस’ संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी लुना-२५ ला लँडिंगच्या आधीची कक्षा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, यानाच्या इंजिनाने अपेक्षेप्रमाणे साथ न दिल्यामुळे अचूक कक्षा प्राप्त करता आली नाही. त्यानंतर यानाशी संपर्क तुटल्यानंतर लुना-२५ चंद्रावर कोसळले असावे, असा अंदाज संस्थेने व्यक्त केला. इस्रोचे चांद्रयान-२, इस्रायलचे बेरेशीट (Beresheet) आणि जपानचे हकोतो-आर मिशन (Hakuto-R Mission) या तीनही मोहिमांच्यावेळी विविध प्रकारच्या तांत्रिक खराबीमुळे इच्छित गती प्राप्त करण्यात अपयश आले होते.
चीन याबाबतीत एकमेव अपवाद आहे, त्यांनी २०१३ साली पहिल्याच प्रयत्नात ‘चँग ई-३’ (Chang’e-3) चे यशस्वी अवतरण केले होते. त्यानंतर २०१९ साली ‘चँग ई-४’ आणि २०२० साली ‘चँग ई-५’ या दोन चांद्रमोहिमाही चीनने यशस्वीरित्या पार पाडून दाखविल्या.
ज्या देशांना चांद्रमोहिमेत अपयश आले, त्या देशांमध्ये भारत असा एकमेव देश आहे ज्यांनी तीनच वर्षात पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न केले आहेत. चांद्रयान-२ च्या अपयशातून धडा घेऊन इस्रोने यावेळी चांद्रयान-३ च्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. तसेच चांद्रयान-३ च्या अभियांत्रिकी रचनेत मूलभूत बदल केले असून एखादे उपकरण काम करण्याचे थांबल्यास पर्यायी उपकरण वापरण्याची सोय करण्यात आली आहे.
महत्त्वाचे >> ‘चांद्रयान-३’ मध्ये केले आहेत नवीन बदल; यावेळी चांद्रयानचे यशस्वी लँडिग करणार?
यापूर्वी झालेले काही अवतरण
पन्नास वर्षांपूर्वी अवकाश मोहिमा हाती घेण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरण्यात येत होते, तेच आजही अनेक देशांतील प्रगत अवकाश संस्था वापरत आहेत. तंत्रज्ञानाची जुनीच क्षमता आजही अनेक संस्थांसाठी त्रासदायक ठरते आहे. पन्नास वर्षांपूर्वी ज्या मोहिमा घेतल्या गेल्या त्यांच्या अपयशाच्या दरावरून स्पष्ट होते की, अवतरण तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणे त्याकाळीदेखील कठीण होते.
१९६३ ते १९७६ दरम्यान ४२ चांद्रमोहिमा हाती घेण्यात आल्या, ज्यापैकी फक्त २१ मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. याचा अर्थ केवळ ५० टक्के मोहिमा यशस्वी झाल्या होत्या. पन्नास वर्षांपूर्वी चांद्रमोहिमा हाती घेण्यामागे वेगळे उद्देश होते. युनायटेड स्टेट्स आणि सोव्हिएत युनियनमध्ये (USSR) चाललेल्या शीतयुद्धातील शत्रुत्व आणि भू-राजकीय वर्चस्व गाजविण्यासाठी दोन्ही देशांकडून एकापाठोपाठ एक चांद्रमोहिमा हाती घेण्यात येत होत्या. त्याकाळी घेतलेल्या मोहिमा या जोखमीच्या, अत्यंत खर्चिक आणि ऊर्जेच्या दृष्टिकोनातून अकार्यक्षम होत्या; पण तरीही यापैकी काही मोहीम यशस्वी झाल्या, ज्याची फलनिष्पत्ती अशी की, विज्ञानाच्या क्षेत्रात आणखी कल्पक कसब दाखविण्याची प्रेरणा अनेकांना मिळाली.
चांद्रयान-१ या मोहिमेतील महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून मायलस्वामी अन्नादुराई (Mylswamy Annadurai) यांचा उल्लेख केला जातो. ते म्हणाले होते की, पूर्वी चांद्रमोहिमा हाती घेताना ज्या प्रकारची जोखीम घेतली गेली, ती आता पूर्णपणे अस्वीकार्य असू शकेल. तसेच त्या मोहिमांवर झालेला खर्चही आता समर्थनीय ठरू शकत नाही.
तसेच, पूर्वीच्या तुलनेत आता हाती घेण्यात येत असलेल्या चांद्रमोहिमेसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान खूप अद्ययावत आणि वेगळे आहे. ते अधिक सुरक्षित, स्वस्त आणि इंधन कार्यक्षम आहे. परंतु, आजच्या तंत्रज्ञानाची तुलना १९६० ते १९७० या दशकातील तंत्रज्ञानाशी होऊ शकत नाही. आता फक्त चाचणी घेण्यावर भर दिला जातो. युनायटेड स्टेट्सने आतापर्यंत चंद्रावर सहावेळा क्रू मिशन्स उतरविले आहेत. परंतु, आता मात्र यूएसने पुन्हा एकदा सुरुवातीपासून तयारी सुरू केली असून सध्या फक्त ऑर्बिटर पाठवून अभ्यास करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या आर्टेमिस कार्यक्रमात मानव पाठविण्यात आलेले नाहीत. मानवांचा समावेश असलेले क्रू मिशन फक्त आर्टेमिस -३ या मिशनवर जाईल.
आणखी वाचा >> चांद्रयान-३ च्या लँडरचे विलगीकरण यशस्वी; आता पुढे काय?
लुना मिशनचे भविष्य काय?
लुना-२५ च्या निमित्ताने रशियाने चंद्राबाबत असलेल्या कुतूहलाचा उलगडा करण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. पन्नास वर्षांपूर्वी सोव्हिएत युनियनने लुना नावाच्या माध्यमातून चंद्रावर जाण्याचा पराक्रम करून दाखविला होता. आता रशियाने हेच नाव पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. १९७६ साली लुना-२४ हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे रशियाचे शेवटचे यान होते. लुना-२५ नंतर एक लुनार मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा रशियाने याआधीच केलेली आहे. या दशकभरात आणखी तीन लुना मोहीम राबविल्या जाणार आहेत.