Saif Ali Khan Attack Reason : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या मुंबईतील वांद्रे परिसरातील घरात गुरुवारी (१६ डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास एक दरोडेखोर शिरला. अभिनेत्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेत सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, सैफ अली खानच्या घरात मध्यरात्री दरोडेखोर कसा शिरला. त्यावेळी सैफची पत्नी करिना खान नेमकी कुठे होती, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लिलावती रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, दरोडेखोराने केलेल्या चाकूहल्ल्यात सैफ अली खानच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. यातील दोन जखमांचे घाव खोलवर असल्याने अभिनेत्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्या मणक्यात विदेशी बनावटीच्या चाकूचा तुकडा देखील सापडला आहे.
हेही वाचा : Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?
सैफ अली खानच्या घरात दरोडेखोर कसा शिरला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोर अभिनेत्याच्या घरात घुसला. सुरुवातीला त्याने घरात काम करणाऱ्या गृहसेविकेबरोबर वाद घातला. आरडाओरड झाल्यानंतर सैफ अली खान त्याच्या बेडरुममधून बाहेर आला. त्याने दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. ज्यावेळी सैफवर हल्ला झाला तेव्हा त्याची पत्नी करिना आणि २ मुलं घरातच होती. या घटनेनंतर सैफ अली खानच्या टीमने अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्याबाबत अधिकृत निवेदन जारी केलं.
“सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी दरोड्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत,” असं निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सैफ अली खानच्या निवास्थानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसून आलं की, त्याच्यावर हल्ला होण्यापूर्वी दोन तासांच्या आत घरात कुणीही प्रवेश केला नव्हता. त्यामुळे दरोडेखोराला घरात लपून ठेवण्यास कुणीतरी मदत केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.
सध्या अभिनेत्याच्या घरात काम करणाऱ्या तीन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये एक घरगुती नोकर, लिफ्ट ऑपरेटर आणि सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. पोलिसांकडून या तिघांचीही कसून चौकशी केली जात आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची १५ पथके रवाना झाली आहे. सैफ अली खानवर अचानक हल्ला झाल्याने वांद्रे परिसरात राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या घटनेनंतर करीना कपूर खानच्या टीमने एक निवेदनही जारी केलं आहे. “गुरुवारी रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खानच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली आहे ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुटुंबातील इतर सदस्य आहेत सुरक्षित आहेत. आम्ही माध्यमांना आणि चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी धीर धरावा विनाकारण कुणीही अफवा पसरवू नये. कारण, पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. काळजीबद्दल सर्वांचे आभार”, असं निवेदनात म्हटलं आहे.
सैफ अली खानवर हल्ला कसा झाला?
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दरोडेखोराने गृहसेविकेच्या रुममधून घरात प्रवेश केला. त्यावेळी गृहसेविकेने घराचा अलार्म वाजवला. तेव्हा सैफ अली खान हा बेडरुममधून बाहेर आला आणि त्याने दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोराने सैफच्या अंगावर चाकूने सहा वार केले. या घटनेनंतर सैफच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी दरोडेखोराला खोलीत कोंडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून जाण्यास यशस्वी झाला, असं पोलिसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
दरम्यान, दरोडेखोराने केलेल्या हल्ल्यात सैफच्या अंगात चाकूचा तुकडा अडकला होता. डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून तो बाहेर काढला आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, “सैफला मध्यरात्री २ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या पाठीच्या मणक्यामध्ये २.५ इंचाचा चाकूचा तुकडा अडकला होता”, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “आम्ही दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. आरोपींनी सैफच्या गृहसेविकेवरही हल्ला केला आहे. तिलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या घटनेचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.”
विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, “मुंबईसारख्या शहरात अशा घटना घडणं लाजिरवाणं आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याने पुन्हा मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित उभं केलं आहे. सिनेसृष्टीतील मोठ्या कलाकारांना लक्ष्य करून मुंबईला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
प्रियंका चतुर्वेदी यांनी माध्यमांशी संवाद साधताना बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचाही उल्लेख केला, “बाबा सिद्दीकी यांचे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सलमान खानला बुलेटप्रूफ घरात राहण्यास भाग पाडलं जात आहे. आता सैफ अली खानवर हल्ला करून सेलिब्रिटींच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईत सेलिब्रिटीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाचे काय”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : ‘मकोका’ कायदा काय आहे? या कायद्यामुळे संघटित गुन्हेगारीला आळा बसला आहे का?
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी देखील या घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. “केंद्र सरकार दिल्लीतील जनतेला संरक्षण देऊ शकत नाही, सेलिब्रिटींचेही संरक्षण करू शकत नाही, सीमांच्या सुरक्षेचा प्रश्न तर दूरच आहे. ‘डबल इंजिन’ सरकार कोणालाही सुरक्षा देऊ शकत नाही. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो”, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
सैफवरील हल्ल्यानंतर बॉलिवूड क्षेत्रातून प्रतिक्रिया
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूड क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अभिनेत्री पूजा भट्टने मुंबई पोलिसांना टॅग करत आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “मुंबई पोलीस कृपया या अराजकतेला आळा घालता येईल का? वांद्रे परिसरात अधिक पोलिसांची उपस्थिती आवश्यक आहे. शहरातील या भागात यापूर्वी कधीही इतके असुरक्षित वाटले नव्हते”, असं पूजा भट्टने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अभिनेत्री रवीना टंडनने या घटनेविषयी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत वांद्रे परिसरात अधिक उपाययोजनांची गरज असल्याचे म्हटलं आहे. “सुरुवातीला वांद्रे परिसर अधिक सुरक्षित होता. परंतु, आता तो अनियंत्रित घटकांच्या हाती लागला आहे. अपघात, घोटाळे, फेरीवाले माफिया, अतिक्रमण करणारे, जमीन बळकावणारे आणि धावत्या बाईकवरुन फोन आणि चेन बळकावणारे गुन्हेगार, असे प्रकार परिसरात घडत आहेत”, असं रवीना टंडनने म्हटलं आहे.
सैफ अली खानबरोबर देवरा-१ चित्रपटात करणारा दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “सैफ सरांवरील हल्ल्याबद्दल ऐकून मला धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो”, असं अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.