सलखान जीवाश्म उद्यान हे सोनभद्र जीवाश्म पार्क म्हणून ओळखले जाते, हे उत्तर प्रदेशमधील एक जीवाश्म उद्यान आहे. हे सोनभद्र जिल्ह्यातील SH5A राज्य महामार्गावरील सलखन गावाजवळ रॉबर्ट्सगंजपासून १२ किमी अंतरावर आहे. उद्यानातील जीवाश्म जवळपास १.४ अब्ज वर्षे जुनी आहेत. अलीकडेच, उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने २०२६ पर्यंत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सलखन जीवाश्म उद्यानाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री डॉ नीलकंठ तिवारी आणि यूपी इको-टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डाचे अतिरिक्त संचालक प्रखर मिश्रा यांनी उद्यानाला अलीकडेच भेट दिली. त्याप्रसंगी ते म्हणाले, वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत या स्थळाचा समावेश व्हावा यासाठी भारत सरकारला एक सविस्तर अहवाल देण्यात येणार आहे. युनेस्कोला पाठवले जाणारे अंतिम डॉसियर २०२५ पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा: इस्रोने गगनयानमधील ह्युमनॉइडच्या मेंदूसाठी कवटीची रचना कशी केली?; काय आहेत तिची वैशिष्ट्ये?

Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
Image Of Tiger.
Tiger Travel : टी-२२ च्या बछड्याचा ५०० किलोमीटर प्रवास… यवतमाळचा वाघ धाराशिव, सोलापूरात कसा आला?
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
Mumbai Boat Accident
Elephanta Caves: घारापुरी (एलिफंटा) लेणींना एवढे महत्त्व का? हजारो पर्यटक त्यांना रोज भेट का देतात?
History of Geography How Big is the Universe
भूगोलाचा इतिहास: विश्वाचा आकार केवढा?

सोनभद्र जीवाश्म उद्यानात सापडलेली जीवाश्मं हे एकपेशीय वनस्पती आणि स्ट्रोमेटोलाइट प्रकारातील आहेत. कैमूर वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या कैमूर रेंजमध्ये सुमारे २५ हेक्टर क्षेत्रात हे उद्यान पसरले आहे, हे उद्यान राज्य वन विभागाच्या अखत्यारीत येते. या उद्यानात आढळणारी जीवाश्मं इतर जीवाश्मांपेक्षा वेगळी आहेत आणि भूगर्भशास्त्रज्ञांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उत्पत्तीबद्दल महत्त्वपूर्ण माहितीचा उलगडा त्यांच्या अभ्यासातून होऊ शकतो. बनारस हिंदू विद्यापीठातील (BHU) भूगर्भशास्त्र विभागातील प्रा. वैभव श्रीवास्तव यांनी सलखन जीवाश्म उद्यानाला ५० पेक्षा जास्त वेळा भेट दिली, ते ‘हिंदुस्थान टाइम्स’शी संवाद साधताना म्हणाले, “आमच्यासारख्या भूगर्भशास्त्रज्ञांसाठी ही जीवाश्मं खूप महत्त्वाची आहेत कारण त्यांच्यावरील सखोल संशोधनामुळे पृथ्वीवरील जीवनाची उत्पत्ती कधी झाली यासाठीच नेमका काळ निश्चित करण्यात मदत होऊ शकते.”

संशोधनात काय आढळून आले?

प्रा. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले की पूर्वी असे मानले जात होते की ५७० दशलक्ष वर्षांपूर्वी जीवन अस्तित्वात नव्हते. तथापि, नंतरच्या संशोधनात निळ्या- हिरव्या शैवालच्या रूपात समुद्रात जीवसृष्टी अस्तित्त्वात होती, हे लक्षात आले. सलखन जीवाश्म पार्क आणि यलोस्टोन नॅशनल पार्क ही जगातील दुर्मीळ ठिकाणे आहेत ज्यांनी पूर्वी अस्तित्वात असलेल्या जीवसृष्टीचे पुरावे दिले आहेत, त्यामुळे वैज्ञानिक अभ्यासासाठी ही ठिकाणे महत्त्वपूर्ण आहेत. स्ट्रोमेटोलाइट्स म्हणून ओळखले जाणारे जीवाश्म ६०० दशलक्ष ते १.५ अब्ज वर्षे जुने असल्याचा अंदाज आहे, या प्रदेशात विंध्य समुद्र अस्तित्वात होता तेव्हापासून ते अस्तित्त्वात आहे. कालांतराने, या समुद्राचे रूपांतर आताच्या विंध्याचल पर्वतात झाले. प्रा. श्रीवास्तव यांनी या जीवाश्मांच्या शैक्षणिक महत्त्व आणि भौगोलिक पर्यटनाच्या महत्त्वासाठी त्यांच्या जतन करण्याच्या भर दिला. ऑक्टोबर २०२२ मध्ये, त्यांनी भारत, अमेरिका, बांगलादेश आणि नेपाळमधील भूवैज्ञानिकांच्या टीमसह या उद्यानाला भेट दिली होती.

प्रथम शोध कधी लागला?

१९३० च्या दशकापासून भूवैज्ञानिकांना सध्याच्या पार्क परिसरात सापडलेल्या जीवाश्मांची माहिती आहे. या क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांमध्ये ऑडेन (१९३३), माथूर (१९५८ आणि १९६५) आणि प्रोफेसर एस. कुमार (१९८०-८१) यांचा समावेश आहे. ८ ऑगस्ट २००२ रोजी जिल्हा दंडाधिकारी भगवान शंकर यांच्या हस्ते जीवाश्म उद्यान म्हणून त्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. पूर्वी उद्यानात दररोज १० ते १५ लोक येत असत, नंतर ही संख्या ५० पर्यंत वाढली आणि सध्या दररोज सुमारे ५० ते १०० पर्यटक उद्यानाला भेट देतात.

अधिक वाचा: आंबा भारताचा, श्रेय घेतंय पाकिस्तान आणि उत्पादनात अग्रेसर चीन; भारतीय आंबा व्हाया पाकिस्तान चीनमध्ये पोहोचलाच कसा?

सलखन जीवाश्म उद्यान

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणानुसार (GSI), सलखन जीवाश्म उद्यानामध्ये खडकांवर एकाग्र वलयांच्या रूपात उत्तम प्रकारे विकसित झालेले स्ट्रोमॅटोलाइट्स आढळतात. हे उद्यान विंध्य खोऱ्यात स्थित आहे, जे एक महत्त्वाचे आंतरखंडीय खोरे आहे. येथे प्रोटेरोझोइक कालखंडातील गाळाचे खडक आढळतात, ज्यांचे वय अंदाजे १७०० ते ९०० दशलक्ष वर्षांदरम्यानचे आहे. या प्राचीन खडकांमध्ये स्ट्रोमॅटोलाइट्स व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे जीवाश्म किंवा जीवाच्या शरीराचे अवशेष आढळत नाहीत. GSI ने स्पष्ट केले आहे की, स्ट्रोमॅटोलाइट्स ही सायनोबॅक्टेरियाद्वारे तयार केलेली जैविक रचना आहे, ज्यांना निळे शैवाल देखील म्हणतात, जी समुद्राच्या तळावर वाढतात आणि पातळ थरांमध्ये संरक्षित असतात.

Story img Loader