अन्वय सावंत

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि करीम बेन्झिमा…फुटबॉलविश्वातील दोन मोठी नावे. दोघेही प्रतिष्ठेच्या बॅलन डीओर पुरस्कारविजेते. या दोघांनी दशकभराहूनही अधिक काळ युरोपीय फुटबॉलमध्ये अलौकिक कामगिरी केली. मात्र, गेल्या काही काळात या दोघांना सौदी अरेबियातील फुटबॉल लीगची भुरळ पडली आहे. रोनाल्डो आणि बेन्झिमा यांना सौदी लीगमधील अनुक्रमे अल नासर आणि अल इतिहाद या संघांनी करारबद्ध केले आहे. अन्य नामांकित खेळाडूही युरोप सोडून साैदीमध्ये खेळण्याच्या मार्गावर आहेत. सौदीकडे तेलाच्या अखंड स्रोतातून मिळणारा अमर्याद पैसा आहे. याच्या आधारे ते अन्य खेळांवरही पकड मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कसे याचा आढावा.

thermax collaborates with ceres power for green hydrogen production
थरमॅक्सच्या ‘सेरेस’शी भागीदारी; पर्यावरणपूरक हायड्रोजनची किफायतशीर निर्मिती देशात शक्य
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
sebi worry about sme ipo
विश्लेषण: ‘एसएमई आयपीओं’तील तेजी खुपणारी का? त्यावर सेबीची चिंता आणि उपाययोजना काय?
nsa ajit doval to visit russia for brics meeting
अजित डोभाल यांचा ‘ब्रिक्स’ बैठकीसाठी रशिया दौरा; रशिया-युक्रेन युद्धावर चर्चेची शक्यता
Duleep Trophy 2024, Rishabh Pant and Kuldeep Yadav viral video
‘शपथ घे की धाव घेणार नाहीस’; ऋषभ-कुलदीपचा मजेशीर संवाद व्हायरल
Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
leopard Viral Video
आयत्या पिठावर रेघोट्या! बिबट्याची शिकार हिसकावण्याच्या प्रयत्नात ‘या’ प्राण्याचा झाला गेम; बिबट्यानं असं काय केलं? पाहा Video

रोनाल्डो, बेन्झिमा यांना सौदी लीगची भुरळ का?

फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक रोनाल्डोने या वर्षाच्या सुरुवातीला सौदी प्रो लीगमधील अल नासर संघाशी करार करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी मँचेस्टर युनायटेड, रेआल माद्रिद आणि युव्हेंटस यांसारख्या बलाढ्य युरोपीय संघांकडून खेळलेल्या रोनाल्डोने सौदी लीगमधील संघाशी करार केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, ३८ वर्षीय रोनाल्डोचा हा करार किती रकमेचा आहे, हे कळल्यावर या धक्क्याची तीव्रता काहीशी कमी झाली. रोनाल्डोने आपल्याकडून खेळावे यासाठी अल नासरने वार्षिक ७.५ कोटी डॉलर (सहा अब्ज रुपयांहून अधिक) मोजले. त्यानंतर या लीगमधील अन्य संघांसाठी नामांकित खेळाडूंना करारबद्ध करण्याची सौदी अरेबियाची धडपड सुरू झाली. यात त्यांना मोठे यश मिळाले. तारांकित आघाडीपटू बेन्झिमाने रेआल माद्रिदला अलविदा करत सौदीमधील क्लबकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्याशीही वार्षिक अब्जावधी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच एन्गोलो कान्टे आणि रियाद महारेझ यांसारख्या खेळाडूंना करारबद्ध करण्याचेही सौदीचे प्रयत्न सुरू आहेेत.

रोनाल्डोला करारबद्ध केल्यानंतर सौदी लीगवर काय परिणाम झाला?

क्रीडाविश्वातही अमेरिकेचा दबदबा आहे. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचे खेळाडू चीनला कडवी झुंज देतात. या देशात बेसबॉल, बास्केटबॉल आणि अमेरिकन फुटबॉल हे खेळ लोकप्रिय आहेत. परंतु, जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ फुटबॉलमध्ये अमेरिकेची फारशी प्रगती होत नव्हती. मात्र, २००७मध्ये हे चित्र बदलले. इंग्लंडचा नामांकित फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने अमेरिकेतील फुटबॉल स्पर्धा ‘मेजर लीग सॉकर’मधील लॉस एंजलिस गॅलेक्सी संघाशी करार केला. बेकहॅमच्या प्रभावामुळे आपोआपच अमेरिकेत फुटबॉलला चालना मिळाली. जगात या लीगची चर्चा केली जाऊ लागली. कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असणारे तारांकित फुटबॉलपटू या लीगमध्ये खेळण्याचा विचार करू लागले. थिएरी ऑन्री, स्टीव्हन जेरार्ड, फ्रँक लॅम्पार्ड आणि झ्लाटान इब्रहिमोव्हिच यांसारखे खेळाडू या स्पर्धेत खेळले. आता लिओनेल मेसीही या लीगमध्ये खेळणार आहे. असाच काहीसा प्रकार आता सौदी लीगबाबत घडत आहे. रोनाल्डोला करारबद्ध केल्यामुळे या लीगची लोकप्रियता वाढली आहे. जगभरातील चाहते, फुटबॉलपटू या लीगबाबत चर्चा करू लागले आहेत. भारतातही या लीगचे प्रसारण होऊ लागले आहे. या लीगमध्ये खेळून मिळणाऱ्या पैशांचीही फुटबॉलपटूंना भुरळ पडते आहे.

ब्राह्मणी पितृसत्ताक पद्धतीचा विरोध ते शेतकरी आंदोलन; जॅक डोर्सी, ट्विटरचे विरुद्ध केंद्र सरकारचे आतापर्यंतचे वाद कोणते?

कोणते फुटबॉल संघ सौदीच्या मालकीचे आहेत?

२०२१ मध्ये ‘सौदी पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडा’ने इंग्लिश प्रीमियर लीगमधील न्यूकॅसल क्लब खरेदी केला. ‘सौदी पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडा’कडेच अल नासर, अल इतिहाद, अल अहलि आणि अल हिलाल या चार क्लबची ७५ टक्के मालकी आहे. इंग्लंडमधील शेफील्ड युनायटेड क्लब सौदी अरेबियातील एका राजपुत्राच्या मालकीचा आहे. तसेच सौदीच्या शेजारी आखाती देशांतील धनाढ्यांचाही फुटबॉल क्लब खरेदी करण्याकडे कल आहे. नुकतेच चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवणारा मँचेस्टर सिटी संघ संयुक्त अरब अमिराती येथील सत्ताधारी समूहातील शेख मन्सूर यांच्या मालकीचा आहे. फ्रान्समधील बलाढ्य संघ आणि किलियन एम्बापे व नेयमार यांसारख्या खेळाडूंना मोठ्या किमतीत खरेदी करणाऱ्या पॅरिस सेंट-जर्मेन क्लबची मालकी ‘कतार स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट’कडे आहे.

सौदीने अन्य कोणत्या खेळांमध्ये पैसा गुंतवला आहे?

जगातील सर्वांत मोठी गोल्फ लीग पीजीए टूर आणि सौदीची गुंतवणूक असलेल्या लिव्ह गोल्फने काही दिवसांपूर्वी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. गोल्फविश्वासाठी हा मोठा धक्का होता. याचे कारण म्हणजे, दीड वर्षापूर्वी लिव्ह गोल्फचा उदय झाल्यापासून त्यांच्यात आणि पीजीएमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुरू होता. लिव्ह गोल्फने मोठी रक्कम देऊ करत नामांकित गोल्फपटूंना आपल्याकडे खेचले. खेळाडू केवळ स्पर्धेत सहभागी झाल्यासही मानधन देण्यास सुरुवात केली. बक्षिसाची मोठी रक्कम देऊ केली. सौदीकडील अमर्याद पैसा पाहून अखेर पीजीएने लिव्ह गोल्फशी हातमिळवणी करण्यास पसंती दर्शवली. त्यांनी युरोपमध्ये गोल्फ स्पर्धा भरवणाऱ्या डीपी वर्ल्ड टूरलाही आपल्यात सामावून घेतले आहे. गोल्फप्रमाणेच बुद्धिबळ, बास्केटबॉल आणि बॉक्सिंग या खेळांतही सौदीने रुची घेतली आहे. लवकरच सौदीमध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेट लीगही सुरू होणार आहे. आगामी काळात आशियाई हिवाळी खेळांचे आयोजन करण्याचीही त्यांची योजना आहे. त्यामुळे सौदीने अमर्याद पैशाच्या ताकदीवर क्रीडाविश्वावर पकड मिळवण्यास सुरुवात केली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.