What is Schizophrenia Disorder खेरवाडी पोलिसांनी गुरुवारी वांद्रे-पूर्व येथील खेरवाडी भागातील वाय कॉलनी येथील राहत्या घरी एका ३६ वर्षीय महिलेला तिच्या अल्पवयीन मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेला स्किझोफ्रेनिया हा मानसिक विकार आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली. महिलेने तिच्या १० वर्षांच्या मुलासह स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतले आणि नंतर मोबाईल फोनच्या केबलने त्याची गळा दाबून हत्या केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहायक सचिव असणारे महिलेचे पती आणि या प्रकरणातील तक्रारदार यांना त्यांच्या १४ वर्षांच्या मुलीने ही माहिती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
खेरवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कविदास जांभळे यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेला स्किझोफ्रेनियाचा त्रास असून, ती दीड वर्षापासून वैद्यकीय उपचार घेत होती. “कोठडीत ती कोणाशीही बोलत नाही. तिने आपल्या मुलाला मारले हे तिला कळले नाही. शेजारी आणि पोलिसांनी मुलाला गुरू नानक हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले,” अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, “मुलावर हिंसक हल्ला कोणत्या कारणामुळे केला गेला हे अद्याप त्यांना समजलेले नाही.” स्किझोफ्रेनिया हा विकार काय आहे? स्किझोफ्रेनिया विकाराची लक्षणे काय आहेत? या विकाराने ग्रस्त लोक आजूबाजूच्यांसाठी धोकादायक असतात का? त्याविषयी जाणून घेऊ…
हेही वाचा : बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
स्किझोफ्रेनिया म्हणजे काय?
स्किझोफ्रेनियाची सर्वसामान्य लक्षणे खालीलप्रामाणे :
- अलिप्त राहणे, स्वारस्य गमावणे, ध्येयहीनता व सामाजिक माघार.
- कुरकुर करणे आणि विनाकारण हसणे
- त्यांच्यामध्ये धार्मिक किंवा राजकीय ओळख किंवा अलौकिक शक्ती व क्षमता यांसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या अयोग्य व अकल्पनीय असे भ्रम सतत होऊ शकतात किंवा काही यंत्रणेद्वारे त्यांच्याबद्दल बोलले जात आहे, त्यांचा पाठलाग केला जात आहे आणि त्यांचे अनुसरण केले जात आहे, असेही त्यांना भासू शकते.
- त्यांना प्रत्यक्षात नसलेले आवाज ऐकू येतात किंवा प्रतिमा दिसू शकतात.
- अयोग्य व अव्यवस्थित वागणूक आणि बोलणे
- दैनंदिन जीवनातील क्रियाकलाप राखण्यात असमर्थता, स्वतःची काळजी घेण्यास सक्षम नसणे, अस्वच्छतेमुळे झोप आणि भूक कमी होणे.
- अपमानास्पद आणि आक्रमणात्मक वर्तन
- स्किझोफ्रेनियाग्रस्त प्रत्येक व्यक्तीमध्ये वरील सर्व लक्षणे दिसतीलच असे नाही.
स्किझोफ्रेनिया ही मानसिक स्थिती कशी ओळखावी?
स्किझोफ्रेनिया हा पूर्णपणे एक मानसिक आजार आहे. त्यासाठी या आजारासंबंधी तत्काळ व्यवस्थापन करणे आणि मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा रुग्णांसाठी प्रमाणित मुलाखत तंत्र व स्क्रीनिंग उपाय आहेत आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांना त्याबाबतचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. “ही लक्षणे असलेल्या व्यक्तीला मानसिक आरोग्य व्यावसायिकांकडे घेऊन गेल्यास मदत मिळू शकते. हे बदल विविध कारणांमुळे घडतात; ज्याचे मुख्य कारण म्हणजे न्यूरोट्रान्समीटरमधील असंतुलन, ज्याचे व्यवस्थापन केवळ योग्य आणि वेळेवर औषधांद्वारे केले जाऊ शकते. त्याशिवाय हे वर्तणुकीतील बदल न्यूरोकेमिकल असंतुलनामुळे घडतात. हा विकार असलेल्या व्यक्तींकडे वर्णदोष म्हणून पाहिले जाऊ नये.
याव्यतिरिक्त व्यक्तीचे वर्तन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्यांच्याशी वाद घालू नये कारण ते योग्य काय आणि अयोग्य काय, हे समजून घेण्याच्या स्थितीत नसतात. त्यामुळे ते आणखी चिडू शकतात. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या सभोवताली तणावमुक्त वातावरण राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण- तणावामुळे लक्षणे वाढू शकतात, असे बंगळुरू येथील फोर्टिस हॉस्पिटलचे सल्लागार व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. व्यंकटेश बाबू जी. एम. सांगतात. स्किझोफ्रेनिया हा मल्टीफॅक्टोरियल एटिओलॉजी असलेला एक सिंड्रोम आहे आणि रोगांप्रमाणे (उदाहरणार्थ- मलेरिया, टायफॉइड इ.) त्यावर उपचार नाही.
स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते का?
स्किझोफ्रेनियाने ग्रस्त असलेले लोक नियमित उपचार घेत असल्यास आणि औषधोपचारांचे पालन केल्यास सामान्य जीवन जगू शकतात. ते त्यांचा अभ्यास करू शकतात, मैत्री करू शकतात, नातेसंबंध टिकवून ठेवू शकतात आणि यशस्वी कामकाजाचे जीवन जगू शकतात. या व्यक्ती विवाह करणे निवडू शकतात आणि वैवाहिक जीवनातील भूमिका व जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतात. परंतु, लक्षणे कमी करणे वा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी नियमित औषधोपचार घेणे आवश्यक आहे. विवाह ही जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे; जी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बरेच बदल घडवून आणते. कौटुंबिक समर्थन प्रणाली आणि संभाव्य तणावपूर्ण परिणामांबद्दल स्वतःची तयारी यांमुळे त्यांचे वैवाहिक जीवन परिपूर्ण होऊ शकते. “स्किझोफ्रेनिया ही एक मानसिक आजाराची स्थिती आहे. त्यासाठी नियमित औषधोपचार, झोपेचे योग्य चक्र व तणावमुक्त वातावरण राखण्याची गरज आहे”, असे बंगळुरू येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या सल्लागार क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आकांक्षा पांडे सांगितले.
स्किझोफ्रेनियाग्रस्त लोक त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी धोकादायक?
“स्किझोफ्रेनियाग्रस्त लोक आक्रमकता दर्शवतात. मुख्यतः भ्रम (त्यांच्याबद्दल बोलणारे आवाज ऐकणे, त्यांना धमकावणे किंवा आज्ञा देणे) आणि ज्या बाबी अस्तित्वात नाहीत अशा गोष्टी ऐकणं किंवा दिसणं (भास) समज किंवा अनुभव, त्या भ्रामक बाबींचा चुकीचा अर्थ लावणे, कोणी करणी केली, माझे विचार इतरांना समजतात, असे भ्रम त्यांच्या मनात निर्माण होत असतात. अशा प्रकारे स्किझोफ्रेनियाग्रस्त लोक समाजासाठी धोकादायक नसतात; परंतु ते स्वत: ला किंवा इतरांना संभाव्यतः हानी पोहोचवू शकतात, असे डॉ. व्यंकटेश बाबू सांगतात.
हेही वाचा : सामरिक महत्त्व असलेल्या ‘झेड मोढ’ बोगद्याचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; याचे वैशिष्ट्य आणि फायदे काय?
मानसिक आजारांबद्दल जागरूकतेच्या अभावामुळे सामान्य लोकांना त्यांच्या कृतींमधून धोका जाणवू शकतो आणि त्यांच्या वागणुकीतील सामाजिक अयोग्यतेमुळे लोक त्यांच्यापासून वेगळे राहू शकतात. त्यांच्याबाबत आक्रमक न होणे, त्यांच्यावर उघडपणे टीका न करणे कधीही योग्य ठरेल. स्किझोफ्रेनियाग्रस्त लोकांसाठी एक सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन अधिक आशादायक बाब असल्याचे सिद्ध होते.