निरोगी बालपण जीवनातील विकासात्मक आणि भावनिक टप्पे गाठण्यासाह सामाजिक कौशल्यांमध्ये पारंगत करण्यास मदत करते. आयुष्यातील कठिण शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थितींना तोंड देण्यासाठी लहान मुलांचं मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे फार गरजेचे आहे. जगभरात मानसिक स्वाथ्याचे महत्त्व ओळखून ‘शालेय मानसिक आरोग्य’ (SMH) कार्यक्रमाची आखणी शिक्षणतज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. यामुळे पौगंडावस्थेतील मुलांचे मानसिक आरोग्य वाढविण्यासाठी मदत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mental Health Day 2022 : ‘या’ सामान्य सवयींमुळे बिघडतंय आपलं मानसिक स्वास्थ्य; वेळीच करा बदल

एका संशोधनानुसार, ९५ टक्के सुप्त मनाचा विकास हा बालपणात होतो. त्याचा प्रभाव संपूर्ण आयुष्यावर पडत असतो. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी केवळ शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे, तर मानसिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्याही चांगलं वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे. मुलांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शैक्षणिक मंडळांकडून मानसिक आरोग्यासंदर्भातील विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.

संशोधनातून कोणती माहिती समोर आली आहे?

  • १० ते १४ वयोगटातील मुलांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे तिसरे मोठे कारण आहे.
  • १३ ते १८ वयोगटातील पाचपैकी एका व्यक्तीला आयुष्यातील एखाद्या वळणावर मानसिक रोगाचा सामना करावा लागू शकतो.
  • मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे १४ वर्षांपर्यंत आणि त्यापुढील वयोगटातील ३७ टक्के विद्यार्थी शाळा सोडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्याची गरज भासू लागली आहे.

WORLD MENTAL HEALTH DAY 2022 : भूतकाळातील चुकांमुळे वाढतंय मनावरील ओझं? ‘या’ पद्धतींनी कमी करा मानसिक ताण

‘शालेय मानसिक आरोग्य’ कार्यक्रम काय आहे?

बालपणातील विकासात क्रियाशिलतेसह भावनिक नियमन हा महत्त्वाचा पैलू आहे. स्मृती, समस्या सोडवणे, तर्क आणि नियोजन हे क्रियाशिलतेचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. हे गुणधर्म तणावाचा सामना करण्यास हातभार लावतात आणि एकाग्रता सुधारतात. त्याचबरोबर विचार करण्याच्या शक्तीतही भर घालतात. प्रभावी निर्णय घेण्यासाठी आणि सर्जनशीलतेसाठी व्यक्तीमत्वातील हे गुणधर्म अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्यक्तीमत्वातील याच गुणधर्मांच्या विकासासाठी ‘शालेय मानसिक आरोग्य’ कार्यक्रम आखण्यात आला आहे.

World Mental Health Day 2022: आलियाचा डिअर जिंदगी , सुशांतचा छिछोरे…मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

‘शालेय मानसिक आरोग्य’ कार्यक्रमाचा फायदे काय?

  • मानसिक आरोग्याबाबतचे गैरसमज दूर करण्यास मदत होईल.
  • आयुष्यातील जोखिमेबाबत जागरुकता आणि सामान्य मानसिक आरोग्यामधील आव्हानांबाबत पूर्वकल्पना मिळेल.
  • विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य ओळखण्यासाठी या कार्यक्रमाची शिक्षकांना मदत होईल.
  • मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे एक सुस्थापित योजना शिक्षणतज्ज्ञांसाठी उपलब्ध असेल.
  • ध्यान आणि योगसाधनेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास लहान वयातच वाढवण्यास मदत होईल. या पद्धतींच्या वापरामुळे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सुदृढ होतील. यामुळे आयुष्यातील ध्येय गाठण्यास त्यांना मदत होईल.
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School mental health programs designed by educators for mental wellbeing of children and adolescents rvs
Show comments