II World War Operation Blue Peacock: दुसऱ्या महायुद्धाने जगाला विनाशाची सुरुवात दाखवून दिली होती. अणुबॉम्बच्या हल्ल्याने हादरलेले हिरोशिमा नागासाकीला सावरण्यासाठी अनेक वर्ष जावी लागली. अभ्यासकांच्या माहितीनुसार अद्यापही काही भागात या हल्ल्याचे पडसाद पाहायला मिळतात. महायुद्धच नव्हे तर यानंतर अनेक वर्ष शीतयुद्धाने सुद्धा जगाची चिंता वाढवली होती. याकाळात शीत युद्धात सहभागी असणाऱ्या देशांनी एकमेकांवर हल्ले करण्यासाठी विविध हत्यारांचा- दारूगोळ्याचा वापर केला. पण या हल्ल्यांमध्ये ब्रिटिश सैन्याने सर्वांना मागे टाकले होते. सध्या समोर येणाऱ्या माहितीनुसार, ब्रिटिश सैन्याने शीतयुद्ध काळात जिवंत कोंबड्यांचा वापर करून परमाणू स्फोटके तयार करण्याचा प्रयत्न केला होता. ऑपरेशन ब्ल्यू पिकॉक या नावाने ही मोहीम राबवली होती.या नावाइतकाच रंजक इतिहास आज आपण सविस्तर जाणून घेऊयात…
रशिया आक्रमक झाल्यास वेळीच पलटवार करता यावा यासाठी ब्रिटिश सैन्याने तयारी सुरु केली होती. रशियाच्या विरुद्ध शक्तिशाली अमेरिका, बलाढ्य युरोप व आक्रमक ब्रिटेन उभे ठाकले होते. शीत युद्धाच्या काळात जगभरात तणाव वाढला होता, मूळ युद्ध होत नसतानाही कधीही युद्ध होण्याची भीती अनेक देशांना पोखरून काढत होती. ब्रिटनच्या मुकुटाची जादू सुद्धा यापुढे फिकी पडू लागली होती. म्हणूनच हल्ला झालाच तर त्याला तगडे प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटनने मोठी योजना आखली आणि ती म्हणजे ऑपरेशन ब्ल्यू पिकॉक!
ऑपरेशन ब्ल्यू पिकॉक काय होते?
१९५० च्या सुरुवातीला युनाइटेड किंगडमने पश्चिम जर्मनीमध्ये जमिनीच्या खाली एक भुयार तयार केले होते ज्यात स्फोटके भरण्यात आली होती. यामुळे सोव्हिएत युनियन हल्ला करायला पुढे येताच रस्त्यातच हल्ला करणे शक्य होईल. हे भुयार तयार करण्यासाठी पाण्यासारखे पैसे खर्च करण्यात आले होते. हे भुयार प्रत्येकी ८ किलो वजनाचे बॉम्ब भरण्यात आले होते ज्यांची एकत्रित क्षमता ही नागासाकी अणुबॉम्ब हल्ल्याच्या ५०% होती. या विस्फोटक तयारीची माहिती जर्मनीला सुद्धा नसल्याचे सांगितले जाते .
स्फोटक भुयारात होती ‘ही’ अडचण
या महत्वाकांक्षी योजनेत एक तांत्रिक समस्या होती उत्तर जर्मनीच्या ज्या भागात हे भुयार खोदण्यात आले होते तिथे थंडीच्या मोसमात तापमान अत्यंत कमी असते. जमिनीच्या खाली तर हे तापमान आणखीनच कमी असू शकते म्हणूनच बॉम्ब हल्ला निष्फळ होण्याची सुद्धा शक्यता होती.हीच समस्या लक्षात घेऊन कोंबड्या वापरण्याची योजना तयार करण्यात आली.
जिवंत कोंबडीची योजना काय होती?
प्रत्येक बॉम्बसह एक एक जिवंत कोंबडी ठेवून त्यांना आठवडाभर पुरेल असे अन्न पाणी ठेवण्यात आले होते. या कोंबड्यांच्या शरीराच्या गरम तापमानाने भुयार सुद्धा गरम राहण्यास होईल अशी ही योजना होती.
हे ही वाचा<< विश्लेषण: अंजलीचा मृतदेह १२ किमी फरपटत नेणाऱ्या आरोपींना काय शिक्षा होणार? कायद्यात काय आहे तरतूद?
ब्रिटिश सैन्याने या योजनेची तयारी केली असताना पॉलिसीचे पेपर लीक झाले आणि १९५८ मध्ये सुरक्षा मंत्रालयाने ऑपरेशन ब्ल्यू पिकॉक बंद करण्याचे आदेश दिले. या योजनेने केवळ शत्रू देशाचेच नव्हे तर मित्र देशांचे सुद्धा नुकसान होऊ शकले असते. या ऑपरेशनबाबत २००४ मध्ये सामान्य लोकांना समजले होते.