शेअर बाजाराने शुक्रवारी आपले सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. काल दुपारी सेन्सेक्सने १३०२ अंकांच्या वाढीसह ७३,८०२.५५ हा विक्रमी उच्चांक गाठला होता. तसेच निफ्टीने इंट्रा डेमध्ये २२,३५०.१० उच्चांक गाठला होता. खरं तर NSE चीही ही सर्वोच्च पातळी आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ८.४ टक्के जीडीपी वाढीच्या दराने शेअर बाजाराला विक्रमी पातळी गाठण्यात मोठी मदत केली आहे. जीडीपीचा गुरुवारी जाहीर झालेला हा आकडा गेल्या दीड वर्षांतील सर्वोच्च तिमाही वाढ दर्शवतो. शुक्रवारी BSE सेन्सेक्स ७२,६०६.३१ वर उघडला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी २२,०४८.३० वर उघडला. शुक्रवारी NSE १.६२ टक्क्यांच्या वाढीसह २२,३३८.७५ वर बंद झाला आणि सेन्सेक्स १२४५.३४ अंकांच्या म्हणजे १.७२ टक्क्यांच्या वाढीसह ७३,७४५.३५ वर बंद झाला. डिसेंबर २०२३ ला संपलेल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगले सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचे आकडे जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी (१ मार्च) बेंचमार्क शेअर निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात १ टक्क्यांहून अधिक वाढले. देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ झाल्याचा हा सकारात्मक परिणाम होता. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिमाहीमध्ये जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के असल्याचंही राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले.
सेन्सेक्स, निफ्टीमध्ये १ टक्क्याची उसळी; नेमके कारण काय?
आर्थिक वर्ष २०२४ च्या तिमाहीमध्ये जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के असल्याचंही राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले.
Written by एक्स्प्लेण्ड डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-03-2024 at 12:18 IST
TOPICSजीडीपीबीएसई सेन्सेक्सBSE Sensexलोकसत्ता विश्लेषणLoksatta Explainedशेअर बाजारShare Marketसेन्सेक्सSensex
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty up 1 percent what exactly is the reason vrd