मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात पाणी तुंबू नये म्हणून पालिकेने आतापर्यंत सखल भागात विविध उपाययोजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. हिंदमाता, सांताक्रूझ मिलन सबवे, शीवचे गांधी मार्केट या परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले आहेत. मात्र तरीही नुकत्याच झालेल्या पावसाने या तिन्ही ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे हा खर्च वाया गेला का, कोट्यवधींचा खर्च या उपाययोजनांसाठी करावा का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईत पाणी का साचते?

मुंबई हे शहर समुद्राने वेढलेले आहे. बशीसारखा खोलगट आकार असल्यामुळे मुंबईत अनेक भाग सखल असून तेथे पावसाळ्यात पाणी साचते. पावसाचे पाणी वाहून समुद्रात जाते. मात्र अतिवृष्टी होत असताना समुद्राला भरती आली तर साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मुंबईत असलेली पर्जन्यजलवाहिन्यांची यंत्रणा ही ब्रिटिशकालीन असून त्याची क्षमता ताशी ५० मिमी पाऊस पडल्यास तेवढ्या पाण्याचा निचरा करणारी आहे. तसेच पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी सध्या असलेली ब्रिटिशकालीन पातमुखे ही समुद्रसपाटीपेक्षा खाली आहेत. त्यामुळे भरतीच्या वेळी अतिवृष्टी झाल्यास पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाहीच पण समुद्राचे पाणी शहरात शिरते. त्यामुळे मुंबईत पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. त्यातही जे भाग अधिक सखल आहेत अशा ठिकाणी साचलेल्या पाण्याची पातळी अधिक असते.

हेही वाचा >>> विश्लेषण : चिनी सैन्याविरोधात उत्तुंग पर्वतीय क्षेत्रात रणगाडा प्रभावी ठरेल?

पालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या?

भरतीच्या वेळी समुद्रातील पातमुखे बंद करावी लागतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने होत नाही. त्यावर उपाय म्हणून पालिकेने ब्रिमस्ट्रोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार मुंबईत आठ ठिकाणी पर्जन्य जल उदंचन केंद्रे उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यापैकी हाजीअली, इर्ला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलॅण्ड, ब्रिटानिया आणि गझदरबांध येथील सहा उदंचन केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. मात्र पूर्व आणि पश्चिम उपनगराला दिलासा देणारी माहूल आणि मोगरा येथील उदंचन केंद्रे जागेअभावी रखडली आहेत. तसेच ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत पर्जन्यजलवाहिन्या नव्याने तयार करण्याची, पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याची, नाल्यांचे रुंदीकरण करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतील पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता ताशी ६० मिमी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याइतकी वाढवण्यात येत आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणजे हिंदमाता आणि मिलन सबवे येथे भूमिगत टाक्या बांधण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. इतक्या उपाययोजना करूनही मुंबईला पाणी तुंबण्यापासून दिलासा मिळालेला नाही.

हिंदमाता परिसरातील प्रकल्प कसा आहे?

परळ पूर्वेकडील हिंदमाता हा परिसर सखल भाग असून तेथे थोडासा पाऊस पडला तरी हमखास पाणी साचते. त्यामुळे पालिकेने तेथे अनेक उपाययोजना केल्या. तरीही पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हिंदमाता येथे भूमिगत टाक्यांचा प्रयोग प्रथमच करण्यात आला. या कामासाठी पालिकेने सुमारे २०० कोटी रुपये खर्च केले आहेत. हिंदमाता उड्डाणपुलाखाली लघु उंदचन केंद्र बांधले असून तेथे परिसरात साचणारे पाणी साठवले जाते. ते पाणी पंपाद्वारे वाहून नेले जाते आणि प्रमोद महाजन कला पार्क येथे बांधलेल्या टाकीत साठवले जाते. मडके बुवा चौक येथे साचणारे पाणी पंपाद्वारे सेंट झेविअर मैदानातील टाकीत साठवले जाते. त्यासाठी १२०० व १६०० मिमी व्यासाच्या पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. प्रमोद महाजन कला पार्क येथे ६ कोटी लीटर क्षमतेची साठवण टाकी तर झेविअर मैदानात ४ कोटी लीटर क्षमतेची साठवण टाकी बांधण्यात आली आहे. साठवलेले पाणी ओहोटीच्यावेळी समुद्रात सोडले जाते. असाच प्रयोग मिलन सबवे येथेही करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि महिलांच्या सजण्यावरही बंदी; अफगाणिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?

गांधीमार्केट येथील प्रकल्प कसा आहे?

शीव येथील गांधी मार्केट परिसर हा मुंबईतील आणखी एक सखल भाग आहे. या परिसरात गेली अनेक वर्षे तीन ते चार फूट पाणी भरत असे. तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास ८ ते १० तास लागत. अनेक बैठी घरे, दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरत असे. पाणी साचल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूकही विस्कळीत होत असे. गांधी मार्केट हा भाग पूर्व द्रूतगती महामार्गावर असल्यामुळे पूर्व उपनगराचा संपर्क तुटत असे. त्यामुळे पालिकेने ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत माहूल येथे उदंचन केंद्र उभारण्याचे ठरवले होते. परंतु, जागेअभावी हे केंद्र अद्याप सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे काही वर्षांपूर्वी पालिकेने तेथे लघु उदंचन केंद्र सुरू केले होते. १२०० मिमीची व्यासाची पोलादी वाहिनी टाकून रस्त्यावरील सर्व पाणी चेंबरमध्ये येण्यासाठी डॉ. आंबेडकर मार्गावर पर्जन्यजलवाहिनी टाकण्यात आली. तेथे प्रतितास ३००० घनमीटर पाण्याचा निचरा होईल असे चार उदंचन संच बसवण्यात आले. तसेच प्रतितास १००० घनमीटर पाण्याचा उपसा करणारे ३ उदंचन संच बसवण्यात आले. त्यामुळे या परिसरातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊ लागला. परंतु, यावेळी गांधी मार्केट परिसरातही पाणी साचले होते.

उपाययोजनांचा परिणाम का दिसत नाही?

पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उपाय केले तरी पाण्याचा निचरा होत नाही. याचे कारण अतिवृष्टी असल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगितले जाते. मात्र पाणी साचणे हा फसलेल्या नियोजनाचा परिणाम आहे. कोणत्याही प्रकल्पाचे, इमारतींच्या बांधकामाचे नियोजन पावसाचा, पाणी तुंबण्याचा, पूर रेषेचा विचार करूनच होणे आवश्यक आहे. मात्र, त्याचा फारसा विचार झालेला नाही. अनेकदा पर्जन्यजलवाहिन्यांची कामे करताना वाहिन्यांचा उतार कमी ठेवला, तर कधी पर्जन्यजलवाहिनीत झाडांची मुळे पसरली, कधी सिमेंटच्या गोण्या अडकल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडचणी निर्माण होतात. पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये कचरा साठतो त्यामुळे कोट्यवधींचे प्रयोग फसल्याचे आढळते. मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाल्यामुळे मुंबईला पुराचा धोका कायम आहे.

काही दिवसांच्या पावसासाठी एवढा खर्च?

मुंबईत वार्षिक अडीच हजार मिमी पाऊस पडतो. त्यापैकी सर्वाधिक पाऊस जुलै आणि ऑगस्टमध्ये पडतो. त्यातही मोजके काही दिवस मुसळधार, कमी कालावधीत खूप पाऊस पडतो आणि पाणी साचते. पावसाचे दोनच महिने पर्जन्यजलवाहिन्या वाहत असतात. इतर वेळी त्या कोरड्या असतात. मग लोक त्यात कचरा टाकतात. चार दिवसांसाठी एवढा खर्च करावा का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. मात्र एकदा, दोनदा पूर आला तरी त्याचा फटका सर्वसामान्यांना, गरीब वर्गाला अधिक बसतो. त्यांचा रोजगार बुडतो. शहराचे नुकसान होते. अशा वेळी उपाययोजनांसाठी केलेला खर्च नियोजनातील ढिसाळपणामुळे वाया जातो तेव्हा त्यावर टीका होते.